धमक्यांना भीक न घालता एकनाथ शिंदे गडचिरोलीत; जवानांसोबत केली दिवाळी साजरी

गडचिरोली। दोन दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नक्षलवाद्यांकडून ही धमकी दिली असल्याचं बोललं जात आहे.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे फक्त एकनाथ शिंदे यांनाच नाहीतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या धमक्यांना न घाबरता एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट देऊन जवानांसोबत दिवाळ साजरी केली.
गडचिरोली जिल्हयात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होवू शकतो का याबाबत पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. pic.twitter.com/rJe0tcNrxl
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 30, 2021
तसेच सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली.
नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हेदेखील उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील काही परिसर नक्षलग्रस्त भागात मोडतो. जिल्ह्यात शिंदे यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधा वाढवण्यात आल्या. पक्क्या रस्त्यांची तसेच इतर विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
जिल्हातील नक्षलवाद्याच्या उपद्रवामुळे बंद झालेले काही Mining projects शिंदे यांनी पुन्हा सुरू केले. त्याचा राग नक्षलवाद्यांमध्ये आहे. शिंदे यांना मिळालेल्या धमकीविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राबाबत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: