राज्यात सर्वत्र पोलीस अॅलर्टवर; उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

नगर: 'महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. , यासह महाराष्ट्रात आवश्यक तिथे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील संपूर्ण खाते हे अॅलर्ट झाले आहे,' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज पुन्हा एकदा दिली. ( वाचा: राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ काल बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्यादृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. नगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. वाचा: महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी अजित पवार यांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई-पुण्याच्या सह सर्व राज्यांमध्ये योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत व पोलीस सुद्धा आता अलर्ट झाले आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्लीमध्ये शुक्रवारी आयईडी स्फोट घडवून आणला गेला. त्यानंतर देशातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी देखील अॅलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री पवार तसेच गृहमंत्री यांच्याच चर्चाही झाली होती. त्यानंतर आज नगरमध्ये पवार आले असता त्यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: