स्वयंपाक केला नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला मारले; बॅटच्या फटक्यात पत्नीचा मृत्यु

पती पत्नीचे भांडण नेहमीच होत असते. अनेकदा स्वयंपाच्या कारणावरुन शुल्ल शुल्लक कारणांवरुन भांडण होत असतात. पण कधीकधी हे भांडण विकोपाला जाऊन अनेक धक्कादायक घटना घडत असतात.
आता अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. स्वयंपाक न केल्याच्या शुल्लक कारणावरुन एका पतीने आपल्या बायकोला बॅटने मारहाण केली आहे. या घटनेत त्या महिलेचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
२१ वर्षीय असणाऱ्या या महिलेचे नाव कोमल राहूल जाधव असे होते. तर २५ वर्षीय असणाऱ्या तिच्या पतीचे नाव राहूल बाळोसा जाधव असे आहे. या घटनेनंतर राहूलला अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या कुपवाड भागातील आहिल्यानगर झोपडपट्टीत हा प्रकार घडला आहे.
कोमल आणि राहूल हे दाम्पत्य आहिल्यानगर झोपडपट्टीत राहत होते. कोमलने स्वयंपाक न केल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी राहूल नशेत होता. त्यामुळे त्याने स्वयंपाक नाही केला, मला भुक लागलेली आहे, म्हणत रागाच्याभरात घरात असलेल्या बॅटने मारहाण केली.
तसेच तिला घरातून हाकलून देईल अशी धमकी दिली. त्या मारहाणमध्ये कोमल गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर कोमलने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात राहूल विरोधात तक्रार दाखल केली. तिची प्रकृती खराब झाल्याने तिला रुग्णालयात दाखळ करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.
आता कुपवाड पोलिस ठाण्यात राहूल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी राहूलला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?
प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार
दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन
0 Comments: