मोठा धमाका! काँग्रेसच्या कॅप्टनला भाजप देणार केंद्रात कृषिमंत्र्याची जागा?

नवी दिल्ली। सध्या पंजाबच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अचानक राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. तर आता सर्वत्र कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसला धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यामुळे आता पंजाबच्या राजकीय वर्तुळात धमाका होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काल (सोमवारी) ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असूनत्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अमरिंदर सिंग यांना केंद्रीय मंत्रिपदात स्थान मिळणार का याकडे आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध पंजाबमधून होत आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.
दरम्यान अमरिंदरसिंग यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल. त्यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले.
त्यामुळे नवज्योत सिंह सिद्धूच्या खेळीवर आऊट झालेले कॅप्टन आता षटकार मारण्याचा प्रयत्नात असल्याचं सांगितलं जातं आहे. सिद्धूसोबत झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पक्षाचा आपल्यावर विश्वास नसल्याने आपला आपमान झाल्याचे म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता.
कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले होते की, ”सिद्धूला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी आपण काहीही त्याग करण्यास तयार आहोत”.
पुढील विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धू विरुद्ध एक दमदार उमेदवार उभा करेन. जर पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तर काँग्रेस दोन जागाही जिंकेल तरी ती मोठी गोष्ट असेल. असा टोला त्यांनी लगावला होता.
अशातच कॅप्टन भाजपमध्ये आल्यास राज्यात विस्तार करण्यास पक्षाला मोठा वाव मिळेल. याचबरोबर त्यांनी केंद्रात कृषी मंत्रिपद दिल्यास पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाची धारही काहीशी कमी होईल, असा भाजपचा कयास आहे, असे सूत्रांनी सांगितले.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: