पाकीस्तानी क्रिकेटर इंझमामला हार्टॲटॅक! सचिन तेंडूलकरची त्याच्यासाठी भावूक पोस्ट

मुंबई। पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला काल (मंगळवारी) हृदयविकाराचा झटका आला आहे. व त्यानंतर त्याला सोमवारी सायंकाळी तातडीने लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे.
इंझमामला गेल्या तीन दिवसांपासून छातीतील दुखण्याचा त्रास होत होता. व त्यानंतर त्याला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. इंझमामची प्रकृती सध्या स्थिर असून संपूर्ण देश तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. तसेच इंझमाम लवकर ठणठणीत व्हावा यासाठी क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली.
Wishing you a speedy recovery @Inzamam08. You've always been calm yet competitive, and a fighter on the field.
I hope and pray that you'll come out stronger from this situation as well. Get well soon.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 28, 2021
दरम्यान भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही इंझमामसाठी प्रार्थना करून एक पोस्ट केलीय जी सध्या सर्वत्र व्हायरल होतेय. इंझमाम तू नेहमीच शांत, स्पर्धक आणि मैदानातील लढवय्या राहिला आहेस. या कठिण प्रसंगाला समर्थपणे तोंडू देऊन तू लवकरच बाहेर येथील, अशी आशा आहे, असे ट्विट सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट विश्वातील जुना खेळाडू सहकारी असलेल्या इंझमामबद्दल केले आहे.
इंझमामच्या करकीर्दीबद्दल बोलायचं झालचं तर क्रिकेट कारकिर्दीत ३७५ एकदिवसीय आणि ११९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
त्यावर्षी टी२० विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. याच काळात पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बाॅब वूल्मर यांची हत्या करण्यात आली होती.
ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने इंझमामाच्या ह्रदयविकाराच्या झटक्याबाबतचे वृत्त दिले. इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, की सध्या इंझमामची प्रकृती स्थिर आहे.
इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे इंझमामच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. त्यामुळे तो आता लवकर भरा व्हावा यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असणाऱ्या ताजूद्दीनबाबांवर अंतसंस्कार; किर्तनातच ठेवला होता देह
Flipkart sale : Realme, Vivo, Samsung आणि Iphone वर 10 हजारापर्यंत सूट
शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफांची मोठी घोषणा
अंबेमातेचा आशीर्वाद घेतलाय आता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार; किरीट सोमय्या कडाडले
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: