मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?

काँग्रेस आज सत्तेत असती तर भारत महासत्ता झाला असता किंवा नसता, पण भूतान सारख्या देशाकडून मदत घेण्याएवढी वाईट परिस्थिती नक्कीच नसती. अशी जोरदार टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. भुतानकडून मदत घेतल्याने त्यांनी आज नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
देशात सध्या कोरोनाने हाहाकार उडवला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड, रेमडेसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होत नाहीत.
यामुळे केंद्र सरकारने मदतीचे आवाहन केले आहे, याला प्रतिसाद देत अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यामध्ये छोटा देश असलेल्या भुतानने देखील ऑक्सिजनसह वैद्यकीय मदत देण्याची घोषणा केली आहे.
यामुळे भूतानसारख्या छोट्या देशाकडून आपल्याला मदत घेण्याची वेळ आली हे खेदजनक आहे, काँग्रेस आज सत्तेत असती तर भारत महासत्ता झाला असता किंवा नसता, पण भूतानसारख्या देशाकडून मदत घेण्याएवढी वाईट परिस्थिती नक्कीच नसती.
‘कुठे नेऊन ठेवला रे देश माझा’, अशी जोरदार टीका भाई जगताप यांनी केली आहे. यामुळे आता या मदतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भूतानने मदत देण्याचे जाहीर केले आहे.
तसेच भारतीय मोठे उद्योजक असलेले रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह अनेकांनी मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. यामुळे परिस्थिती बदलण्यास काहीशी मदत होणार आहे.
ताज्या बातम्या
बुधवार पेठेतील महिलांसाठी ही तरुणी ठरलीय देवदुत; करतेय असं काम की तुम्हीही म्हणाल वा!
अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
रिलायन्सचा मदतीचा सपाट सुरूच! १००० बेडचे कोविड सेंटर उभारणार, उपचारही मोफत
0 Comments: