टाकळीभान : पाण्यावरुन महिलांनी गाजवली ग्रामसभा

टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 15 ऑँगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात न आल्याने काल आयोजित केलेल्या ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होताच सर्वच प्रभागातून आलेल्या महिलांनी माईकचा ताबा घेवून पाणी प्रश्न व घरकुल प्रश्नावर हल्लाबोल करीत सारा परिसर दणाणून टाकला. तर बापूसाहेब नवले यांनी हंडा, कळशी आणून ग्रामसभेत प्रवेश केला व या भांड्यांचा आवाज करून ‘पाणी द्या, पाणी,’ अशी मागणी केली. पाणी देता येत नसेल तर नैतीक जबाबदारी म्हणून सर्व सदस्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी अहवाल वाचन केले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, आज लोकांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपल्बध करून देणेकामी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने अगोदर ग्रामपंचायतीने प्राधान्याने येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या करावा, असे आवाहन केले. यावेळी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, माजी उपसरपंच भारत भवार, पाराजी पटारे,अविनाश लोखंडे, प्रा.जयकर मगर, यशवंत रणनवरे आदी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, चार वर्षापासून आपली चारशे घरकुले रखडली आहे. त्यातली फक्त 115 घरकुले झाली आहेत. उर्वरीत घरकुलांसाठी शासनाने या घरकुलाबाबत स्वत:ची जागा पाहीजे अशी अट घातल्याने काही लोकांची घरकुल राहीले. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक होऊन आहे त्या जागेवरच बांधून मिळण्याबाबत चर्चा झाली. लवकरच या घरकुलांचे कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटलांच्या हस्ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की, भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य लक्षात घेता भंडारदरा धरणाच्या खाली होणार्‍या पावसाचे पाणी तसेच धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटँक अगोदर भरून घ्यावा. व नंतर निळवंडे धरण भरण्यात यावे, असा ठराव मांडला. उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सध्यस्थितीत येथील बाजारसमितीकडे असणारी बाकी वसूल करण्यात यावी. तसेच पेठेतून गेलेल्या मेनलाईनला अनधिकृत नळ कनेक्शन आहे. ते कन्केशन बंद करावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून बाकी लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. ग्रामसभेत राहुल पटारे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, नारायण काळे, बापूसाहेब शिंदे, अनिल बोडखे, आण्णासाहेब दाभाडे, बापू नवले, रामभाऊ आरगडे, सुप्रिया धुमाळ, देवा कोकणे, संजय रणनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिलांचा सत्ताधार्‍यांवर प्रश्नांचा भडिमार या ग्रामसभेत पहिल्यांदाच महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढाच या ठिकाणी वाचून दाखविला. प्रत्येक वार्डातून आपआपल्या अडचणी घेवून महिला वर्ग या ठिकाणी सत्ताधार्‍यांना जाब विचारण्यासाठी आल्या होत्या. महिलांनी एकामागून एक प्रश्नांची शरबती सत्ताधार्‍यांवर केली. त्यामुळे सत्ताधार्‍यांची यावेळी चांगलेच भंबेरी उडाली. आक्रमक झालेल्या महिलांना उत्तर देण्यात सर्वांचीच तारांबळ होताना दिसली. हेही वाचा लवंगी मिरची : मग विकास नक्कीच होईल! जादूटोण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला गंडा नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा The post टाकळीभान : पाण्यावरुन महिलांनी गाजवली ग्रामसभा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvRxz1

परवानाधारक व्यापार्‍यांनाच उडीद द्या : सभापती काकासाहेब तापकीर

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी मिरजगाव व कर्जत येथील अधिकृत आडते व्यापारी यांनाच उडदाची विक्री करावी. हिशेब पट्टी व तोलाई पावत्या घ्याव्यात, असे आवाहन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील खरीप हंगामात पेरणी केलेला उडीद सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात विकायला येत आहे. मिरजगाव व कर्जत येथील बाजार समितीच्या आवारात अधिकृत आडते व्यापारी हा उडीद खरेदी करत आहेत. असे असताना कर्जत तालुक्यातील काही ठिकाणी खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने नेमलेल्या परवानाधारक व्यापार्‍यांनाच उडीद द्यावा व त्यांच्याकडून हिशेब पट्टी व तोलाई पावती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, याचा गैरफायदा घेण्यासाठी काही खासगी व्यापारी बाहेर कमी दराने उडीद खरेदी करत आहेत. यामध्ये शेतकरी व मार्केट कमिटी या दोघांचाही तोटा होत आहे. शिवाय भविष्यात शासनाची काही योजना आली, तर खासगीत उडीद खरेदी केलेल्या व्यापार्‍यांना शेतकरी कोणतीच पावती मागू शकत नाहीत. यामुळे असे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतात. यासाठी शेतकर्‍यांनी अधिकृत आडते व्यापार्‍यांनाच उडीद विक्री करावी. अधिकृत किंवा खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती तापकीर यांनी दिला आहे. यावेळी उपसभापती आबासाहेब पाटील उपस्थित होते. मिरजगाव भागात खरीप हंगामात पेरणीपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामुळे या भागात उडदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच, कुकडी पट्ट्यात दोनदा पाणी आले. यामुळे कर्जत तालुक्यातील उडीद पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र वाढले आहे. यामुळे उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकूण क्षेत्राचा विचार करता यावर्षी उडदाचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या वर्षी 25 हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली होती. तर, यावर्षी फक्त 13 हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. मात्र, मिरजगाव व कर्जत येथील क्षेत्र वाढले आहे. यामुळे संस्थेच्या हितासाठी सर्व व्यवहारावर लक्ष ठेऊन संस्थचे उत्पन्न कसे वाढेल, याची दक्षता घेतली जाणार आहे. उडीद पेरणी क्षेत्रात पन्नास टक्के घट उडीद उत्पादनात कर्जत तालुका राज्यातील टॉप थ्री मध्ये होता. गेल्या वर्षी पेरणी, उत्पादन व उडदाला सर्वाधिक दर देण्यात तालुका आघाडीवर होता. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्याने उडीद पेरणी क्षेत्र पन्नास टक्के घटले आहे. यामुळे उडदाची मागणी पूर्ण होईल असे वाटत नसल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले. हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक नगर : दरोडेखोरांच्या रिक्षाचा सिनेस्टाईल पाठलाग The post परवानाधारक व्यापार्‍यांनाच उडीद द्या : सभापती काकासाहेब तापकीर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvPG6p

Magnet Motor और Copper Wire से बनी Free Energy क्या काम करेगी ? | How to Make Free Energy at home

Magnet Motor और Copper Wire से बनी Free Energy क्या काम करेगी ? | How to Make Free Energy at home

Magnet Motor और Copper Wire से बनी Free Energy क्या काम करेगी ? | How to Make Free Energy at home 🔷 My Second Vlog Channel - https://www.youtube.com/channel/UC4peTMBMdXQucuoJLtxtMRg ⚫ Follow me on :- INSTAGRAM - https://instagram.com/technicalsokil FACEBOOK - https://facebook.com/technicalsokil TWITTER - https://twitter.com/technicalsokil 🔵 My Other Popular Videos Link - ► अपने घर पर Solar System खुद ही कैसे लगाए | Solar Panel Connection for Home with Inverter & Battery - https://youtu.be/YrQOXclXSkQ ► इस वीडियो को देखने के बाद आप एक भी खराब Led बल्ब नहीं फेकोगे | 100% Guarantee ✅ | Led Bulb Repair - https://youtu.be/VDBdGsbMsSY ► How to Make Amazing Electric Board | 3 in 1 Gadgets | GIVEAWAY🔥🔥🔥 - https://youtu.be/cPRTSjIxWAc ► Instant Water Heater | बिजली बचाये | 100% Safe | बिल्कुल सस्ता 🔥🔥 - https://youtu.be/p5bAtnFCiaI ► Soldering Iron | How to Make usb Soldering Iron 🔥🔥🔥 - https://youtu.be/DWjABCcNt6k ► How to Make Bike Battery | Life time Bike Battery | Hamesha ke liye Bike Battery Ka Jhanjhat Khatam - https://youtu.be/_FANAw8pquY ► Inverter बनाये सिर्फ 200 रुपए में | How to Make Inverter 12V to 150W-200W 🔥🔥🔥 - https://youtu.be/ICcSlF_0J9E ► How to Make Automatic Emergency Light for Power Cut - Easy life hacks - https://youtu.be/DP1MfLsQfko ► Very Easy and Simple to Make USB Speaker at home - DIY Only in 12₹ - https://youtu.be/05A8-EqA94g ► How to Make Powerful Power bank at home - https://youtu.be/KJjaamqG_ks ► How to Make 12 Volt Battery Charger (EASY-WAY) - https://youtu.be/U7MAeFidkI0 ► Homemade Power bank 22000 mAh Only Rs 150/- - https://youtu.be/LQOvOxjnAvY ✅ Subscribe Us on Youtube www.youtube.com/technicalsokilTS For Business Enquiry Email :- mkmt1984@gmail.com Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ] Technical Sokil #freeenergy #magnetfreeenergyrealorfake #realorfakefreeenergy #freeenergymotor #technicalsokil
via YouTube https://www.youtube.com/watch?v=4q-3d-KFfik

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे 116 कोटी कागदावरच!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, शासन आणि सहकार विभागात ‘कागद पे कागद’ सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र 55 हजार शेतकर्‍यांचे 33,37,817 क्विंटल कांद्याचे 116 कोटी रुपये अजुनही मिळालेले नाहीत. दरम्यान, हे अनुदान लवकरच वर्ग होणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगितले जाते. मध्यंतरी कांद्याचे भाव गडगडल्याने शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शेतकर्‍यांचे प्रस्ताव बोलाविण्यात आले. जिल्ह्यातून 78752 शेतकर्‍यांनी कागदांची जुळवाजुळव करून आपले प्रस्ताव सादर केले. मात्र यात छाननी झाली आणि 23 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या शेतकर्‍यांचा भ्रमनिराश उवर्रीत 55368 शेतकरी अनुदानास पात्र असल्याचा अहवाल पुढे पाठविण्यात आला. संबंधित पात्र शेतकर्‍यांनी 33 लाख 37 हजार क्विंटल विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे 116 कोटी 82 लाख 36 हजार रुपयांचे अनुदान यादी तयार करण्यात आली. तशी मागणी शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र अजुनही ही रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. काही जिल्ह्यांत दोन टप्प्यात हे अनुदान दिले जात आहे. तर नगर जिल्ह्यात अजुन एकही टप्पा आलेला नाही. दरम्यान, शासनाच्या निर्देशनानुसार नुकतीच जिल्हा सहकार विभागाकडून कांदा अनुदान लाभार्थ्यांची सुधारीत मागणी आकडेवारी पाठविली आहे. त्यामुळे आतातरी हे अनुदान प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. तालुका         शेतकरी          अनुदान नगर              21768       50,65,42,817 अकोले           366           57,20,491 संगमनेर        5818          13,17,17,668 कोपरगाव      5141         88,91,100 राहाता          1225           2,03,45,447 श्रीरामपूर      1142           2,61,83,517 राहुरी           4063           5,20,47,677 नेवासा         3161           6,34,28,634 शेवगाव        668            80,64,441 पाथर्डी          211          20,43,968 जामखेड    1839             3,79,44,585 कर्जत          811            1,71,24,775 श्रीगोंदा      1130          3,72,55,862 पारनेर       5478          11,73,74,820 साईराज     178           2,86,90,674 संवत्सर       484             71,57,566 गोदावरी       23               1,80,460 ओमचैतन्य 1538          3,65,94,848 प्रसन्ना        206             56,57,505 नाफेड       38             10,49,300 एकूण   55368      116,82,36,065 हेही वाचा छत्रपती संभाजीनगर: लोहगाव येथे विद्युत तारेवरील कावळा काढताना वायरमनचा मृत्यू जगातील सर्वात सुंदर घोडा निगडी पीसीएमसी वसाहत इमारतींची दुरवस्था The post अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे 116 कोटी कागदावरच! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvLbyN

فيديو جديد (خابي لام) تحشيش مضحك جداً 😂 | مقاطع تيك توك

فيديو جديد (خابي لام) تحشيش مضحك جداً 😂 | مقاطع تيك توك

فيديو جديد (خابي لام) تحشيش مضحك جداً 😂 | مقاطع تيك توك
via YouTube https://www.youtube.com/watch?v=Wadw8ThlwbI

Slow Motion Inside Perspective of Lock Getting Bumped Open.

Slow Motion Inside Perspective of Lock Getting Bumped Open.

Lock bumping gear featured can be found at https://covertinstruments.com/
via YouTube https://www.youtube.com/watch?v=S9w_EUc0qAE

राहुरी : अकरा जणांकडून तरुणास दांड्याने जबर मारहाण

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ‘शेतात रोटा का मारला’, असे विचारल्याचा राग आल्याने 11 जणांनी सुनील शिंगाडे या तरूणाला लाथा- बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केली. ही घटना तालुक्यातील कणगर येथे (दि. 21 ऑगस्ट) रोजी घडली. सुनील शिंगाडे (वय 28 वर्षे) हा तरूण कणगर येथे राहतो. कणगर गावात वडाचे लवण शिवारात त्याची शेती आहे. शेजारी सुभेदार बाबुलाल शेख (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) याची जमीन आहे. (दि. 21 ऑगस्ट) रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास सुनील शिंगाडे त्याच्या शेतात गेला. तेव्हा शब्बीर शेख हा शिंगाडे याच्या शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत होता. सुनील शिंगाडे त्याला म्हणाला, ‘माझ्या शेतात रोटा का मारतो,’ असे विचारल्याचा त्याला राग आल्याने त्याच्यासह इतरांनी सुनिल शिंगाडे यास दांडक्याने मारहाण केली. शिंगाडे यांच्या फिर्यादीनंतर शब्बीर बाबुलाल शेख, राजु बाबुलाल शेख, सुभेदार बाबुलाल शेख, राजु शेख, दोन मुले, शब्बीरचा मुलगा व अन्य 4 ते 5 अशा 11 जणांवर गुन्हा दाखल झाला. हेही वाचा गणेशोत्सवात रात्री 12 पर्यंत मेट्रो सुरू राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार  नाशिक : वणी -सापुतारा रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर नेवाशात चोरलेली बोअरची गाडी थेट तामिळनाडूतुन ताब्यात The post राहुरी : अकरा जणांकडून तरुणास दांड्याने जबर मारहाण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvHzLv

संगमनेर : गुंजाळवाडी रस्त्याचे काम पाडले बंद!

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे होत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या गुंजाळवाडीसह वेल्हाळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत काम बंद पाडले, मात्र ठेकेदाराने ग्रामस्थांना विश्वासात न घेता पुन्हा परस्पर काम सुरू केल्याने संतप्त झालेले भाजपा किसान आघाडीचे प्रमुख रविंद्र थोरात व माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांनी उप अभियंत्यासह ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरीत जाब विचारला. संगमनेर ते वेल्हाळे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, परंतु काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी ते बंद पाडले. यावेळी काम सुरू करण्याअगोदर मला फोन करा, असे रविंद्र थोरात यांनी ठेकेदाराला सांगितले होते, मात्र ठेकेदाराने कोणालाही न विचारता तीन दिवसांपूर्वी पुन्हा काम सुरू केले. ठेकेदाराने रस्त्याची स्वच्छता न करता निकृष्ट दर्जाच्या दगड- गोट्यांची खडी वापरुन, त्यावर कमी प्रतीचे डांबर टाकण्याचे काम सुरू केले. ही बाब गुंजाळवाडी चौफुली परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी भाजप किसान आघा डीचे राज्य सदस्य रविंद्र थोरात यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. थोरात यांनी चौफुलीजवळ जाऊन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. थोरात व गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी काम बंद पाडले. रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी बंद पाडल्याचे समजताच साबांचे उप अभियंता ठाकरे घटनास्थळी आले. रविंद्र थोरात यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. मला विचारल्याशिवाय काम सुरू करू नका, असे ठेकेदाराला सांगितले होते. तरीसुद्धा न ऐकता पुन्हा काम सुरू केल्यामुळे ठाकरे यांच्या समक्ष ठेकेदारास थोरात यांनी जाब विचारला. रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर दोन वर्षात खड्डे पडले. ते ठेकेदार स्वखर्चाने भरून देतील, अशी तजवीज त्यांच्या टेंडरमध्ये केली आहे. त्यामुळे ते कसे चुकीचे काम करतील, असे सांगत त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले. यानंतर थोरात चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ठेकेदारासह उपअभियंत्यास चांगले धारेवर धरले. चांगले काम न झाल्यास मी पालकमंत्री विखे पां. यांचा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचा दौरा लावेल, अशी तंबी थोरात यांनी ठेकेदारास दिली. गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कामाच्या दर्जाबाबत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे तक्रार करणार आहोत. ठेकेदाराने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास पालकमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहे. – रविंद्र थोरात, भाजप किसान आघाडी राज्य सदस्य हेही वाचा घोसपुरी-चिखली-कोरेगाव एमआयडीसीसाठी हालचाली अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात The post संगमनेर : गुंजाळवाडी रस्त्याचे काम पाडले बंद! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvFZmF

अहमदनगर हादरलं ! झाडाला उलटं टांगून तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण?

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयातून ही घटना घडली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील काही दिवसापूर्वी शेळी आणि कबुतर चोरीला गेले होते. चोरीचा संशय या चार तरूणांवर होता. यावरून काल शुक्रवारी सकाळी चार तरुणांना त्यांच्या घरातून उचलून नेत त्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेत हे तरुण जबर जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना शिरापूर येथील कामगार हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हाॅस्पीटलमध्ये जावून या तरुणांची भेट घेतली आहे. संबधीत मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा नाशिक : वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणेकर ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध वडेट्टीवार यांना मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते : बावनकुळे पिंपरी : अग्निशमन यंत्रणेकडे सोसायट्यांचे दुर्लक्ष The post अहमदनगर हादरलं ! झाडाला उलटं टांगून तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण? appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvCpHS

highway cafe

h

संगमनेर : दूधगंगा अपहारातील 21 जणांवर एमपीआयडी कलम

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी 21 जणांवर शहर पोलीसात एमपीआयडी अर्थात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापना मधील )हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबतचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या व्यवस्थापक व लेखापरीक्षकासह पाचही जणांना न्यायाधीश मनाठकर यांनी 4 दिवसाची पोलीस कोठडी पुन्हा सुनावली. संगमनेर येथील दूधगंगा नागरी पत संस्थेत 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयाचा अपहार झाला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जि प. सदस्य भाऊसाहेब कुटे, यांच्यासह पत्नी विमल, शकुंतला, मुलगा दादासाहेब, संदीप, अमोल आणि सून सोनाली पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, अकाउंटंट स्व . भाऊसाहेब गायकवाड, तात्कालीन लेखापरीक्षक अमोल क्षीररसागर, कर्जदार चेतन कपाटे, कृष्णराव कदम ,त्याची पत्नी प्रमिलाताई कदम, मुलगा अजित कदम, सुजित कदम, संदीप जरे, अरुण बुरुड, लहानु कुटे, उल्हास थोरात, सोमनाथ सातपुते, उत्तम लांडगे यांच्यासह 21 जणांवर शहर पोलिसात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतसंस्थेचा व्यव थापक आणि तात्कालीन लेखापरीक्षक याच्यासह तीन कर्मचारी अशा 5 जणांना अटक केली आहे. मात्र पतसंस्थेचा चेअरमनसह त्याचे सर्व नातेवाईक फरार आहे. पोलिसात ज्या ठेवीदा रांच्या ठेवी दूधगंगा पतसंस्थेत आहेत. त्या ठेवीदारांनी आपल्या ठेवीचा पुरावा म्हणून पावत्या आणि दिलेला फॉर्म भरून पोलिसांकडे दाखल करावा असे आवाहन पो. नि. भगवान मथुरे यांनी केले होते, ठेवीदारांनी आपल्या ठेवीच्या सर्व पावत्या आणि अर्ज भरून शहर पोलिसांकडे जमा केले आहेत. त्या ठेवींचा विचार करत अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या सर्व 21 जणांवरती एमपीआयडी हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे आता ठेवीदारांच्या ठेवींना खर्‍या अर्थाने संरक्षण मिळणार आहे. सध्या अटकेत असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ लेखापरिक्षक अमोल क्षीरसागर याच्यासह लहानु कुटे, उल्हास थोरात आणि सोमनाथ सातपुते या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वांची गुरुवारी पोलीस कोठडीची मदत संपली होती. त्यांना न्यायालयात न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर हजर केले असता दि. 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले आहे हेही वाचा प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम कसा होतो? राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प? पोलंडमधील प्राचीन दफनभूमीत सापडले चांदीचे दागिने The post संगमनेर : दूधगंगा अपहारातील 21 जणांवर एमपीआयडी कलम appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv8FHr

CSK गाडीचं जुगाड 👌#indianfarmer #jugaad #shorts

CSK गाडीचं जुगाड 👌#indianfarmer #jugaad #shorts

Title --CSK गाडीचं जुगाड 👌#indianfarmer #jugaad #shorts #csk #car #engine #tyre -------------------------------------------------- To learn more about farming - 📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- https://www.youtube.com/c/IndianFarmer 💻Our website - https://indianfarmer.in/ 📷 Follow us on Instagram - https://www.instagram.com/indianfarmer/ 🏪 Our Store - https://amzn.to/3iqNwzy 📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves. Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries. This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony. Thank You!
via YouTube https://www.youtube.com/watch?v=e5DdA0L_r1I

| life is difficult | Atharva Sudame |

| life is difficult | Atharva Sudame |


via YouTube https://www.youtube.com/watch?v=Pkw9OKpAHds

Test Output TRQ HHO Generator Kit - Transparan 9,5 Ampere Max

Test Output TRQ HHO Generator Kit - Transparan 9,5 Ampere Max


via YouTube https://www.youtube.com/watch?v=-lWsskepQvQ

राशीन : पोलिसांना खोटी माहिती देणार्‍याविरुद्ध गुन्हा

राशीन(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणार्‍या तालुक्यातील जलालपूर येथील दीपक भीमराव माने (वय 45) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांना 22 ऑगस्ट रोजी राशीन पोलिस दूरक्षेत्रात तत्काळ मदत पुरवणार्‍या डायल 112 करिता नेमण्यात आले होते. त्या वेळी त्यांना सकाळी 11.49 वाजता कॉल आला. कॉल करणार्‍या व्यक्तीस त्याच्या मुलाने मारहाण केली आहे, यात तो जखमी झाला आहे. मला तत्काळ पोलिस मदत हवी आहे अन्यथा मी आत्महत्या करतो, असे त्यावर सांगण्यात आले. मुरकुटे यांनी तत्काळ त्या क्रमांकावर कॉल केला. त्यास घटनास्थळ विचारले. त्याने जलालपूर (ता. कर्जत) सांगितले. मुरकुटे यांनी तेथे जाऊन खात्री केली. त्या वेळी कॉल करणारा दीपक भीमराव माने दारूच्या नशेत आढळून आला. त्यास कोणीही मारहाण केली नव्हती. मुरकुटे यांनी त्यास फिर्याद द्यायची असेल, तर राशीन पोलिस दूरक्षेत्रात येऊन दे, असे सांगितले. त्याने पुन्हा डायल 112 ला दोनदा कॉल केला. पोलिस ठाण्याला खोटी माहिती दिल्याने मुरकुटे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. हेही वाचा पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर इंग्रजांना पळविले, तसे दोन्ही सरकारला पळवू : नाना पटोले रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू The post राशीन : पोलिसांना खोटी माहिती देणार्‍याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv5c2q

राहुरी बाजार समितीत कांदा विक्रीला नकार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाने कांद्याबाबत निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेताच शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समिती बंदच्या आवाहनाला राहुरीमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी शासनाकडे कांद्याला 3 हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. अन्यथा शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला. केंद्राकडून कांदा निर्यातीवर 40 टक्के अतिरीक्त शुल्कचा निर्णय होताच कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा संताप पहावयास मिळत आहे. नगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जोपर्यंत शासन कांद्याला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर जाहिर करीत नाही, तोपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शेतकर्‍यांसह बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी शेतकरी हित लक्षात घेता राहुरी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळावा, हीच भावना बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापार्‍यांची असल्याचे सांगत राहुरी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्री झालीच नाही. बाजार समितीमध्ये शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांचा रुद्रावतार पाहता शासनाकडून दोन लाख मे.टन कांदा खरेदीचा निर्णय होऊन कांद्याला 2 हजार 410 रूपये दर देण्याचा निर्णय जाहिर झाला. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवित कांद्याला किमान 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावे, अशी मागणी केली आहे. शासनाने निर्यातीला 40 टक्के अतिरीक्त शुल्क लावले ते मागे घेण्यात यावे. 31 मार्च पर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला 350 रूपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे अवलोकन व्हावे या प्रमख मागण्या शासनाकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. या आशयाचे निवेदन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे यांसह प्रकाश देठे, सतिष पवार, जुगलकुमार गोसावी, सचिन पावळे, आनंद वने, सचिन गडगुळे, रविंद्र निमसे, सचिन म्हसे, राहुल करपे, भारत वामन, सुनिल इंगळे, प्रविण पवार, प्रमोद पवार, अमोल पवार, भाऊसाहेब दिवे, अमोल दिवे, बाळासाहेब काळे, बापुसाहेब बाचकर, दिनेश वराळे, किशोर वराळे, अमित पर्वत आदींनी एकत्र येत राहुरी तहसील कार्यालयामध्ये संताप व्यक्त केला. तहसीलदार चंद्रजित रजपूत यांच्याकडे निवेदन देत शासनाने तत्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा 25 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. शेतकर्‍यांचा अंत पाहू नका : मोरे केंद्र व राज्य शासन जेवढा खर्च जाहिरातीवर करीत आहे. त्यापैकी निम्मा खर्च जरी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर केला तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतेल. अनुदानाच्या कागदी घोषणा होतात. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ऑनलाईनच्या फंद्यात अडकवून ठेवले जाते. शासनाने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी हितासाठी लढा देत राहू असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले. हेही वाचा : भाड्याने ग्रामसेवक पाहिजे.! सोशल मिडियावर जाहिरात होते आहे व्हायरल लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट? The post राहुरी बाजार समितीत कांदा विक्रीला नकार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv30NW

पारनेर : कडता बंद करण्यावर ‘परिवर्तन’ठाम; त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका बाजार समितीत शेतकर्‍यांच्या शेतमाल विक्रीवरील कडता कपात बंद केल्याशिवाय तालुका परिवर्तन फाउंडेशन आपले आंदोलन थांबविणार नाही, असे परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन वर्षांपासून पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनचा कडता पद्धतीला प्रखर विरोध असून, याबाबत आंदोलन सुरू केले आहे. 17 जुलैला याबाबत दिलेल्या निवेदनानंतर बाजार समितीने कडता बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याच्या विरोधात व्यापार्‍यांनी लिलाव बंद करीत शेतकर्‍यांची अडवणूक केली. यामध्ये सहभागी झालेल्या व्यापार्‍यांचे परवाने तातडीने रद्द करण्याची मागणी भालेकर यांनी केली आहे. याबरोबरच बाजार समितीचे संचालक आणि सचिवांवरही कारवाई करण्याबाबत पणन महामंडळाकडे तक्रार दिली असल्याचे भालेकर यांनी सांगितले. कडता बंद करण्यासाठी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, व्यापारी संचालक भळगट यांनी अर्बन बँक येथे भालेकर यांची भेट घेऊन त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. परंतु, आतापासूनच कडता कापला जाणार नाही, असे आश्वासन भालेकर यांनी कटारिया यांच्याकडे मागितले. त्यावर कटारिया यांनी तातडीने कडता बंद करत असून, आठ तारखेपर्यंत बाजार समिती व्यापार्‍यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कउता बंद झाला पाहिजे, अशी भूमिका भालेकर यांनी घेतली आहे. रेपाळे यांनी जाहीर माफी मागावी बाजार समिती आणि व्यापार्‍यांची बदनामी परिवर्तन फाउंडेशनने केल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणार्‍या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मारूती रेपाळे यांचा भालेकर यांनी निषेध केला आहे. जोपर्यंत रेपाळे हे जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही मुद्द्यावर तडजोड केली जाणार नाही आणि चर्चाही केली जाणार नाही, अशी भूमिका परिवर्तनने घेतली आहे. आता जाहीर सभेमध्येच चर्चा कडता बंदच झाला पाहिजे, अशी परिवर्तनची भूमिका असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापुढे बंद खोलीत बैठक होणार नाही. व्यापारी, बाजार समितीचे सर्व संचालक आणि शेतकरी यांच्यासमोर जाहीर सभेमध्ये यावर चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल, असे भालेकर यांनी सांगितले. लिलाव बंद करणार्‍या व्यापार्‍यांचे परवाने रद्द होण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा अहमदनगर : केंद्र शासन शेतकर्‍यांच्या मुळावर! जिल्ह्यातील उत्पादक शेतकर्‍यांसह नेतेही आक्रमक पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी : विनाहेल्मेटधारकांना नोटिसा; 7 महिन्यांत 4000 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा The post पारनेर : कडता बंद करण्यावर ‘परिवर्तन’ठाम; त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv0HyM

रूईछत्तीशी : पावसाअभावी खरीप पिके करपली

रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रूईछत्तीशी परिसरातील खरीप पिके पावसाअभावी करपून चालली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका, कापूस, सोयाबीन, ऊस, बाजरी या पिकांना पाण्याची गरज असूनस शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही पिकांची खुरपणी पूर्ण होऊन पिकांनी कात टाकली आहे, पण आता पाऊस नसल्याने पिके करपू लागली आहेत. शेतकर्‍यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. जनावरांच्या चार्‍यासाठी शेतात लावलेला ऊसदेखील करपू लागला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकत चारा घालण्याची वेळ आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांवर पडलेला रोग, मजुरांची कमतरता, यामुळे फवारलेले तणनाशक, यामुळे शेतकर्‍यांना खूप आर्थिक खर्च आला आहे. त्यातून सावरण्यासाठी पावसाने साथ देणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांचा दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. कांदा, कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. सरकारने तत्काळ पिकांचे पंचनामे करुन अनुदान जाहिर करावे व जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई देखील निर्माण झाली आहे. हेही वाचा बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचाच ‘तमाशा’; कलावंतांना जिवंतपणीच मरण यातना सिंधुदुर्ग : पावशीत कार-मोटरसायकलचा अपघात, एक गंभीर The post रूईछत्तीशी : पावसाअभावी खरीप पिके करपली appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StxWdS

टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरण पडणार कोरडेठाक!

दादा भालेकर टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर) : पारनेर तालुक्यासह पिंपळगावरोठा, सावरगाव, काळेवाडी नांदूरपठार, पळसपूर, काताळवेढे या परिसरात पाऊस न झाल्यामुळे पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेढे व पठारावरील 16 गावांची कान्हूर पठार या गावांना पाणी पुरवठा होत असलेली पाणीयोजना मांडओहळ धरणातून आहे. धरणात कमी प्रमाणात पाणी साठा शिल्लक असल्यामुळे पारनेर तालुक्यातील 73 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. अन्यथा, 2019 प्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मांडओहळ धरणाची मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. वासुंदे, खडकवाडी, पळशी या गावांतील 2 हजार 200 हेक्टर लाभक्षेत्र त्यावर अवलंबून आहे. सन 2022 मध्ये जून, जुलै व ऑगस्ट मध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण ओहरफ्लो झाले होते. परंतु, यावर्षी परिसरात पावसाने दडी मारल्याने धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा असल्याचे मांडओहळ प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजीत मोरे यांनी सांगितले. सन 1972 ला मांडओहळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सन 1983 ला धरणाचे काम पूर्ण झाले. धरणाची उंची 27.07 मीटर, लांबी 739.0 मीटर असून धरणासाठी 3 कोटी 62 लाख रुपये ऐकून खर्च झाला होता. तालुक्यातील सर्व तलाव कोरडे! पारनेर तालुक्यातील सर्वच तलाव सध्या कोरडेठाक आहेत. काळू प्रकल्प 38 टक्के, मांडओहळ 8 टक्के, तिखोल 0 टक्के, ढोकी एक 2 टक्के, ढोकी दोन 4 टक्के, भाळवणी 4 टक्के, मांडवे 0 टक्के, पळशी 1 टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे. रूईचोंडा धबधबा पर्यटकांविना! मांडओहळ धरण परिसरातील रुईचोंडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. निसर्गरम्य परिसर असल्याने मांडओहळ धरण व रूईचोंडा परिसरात नगरसह पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून पर्यटक हजेरी लावतात. मात्र, पावसाने दडी मारल्याने रूईचोंडा धबधब्याकडे पर्यटक फिरकताना दिसत नाहीत. हेही वाचा पाथर्डी : ‘अतिक्रमण हटाव’ला हिरवा कंदिल; न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला राहुल गांधी यांनी पेंगॉन्ग येथे राजीव गांधींना वाहिली श्रद्धांजली आरोग्‍य : अनास्थेचे बळी The post टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरण पडणार कोरडेठाक! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StvVlC

कोपरगाव : काकडी ग्रामपंचायतची रक्कम तातडीने देऊ : अजित पवार

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मौजे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी रक्कम देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची सुमारे 7 कोटी रुपये थकबाकी असून, ती तातडीने ग्रामपंचायतला देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर सदर थकीत कराची रक्कम त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस व पवार यांनी दिली. गुरुवारी काकडी येथे शिर्डी विमानतळालगत आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आले असता, माजी आमदार कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून याबाबत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काकडी ग्रामपंचायतच्या सरपंच पूर्वाताई गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, कानिफनाथ गुंजाळ, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय डांगे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब मोरे, इंद्रभान गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांचा समावेश होता. शिर्डी हे जागतिक ख्यातीचे देवस्थान असून, येथे श्री साईबाबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज असंख्य भाविक येतात. शिर्डीला येणार्‍या साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्याच कार्यकाळात 1 ऑक्टोबर 2017 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते. थकीत रक्कम देण्याचे अश्वासन ग्रामपंचायतची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे थकीत असलेली कराची सुमारे सात कोटी रुपयांची रक्कम तातडीने देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले. हेही वाचा कोळ्याच्या शरीरातून उगवली मोडासारखी बुरशी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी काय खावे? रात्रीच्यावेळी गोगलगायीकडून पिकं फस्त; शेतकऱ्याने काढले धक्कादायक व्हिडिओ The post कोपरगाव : काकडी ग्रामपंचायतची रक्कम तातडीने देऊ : अजित पवार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StsX74