मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद ?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा, यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची खा. यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे एकीकडे तर्कवितर्क लढवले जात असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून भाजपमध्ये खा. संभाजीराजे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाटील यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. 'मराठा आरक्षण लगेच मिळावे, समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितले आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळाले पाहिजे, पण संघर्ष न करता मिळाले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही, हे कोविड संपल्यावर बघू असेही त्यांनी सांगितले आहे. हे आम्हाला मान्य नाही', असे ते म्हणाले. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले. 'कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन हाताने खाणे सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. परवा मी पाच मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या आहेत. जो कोणीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करेल तो याच मागण्या पुढे रेटेल, असे सांगतानाच संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भूमिका शरद पवार किंवा अजित पवार यांची असेल तर त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन, असे मी आधीच सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: