‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांचे शुटींग थांबले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाउन वाढत असल्याने मालिकांचे शुटींग इतर राज्यात हलवण्यात आले आहे. मालिकांचे शुटींग करता करता कलाकारांचे एकमेकांबरोबरचे बोन्डीग चांगले झालेले दिसते.
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शुटींग दणक्यात सुरु झाले आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या मालिकेबरोबरच या मालिकेतील पात्रांना चाहत्याची पसंदी आहे.
नुकतेच या मालिकेच्या सेटवर ओम म्हणजेच अभिनेता शाल्वचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुटींगमधून वेळ मिळताच कलाकारांची धमाल मस्ती चालू असते. सतत आपल्याला त्यांचे फोटोज आणि विडीओ पाहायला मिळतात. शुटींगमधून वेळ मिळताच स्वीटू म्हणजे अभिनेत्री अन्विता फलटणकर विडीओ शेअर करत असते.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटूने काहीच दिवसांपूर्वी तिचा आणि मालिकेतील तिचा भाऊ चिन्याचा विडीओ इंस्टाग्राम वर शेअर केलेला पाहायला मिळतोय. त्या दोघांनी ‘ओ हो हो हो ….’ या गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळतोय. त्यांच्या विडीओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत सध्या दिलचस्प कहाणी सुरु आहे. ओमने मोमोसोबत साखरपुडा करण्यास नकार दिला आहे. एकीकडे स्वीटूच्या घरचे मोहन सोबत तिच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे तर दुसरीकडे ओम स्वीटूला लग्नासाठी मानवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. ओमच स्वीटू सोबत लग्न होईल की नाही? तो तिच्या घरच्यांची मने जिंकील की नाही? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले पाहायला मिळतात.
हे ही वाचा –
चाचणीच्या अगोदर कोरोना पाॅझीटीव्ह आहोत की नाही कसं ओळखायचं? एम्सने सांगीतल्या ह्या टिप्स
आशियातील सर्वात दुर्दैवी देश! जिथे मुलांना जगण्यासाठी विकावी लागताहेत स्वत:ची खेळणी
म्हणून निर्मात्यांनी घेतला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका बंद करण्याचा निर्णय
0 Comments: