मलिकांचा आता वानखेडेंवर वैयक्तिक हल्ला? यास्मिन वानखेडेंचा ‘तो’ फोटो ट्विट करत मोठा गौप्यस्फोट

मुंबई। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यांबद्दल नवनवीन खुलासे करत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देत आहेत. नवाब मलिक सोशल मिडियाद्वारे नवाब मलिक वानखेडे यांच्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. एकीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे.
दुसरीकडे मात्र नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. मलिकांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेही मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.
Who is this person ?
What is his relation with Dawood Wankhede and Sameer Dawood Wankhede ?
Please let us know pic.twitter.com/jGBUmLCjPK— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 30, 2021
ओळख लपवण्यासाठी समीर वानखेडेंनी भावोजीला तुरूंगात डांबण्याची धमकी दिली. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीशी झालेल्या निकाह नाम्यातही अब्दुल अझीजचं नाव आहे, पण अब्दुल मूळचा सुरतचा असल्याचं ते म्हणालेत. ट्विट करत त्यांनी या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार यास्मिन खान हिचं खान अब्दुल अझीजसोबत लग्न झालंय. ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट झाला असल्याची सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळं वळण घेत आहे.
आता मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले असून हे आरोप खोटे ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी घोषणाच आता मलिक यांनी केली आहे.
मी वानखेडे कुटुंबाची मानहानी करत आहे, असे वाटत असेल तर माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करा, असे आव्हानही मलिक यांनी दिले. त्यामुळे हे आरोप खरे आहे की खोटे हे लवकरच समोर येणार आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: