Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; नारायण राणेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Raj Thackeray) अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. मात्र असे असले तरी त्यांनी राज यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'एखाद्या नेत्याला दर्शनाला जावे असे वाटले, तर त्यावर काय बोलणार?... पण माझ्या शुभेच्छा... त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे', असे नारायण राणे यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हटले आहे. ( congratulated ) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार नारायण राणे यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबतचे प्रयोजन आपल्याला माहीत नसल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र यावेळी नाराययण राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात मात्र शिवसेनेने सहभाग नोंदवला नाही. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राउंड असतात, मातोश्रीवरून बटण दाबले की आलो रस्त्यावर.... शिवसेना सगळे बटन दाबून करते. मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था आता कडक करण्यात आली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावतात, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्र सोडले आहे. क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणाले... मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत ही चांगली गोष्ट असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. रामजन्मभूमीचा अनेक वर्षांपासूनचा वाद मिटून आता राम मंदीर उभे राहत आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला पाहिजे, असे सांगत आपणही स्वत: अयोध्येला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: