‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आप्पांनी मानले सर्वांचे आभार! त्यामागील कारण जाणून चाहते झाले भावूक…

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांना आपलस केल होत. या मालिकेच प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या मालिकेने सध्या नवीन वळण घेतल आहे.
मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कुटुंबामध्ये त्यांच्या होणाऱ्या भावी मुलांवरून चर्चा सुरू होते. त्यावर गौरी मी कधीच आई होऊ शकणार नाही याचा खुलासा करते. गौरीचे हे बोलणे ऐकून आजी कांचनला धक्का बसतो आणि ती सोहळ्यातच वाद घालू लागते.
तसेच कांचनला समजते की, अरूधंतीला गौरीबाबत सर्व माहीत आहे याचा कांचनबरोबर सर्वांनाच राग येतो. आता कांचन यश आणि गौरीचा साखरपुडा मोडणार का? तसेच अरुंधतीला सर्वजण जबाबदार धरणार का? की मालिका वेगळे वळण घेणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे मालिकेतील आप्पा खऱ्या आयुष्यात आपल्या लेकीच्या निर्विघ्न पार पडलेल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. आप्पांची भूमिका अभिनेते किशोर महाबोले साकारताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांना त्यांचा अभिनय प्रचंड प्रमाणात आवडतो.
काही दिवसांपूर्वी किशोर महाबोले यांची मुलगी सृष्टी महाबोले हिचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या लेकिच्या लग्नात तिच्यासोबतचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यासोबतच चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे त्यांनी आभार देखील मानले आहेत.
किशोर महाबोले म्हणतात की, माझी मुलगी चि.सौ.का. सृष्टीच्या लग्नात आपण आशीर्वाद पाठवले म्हणून तिच लग्न निर्विघ्न पार पडले धन्यवाद! किशोर महाबोले हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी अर्चनाच्या वडिलांची मनोहर करंजकर यांची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून फिरंगोजी यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
महाबोले यांनी मराठी सोबतच बॉलीवूड चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. त्यापैकी त्यांनी बस्ता, कुंकू झाले वैरी, आई शप्पथ, सखी, द लेजंड ऑफ भगतसिंग अशा अनेक चित्रपटांत काम केल. त्यांच्या अभिनयाचे कौतुक अनेकजण करताना आपल्याला पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्यांना सेटवर समजली. अशावेळी त्यांनी आपले काम पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य दिले. यावरून त्यांचे सहकालाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी देखील कौतुक केलेले पाहायला मिळाले होते.
हे ही वाचा-
देशातील बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी पडून, लोक पैसे जमा करून विसरले
पत्रकाराच्या हत्येची निंदा करणाऱ्या लोकांवर अभिनेता संतापला; म्हणाला, तुमच्या सर्वांचा नाश होवो
चीन: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून आत गेला २० सेंटीमीटरचा ईल मासा, करत होता हे काम
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: