टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरण पडणार कोरडेठाक!

August 20, 2023 0 Comments

दादा भालेकर टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर) : पारनेर तालुक्यासह पिंपळगावरोठा, सावरगाव, काळेवाडी नांदूरपठार, पळसपूर, काताळवेढे या परिसरात पाऊस न झाल्यामुळे पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेढे व पठारावरील 16 गावांची कान्हूर पठार या गावांना पाणी पुरवठा होत असलेली पाणीयोजना मांडओहळ धरणातून आहे. धरणात कमी प्रमाणात पाणी साठा शिल्लक असल्यामुळे पारनेर तालुक्यातील 73 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. अन्यथा, 2019 प्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मांडओहळ धरणाची मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. वासुंदे, खडकवाडी, पळशी या गावांतील 2 हजार 200 हेक्टर लाभक्षेत्र त्यावर अवलंबून आहे. सन 2022 मध्ये जून, जुलै व ऑगस्ट मध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण ओहरफ्लो झाले होते. परंतु, यावर्षी परिसरात पावसाने दडी मारल्याने धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा असल्याचे मांडओहळ प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजीत मोरे यांनी सांगितले. सन 1972 ला मांडओहळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सन 1983 ला धरणाचे काम पूर्ण झाले. धरणाची उंची 27.07 मीटर, लांबी 739.0 मीटर असून धरणासाठी 3 कोटी 62 लाख रुपये ऐकून खर्च झाला होता. तालुक्यातील सर्व तलाव कोरडे! पारनेर तालुक्यातील सर्वच तलाव सध्या कोरडेठाक आहेत. काळू प्रकल्प 38 टक्के, मांडओहळ 8 टक्के, तिखोल 0 टक्के, ढोकी एक 2 टक्के, ढोकी दोन 4 टक्के, भाळवणी 4 टक्के, मांडवे 0 टक्के, पळशी 1 टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे. रूईचोंडा धबधबा पर्यटकांविना! मांडओहळ धरण परिसरातील रुईचोंडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. निसर्गरम्य परिसर असल्याने मांडओहळ धरण व रूईचोंडा परिसरात नगरसह पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून पर्यटक हजेरी लावतात. मात्र, पावसाने दडी मारल्याने रूईचोंडा धबधब्याकडे पर्यटक फिरकताना दिसत नाहीत. हेही वाचा पाथर्डी : ‘अतिक्रमण हटाव’ला हिरवा कंदिल; न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला राहुल गांधी यांनी पेंगॉन्ग येथे राजीव गांधींना वाहिली श्रद्धांजली आरोग्‍य : अनास्थेचे बळी The post टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरण पडणार कोरडेठाक! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StvVlC

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: