पारनेर : कडता बंद करण्यावर ‘परिवर्तन’ठाम; त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही

August 22, 2023 0 Comments

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका बाजार समितीत शेतकर्‍यांच्या शेतमाल विक्रीवरील कडता कपात बंद केल्याशिवाय तालुका परिवर्तन फाउंडेशन आपले आंदोलन थांबविणार नाही, असे परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन वर्षांपासून पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनचा कडता पद्धतीला प्रखर विरोध असून, याबाबत आंदोलन सुरू केले आहे. 17 जुलैला याबाबत दिलेल्या निवेदनानंतर बाजार समितीने कडता बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याच्या विरोधात व्यापार्‍यांनी लिलाव बंद करीत शेतकर्‍यांची अडवणूक केली. यामध्ये सहभागी झालेल्या व्यापार्‍यांचे परवाने तातडीने रद्द करण्याची मागणी भालेकर यांनी केली आहे. याबरोबरच बाजार समितीचे संचालक आणि सचिवांवरही कारवाई करण्याबाबत पणन महामंडळाकडे तक्रार दिली असल्याचे भालेकर यांनी सांगितले. कडता बंद करण्यासाठी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, व्यापारी संचालक भळगट यांनी अर्बन बँक येथे भालेकर यांची भेट घेऊन त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. परंतु, आतापासूनच कडता कापला जाणार नाही, असे आश्वासन भालेकर यांनी कटारिया यांच्याकडे मागितले. त्यावर कटारिया यांनी तातडीने कडता बंद करत असून, आठ तारखेपर्यंत बाजार समिती व्यापार्‍यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कउता बंद झाला पाहिजे, अशी भूमिका भालेकर यांनी घेतली आहे. रेपाळे यांनी जाहीर माफी मागावी बाजार समिती आणि व्यापार्‍यांची बदनामी परिवर्तन फाउंडेशनने केल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणार्‍या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मारूती रेपाळे यांचा भालेकर यांनी निषेध केला आहे. जोपर्यंत रेपाळे हे जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही मुद्द्यावर तडजोड केली जाणार नाही आणि चर्चाही केली जाणार नाही, अशी भूमिका परिवर्तनने घेतली आहे. आता जाहीर सभेमध्येच चर्चा कडता बंदच झाला पाहिजे, अशी परिवर्तनची भूमिका असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापुढे बंद खोलीत बैठक होणार नाही. व्यापारी, बाजार समितीचे सर्व संचालक आणि शेतकरी यांच्यासमोर जाहीर सभेमध्ये यावर चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल, असे भालेकर यांनी सांगितले. लिलाव बंद करणार्‍या व्यापार्‍यांचे परवाने रद्द होण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा अहमदनगर : केंद्र शासन शेतकर्‍यांच्या मुळावर! जिल्ह्यातील उत्पादक शेतकर्‍यांसह नेतेही आक्रमक पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी : विनाहेल्मेटधारकांना नोटिसा; 7 महिन्यांत 4000 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा The post पारनेर : कडता बंद करण्यावर ‘परिवर्तन’ठाम; त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv0HyM

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: