संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बनावट सोने तारण ठेवून इंडियन ओव्हरसीज बँकेची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोने मुल्यांकनकार जगदीश सुभाष म्हसे व चार सोने तारण कर्जदारांनी संगनमताने पुर्वनियोजित कट करुन इंडियन ओव्हरसीज बँकेची 10 सोने तारण कर्ज प्रकरणात 21 लाख 91,677 रुपयांची फसवणूक केली. बनावट व खोटे सोने खरे असल्याचा बँकेस खोटा दाखला देत बँकेची फसवणूक केली. याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे शाखा शाखाधिकारी निवृत्ती नव्हाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, ता. संगमनेर), लहानू किसन नेहे (रा. नांदूर दुमाला ता. संगमनेर), मंगेश सपंत दिघे (रा. कोल्हे वाडी, ता. संगनमेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिस करीत आहेत. संगमनेरमध्ये यापूर्वीही अशा काही घटना घडल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. हेही वाचा सांगली : कडेगावात मोहरमची भावपूर्ण वातावरणात सांगता; जियारात होऊन ताबूतांचे विसर्जन माळीण दुर्घटनेला 9 वर्षे पूर्ण; ग्रामस्थांकडून मृतांना श्रद्धांजली पीक विम्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात 5.91 लाख नोंदणी The post संगमनेर : बनावट सोने ठेवत बँकेची 22 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SszdH5

शिर्डी: मी शिर्डीत प्रार्थना केली म्हणून कोल्हापूर चा पूर टळला | दीपक केसरकर

  
शिर्डी: शालेय शिक्षममंत्री दीपक केसरकर आता एका नव्या दाव्यानं चांगलेच चर्चेत आलेत. मी शिर्डीमध्ये असल्यानं कोल्हापुरात पूर न आल्याचा दावा केसरकरांनी केलाय. देवाकडे मी प्रार्थना करत होतो..असा दावा केसरकरांनी केलाय.

पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी

दीपक देवमाने जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. यंदा प्रथमच पीक विम्याचा शेतकऱ्यांचा हप्ता हा सरकारकडून भरण्यात येणार असून शेतकऱ्यांकडून केवळ नाममात्र १ रुपया घेण्यात येणार आहे. तसंच यंदा राज्यात पावसाची कमालीची असमानता दिसून आली. या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेकडे सर्वच शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने काही गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच वारंवार सर्व्हर बंद पडणे, नेटवर्क नसणे आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या काळात सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा भरता येईल, ही शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे या योजनेला किमान दहा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनाही ही अडचण सांगितली. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा भरता यावा म्हणून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या यंत्रणेला प्रत्येक गावात पाठवून तिथे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे फॉर्म मोफत भरुन घेण्यात येत आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचतोच पण अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत होत आहे. पीक विमा मुदत वाढविण्यासाठी सरकार सकरात्मक शेती हा बेभरवशाचा व्यवसाय आहे. सध्या पडत असलेला पाऊस पाहता सर्वच शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याकडे कल आहे. परंतु ऑनलाईन पीक विमा भरताना अनेक अडचणी येत आहे. हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यावर मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी मला आश्वस्त केलं आहे. तसंच सरकारशी केलेल्या चर्चेनुसार कुकडी कालव्यातून पाणी सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळं माझ्या मतदारसंघाला निश्चित दिलासा मिळेल. -रोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड  हेही वाचा संगमनेर तालुक्यात विकासकामे सुरूच राहणार : आ. बाळासाहेब थोरात कस्टम, ड्रग्ज फंडा घालतोय लाखोंचा गंडा संगमनेरात महिलेने घेतला एकाच्या हाताला चावा The post पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsxXmW

पारनेर : जळालेल्या झाडांच्या खड्ड्यात रोपण

शशिकांत भालेकर पारनेर(अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे 10 हेक्टरवर सुमारे 11 हजार रुक्ष लागवड करण्यात आली; मात्र या झाडांची लागवड फेल ठरली असल्याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने सातत्याने लावून धरले. संबंधित सामाजिक वनीकरणाच्या अधिकार्‍यांनी येथे लक्ष घालत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकारी गणेश गिरी यांच्यावर कारवाई करून याप्रकरणीचा खुलासा मागवण्यात आला असून, यानंतर त्यांचे सर्व अधिकार काढून दुसर्‍या अधिकार्‍यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. जळालेल्या झाडाच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्यात येणार आहे. मांडवे खुर्द येथे झालेली झाडे लागवड कागदावर केली. वृक्ष लागवडीनंतर फक्त एकदाच त्यांना पाणी घातल्याने हजारो झाडे जळून गेले होते. याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रकाशित केले होते. यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने या डोंगरावर लक्ष घालत जळालेले सर्व झाडे तातडीने पुन्हा लावली. या झाडांची तीन वर्षे काळजी घेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी दोषी असलेल्या वनपाल गणेश गिरी यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यात आपले काम बेजबाबदार करून कर्तव्यात कसूर केली व वरिष्ठांची दिशाभूल केली. झालेल्या दुर्लक्षित व दिरंगाईच्या कामामुळे रोपे जळून गेली. यात झाडांवर झालेला खर्च वसूल करून कर्तव्य कसूर व वरिष्ठांची दिशाभूल करण्याबाबत आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून क्षेत्रीय कामांचा सर्व कार्यभार इतर कर्मचार्‍यांकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यांच्यावर वनपरीक्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामे करावी, ही कामे करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई, बेजबाबदार पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसे आढळल्यास कारवाईस आपण जबाबदार राहाल, अशा प्रकारची नोटीस त्यांना देण्यात आली. वन विभागाने घातले लक्ष मांडवे खुर्द येथे गेल्या जुलै महिन्यात 11 हजार झाडे लावण्यात आली. त्यातील 80 टक्के झाडे जळून गेल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. यानंतर वन विभागाने लक्ष घालून येथे पुन्हा सर्व झाडांची लागवड केली. तसेच, याप्रकरणी जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करत नोटीस बजावत त्याचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. पुढेही राहणार ‘पुढारी’चे लक्ष झाडे लावल्यानंतर त्यांना पाणी घातले नाही. त्यामुळे झाडे जळून गेली. याप्रकरणी ‘पुढारी’ने लक्ष घालत सातत्याने वृत्त प्रकाशित केले. आज या डोंगरावर सर्व खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष जगविण्याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे. यापुढेही ‘पुढारी’चे लक्ष राहणार असून, ‘पुढारी’च्या या सामाजिक कार्याबाबत मांडवे खुर्द सरपंच, ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे. हेही वाचा नागापेक्षाही जहाल विषारी साप! नगर रोड परिसरातील रस्त्यांची लागली वाट ! शेवगाव : इथेनॉल प्रकल्पाचा काय फायदा? शेतकर्‍यांचा सवाल The post पारनेर : जळालेल्या झाडांच्या खड्ड्यात रोपण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsvQ5f

अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस; शेतकर्‍यांना दिलासा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : प्रदीर्घ विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार बरसात केली. दिवसभर संततधार सुरू होती. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. सखल भागात पाणी साठल्याने पाण्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. नोकरदार व शाळकरी मुलांची त्रेधातिरपीट उडाली. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकर्‍यांना गुरूवारच्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. बुधवारी रात्रीपासूनच नगर शहरासह जिल्ह्यात रिमझिम सुरू होती. गुरूवारी सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत होता. जोरदार पावसाने नगर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. रस्तेही पाण्यात बुडाले. रस्त्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. संततधार पावसाने नोकरदार व शाळकरी मुलांची त्रेधातिरपीट उडाली. जिल्ह्यात सर्वदूर प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाऊस पडला. या पावसाने शेतपिकांना संजीवनी मिळाली. पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी पेरणी केली, मात्र पावसाने दडी मारली. शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे असतानाच गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावत दिलासा दिला. जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण पाणलोटात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणातून विर्सगही सोडण्यात आला आहे. हेही वाचा शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा जवळ्यात दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण; पती गंभीर जखमी तिसगावमध्ये सरकारी जागेत बसून मावाविक्री The post अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस; शेतकर्‍यांना दिलासा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Ssrp7N

कोपरगाव : संवत्सरच्या पौराणिक शृंगेश्वर मंदिरात गर्दी!

महेश जोशी कोपरगाव(अहमदनगर) : दक्षिणकाशी गंगा गोदावरी नदीचा पवीत्र काठ कोपरगाव शहरासह तालुक्याला लाभला आहे. श्रीक्षेत्र संवत्सर येथे विभांडक ऋषींचे चिरंजीव शृंगऋषी यांचे पुरातन मंदिर आहे. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गामुळे संवत्सर- कोकमठाण गावचे ऐतिहासिक व पौराणिक पुरातन महत्व वाढले आहे. भारताचा पवित्र ग्रंथ श्रीराम-विजय कथासारमध्ये पान क्रमांक 38 ते 41 वर तसेच कथा कल्पतरू ग्रंथात विभांडक ऋषी व त्यांचे सुपुत्र शृंगेश्वर यांचा पौराणिक संदर्भ प्रकाशित झालेला आढळतो. नारद मुनींना भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार सहस्त्र नारी पाहुन मनात इच्छा प्राप्त झाली की, आपणही स्त्री व्हावं. भगवान श्रीकृष्णाने तथास्तु म्हटलं आणि नारदाने नदीत स्नान केल तेथेच ‘नारदाचं’ रूप ‘नारदी’ स्त्रीमध्ये झाले. कालौघात त्यांना 59 मुले व 1 मुलगी कपिला झाली. पुढे युध्दात नारदाची 59 मुले मारली गेली, अशी अख्यायिशका आहे. ही कथा द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण व नारदमुनी यांची आहे. कश्यप ऋषींचा मुलगा विभांडक आणि त्यांचा मुलगा शृंगेश्वर तप करता -करता त्यांच्या डोक्याला शिंग फुटले होते म्हणून त्यांचे नाव शृंगऋषी पडले. या शृंगेश्वर मंदिरामागे गोदावरी नदी काठी नारदाच्या मुलांच्या 59 समाध्या आजही साक्ष देतात. एकदा या शृंगेश्वर मंदिरावर इंद्राची सभा सुरू होती. या सभेस ऋषी-मुनीही उपस्थित होते. राजा इंद्राने वरूणराजाला विनंती केली, ‘पाऊस थांबवा. त्यावर ऋषीमुनींनी या घटनेला उशाप विचारला. तेव्हा शृंगेश्वर आश्रमात ऋषी भोजन घातल्यावर येथे पाऊस पडेल, असा उशाप दिला. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा संवत्सर येथे सुरू आहे, अशी अख्यायिका आहे. रोमचरण राजाच्या राज्यात 12 वर्षे दुष्काळ पडला होता, तेव्हा राजाने हे संकट कसे दुर होईल, असे विचारले असता शृंगऋषींना आणल्यावर ते दुर होईल, सांगण्यात आले होते. संवत्सर हा परिसर पुर्वी दंडकारण्यमय होता. प्रभु श्रीरामचंद्रांनी त्यांच्या 14 वर्षे वनवासाचा काही काळ येथे व्यतित केला. अयोध्येचे रघुवंश कुळातील राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी शृंगऋषींच्या हस्ते पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यावर पुत्र प्राप्त होईल, अशी भविष्यवाणी झाली होती. म्हणून राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. यज्ञ पाहण्यास अनेक राजांसह वामदेव, जबाली, शातातप, संजय, वसिष्ठ, कश्यप, कौंडीण्य, कण्व, गौरमुख, पाराशर, बकदाल्भ्य, शतानंद, सुमंतु, सौभरी, वेदविद, गार्ग्य, मार्कडेय, नारद व कौशिक हे ऋषी उपस्थित होते. हे सगळे संदर्भ तत्कालीन संपादक दामोदर सावळरामा यंदे प्रताप प्रकाशन (गिरगाव, मुंबई) यांच्या कथा कल्पतरू ग्रंथ स्तबक 3 मध्ये अधोरेखीत आहेत. या ग्रंथातून आपल्याला इतिहासाची ओळख होते. कोपरगावपासुन 10 कि. मी. अंतरावर संवत्सर गाव आहे. येथून नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्ग गेल्याने रस्त्यावरील भाविकही मोठ्या प्रमाणात शुंगेश्वर आश्रमात महादेवाच्या दर्शनास येतात. या मंदिराचा ब्रम्हलिन संत रामदासीबाबा, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व आत्मा मालिक (जंगलीदास माऊली) यांच्या हस्ते 1989 मध्ये जीर्णोध्दार झाला. गोदावरी नदीकाठी हे स्थान नयनरम्य स्थान आहे. श्रावणात येथे भाविकांची दर्शन व अभिषेकास मोठी गर्दी होते. अध्यात्मीक संत मीराबाई मिरीकर यांना शृंगेश्वर ऋषींच्या आश्रमातच साक्षात्कार झाला. हेहा वाचा अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या संगमनेर : महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार अहमदनगर : मुळा धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठ्याची नोंद The post कोपरगाव : संवत्सरच्या पौराणिक शृंगेश्वर मंदिरात गर्दी! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsnzPV

नगर : अंगणवाडी सेविकांचे धरणे ; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

नगर : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू, नंदा पाचपुते, अलका नगरे, संगिता विश्वास, रजनी क्षीरसागर, संगिता इंगळे, मन्नाबी शेख, अरुणा खळेकर, अलका दरंदले, सुजाता शिंदे, मंगल राऊत, प्रतिभा निकाळे, निर्मला चांदेकर, शशिकला औटी, शोभा विसपुते, सुनिता धसाळ, मंदा निकम, शकीला पठाण, सविता दरंदले, सुनिता बोरुडे, सरला राहणे, शोभा खंडागळे, नंदा राजगुरू, कुसुम भापकर, मंगल राऊत, अरुणा डांगे आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महिला व बालकल्याण विभाग यांच्या समवेत कृती समितीची चर्चा झालेली होती. यावेळी मंत्री महोदयांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी, शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, सेवानिवृत्तीनंतरचे थकीत एकरक्कमी लाभ तातडीने देणे यांसह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे प्रमुख नेत्यांनी सांगितले. The post नगर : अंगणवाडी सेविकांचे धरणे ; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Ssl89G

शिर्डी : अवैध वाहनांना श्रीसाईबाबा प्रसादालयासमोर प्रतिबंध..!

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात मोठे अशी गणणा असलेल्या श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालाच्या प्रवेशद्वारासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांसह रिक्षा स्टॅन्ड हटविण्याची कारवाई श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून श्रीसाईभक्तांना वाहनांच्या होणार्‍या त्रासापासून मुक्ती मिळाल्याची शहरात चर्चा सुरु आहे. शिर्डी वाहतूक शाखेच्या या दमदार कामगिरीचे श्रीसाईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्रीसाईबाबांच्या शिर्डी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे श्रीसाईबाबांच्या दर्शनास येणार्‍या पदयात्रींना चालण्यास अडथळा निर्माण होत असे. भाविकांच्या मुलभूत सुख-सुविधांसाठी आता शहरात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास शिर्डी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. शहरात या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी या मोहिमेत सक्रिय होत कारवाईचा बडगा उचलला. या मोहिमेत वाहतूक शाखेचे स. पो. नि. सचिन जाधव,पो.हे.काँ. सूरज गायकवाड, श्रीसाईबाबा संस्थानचे अधिकारी अतुल वाघ, श्रीसाई मंदिर सुरक्षा व्यवस्थेचे कोते यांच्यासह कर्मचारी अहभागी झाले होते. दररोज सुमारे 50 हजार भाविक श्रीसाई संस्थानच्या प्रसादालयात बाबांचा भोजन प्रसाद ग्रहण करतात. या प्रसादालयात येण्या- जाण्यासाठी प्रवेशद्वारासमोर खासगी वाहनांच्या गर्दीने भक्तांना प्रचंड त्रास होत होता. अनेक साई भक्तांनी अशी वाहने हटविण्यासाठी संस्थान प्रशासनासह पोलिसांकडे तक्रारी करूनही खासगी वाहन चालक मनमानी करीत रस्त्यावर रिक्षा, जीप, कार उभी करून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक करीत होते. अखेर श्रीसाईबाबा संस्थान व शिर्डी वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या कारवाईत वाहने व रिक्षा स्टँड हटवून 100 मीटर अंतरावर वाहनांना प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारासमोरील परिसर वाहनविरहीत झाला आहे. दोन्ही प्रवेशद्वारांसमोरचा परिसर वाहनविरहित ठेवा देश-विदेशातून भोजन प्रसाद घेण्यासाठी येणार्‍या भाविकांनी शिर्डी वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. दोन्ही प्रवेशद्वारासमोरचा परिसर कायमस्वरूपी वाहनविरहीत असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हेही वाचा राशीन नळयोजनेच्या पाण्याची चोरी राहुरी : तोतया अधिकारी जेरबंद ! अन्न, औषध प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी कोल्हापूर : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन The post शिर्डी : अवैध वाहनांना श्रीसाईबाबा प्रसादालयासमोर प्रतिबंध..! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SshMM0

पारनेर : शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांत काढा निकाली

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पारनेरच्या तहसीलदारांना दिले आहेत. शेतीमधील कमी होणार्‍या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत आहेत. तसेच, शेतीमाल बाजारात पोहोचविणे, यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते. शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड.प्रतीक्षा काळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. अ‍ॅड. काळे यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद करत शेतकर्‍याचा हा महत्त्वाचा प्रश्न पोटतिडकीने न्यायालयासमोर मांडला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. यावलकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत उच्च न्यायालयाने शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे आदेश पारनेरच्या तहसीलदारांना दिले आहेत. शिवपानंद शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व निश्चिती करावी, यासाठी शरद पवळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती केली. परंतु, सदर प्रश्न आजही जैसे थे च आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी शरद पवळे यांनी उच्च धाव घेतली होती. पाहिल्याच सुनावणीत याचिका निकाली निघाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा तहसीलदार कशा पद्धतीने अवलंब करतात व शेतकर्‍यांना रस्ता काढून देतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. अधिकार्‍यांकडून शासन निर्णय पायदळी राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व निश्चिती करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. परंतु, प्रशासकीय अधिकारी सदर शासन निर्णयातील निर्देश पायदळी तुडवित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळत नसल्याचे पवळे यांनी म्हटले आहे. हेही वाचा Fever : ताप का येतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण आरसी बुक, परवाना स्मार्ट कार्ड छपाई पुण्यातच : परिवहन आयुक्त विवेक भिमनवार कोल्हापूर : उत्रे येथे जनावरांच्या गोठ्याला आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू The post पारनेर : शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांत काढा निकाली appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Ssch4C

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक : बाळासाहेब थोरात

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण देशामध्ये भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. त्यांनी धर्माच्या नावाखाली राज्यात शिवसेना पक्ष फोडला त्या पाठोपाठ राष्ट्रवादीही फोडली. भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांबवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, दरेवाडी ते कवठे मलकापूर डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर ,माजी जि. प. सदस्य अजय फटांगरे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, मांडवेचे माजी उपसरपंच भाऊसाहेब डोलनर, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सचिन खेमनर, आण्णासाहेब कुदनर, जय राम ढेरंगे, आदींसह पठार भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. थोरात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यासह पठार भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर नवीन कामांच्या निधीला स्थगिती दिली. या स्थगितीबाबत आपण सातत्याने विधान भवनात आवाज उठविला. त्यानंतर सध्याच्या सरकारने स्थगिती उठवली असल्यामुळे ही कामे आता वेगाने सुरू होणार आहेत. आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही जण अपवाद आहेत, असे देखील थोरात म्हणाले. भाजप सरकारच्या काळात संपूर्ण देशात वाढलेली बेरोजगारी आणि वाढती महागाई यावर देशातील जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळ हा काँग्रेसचाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा: शिर्डीत नाईट लँडिंग सेवेवरून आ. थोरातांनी धरले धारेवर! अहमदनगर जिल्ह्यात अडीच लाख बेरोजगार तरुण अहमदनगर : भावाकडून अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती   The post भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsZpW1

हिंदूजन आक्रोश मोर्चामुळे दणाणले कोपरगाव शहर..!

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हिंदू भगिणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (गुरुवाधरी) सकल हिंदू समाजाच्यावतीने कोपरगावात सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवून शहरासह तालुक्यातील तब्बल 80 गावांमधील हिंदू बांधव, भगिणी, महिला, तरुण व सर्वपक्षीय हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लव- जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सकाळी 10ः30 वा. मोर्चा सुरु झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, अण्णाभाऊ साठे की जय, भारत माता की जय, गर्व से कहो हम हिंदू हैं, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे आदी घोषणांनी मोर्चेकर्‍यांनी शहर परिसर दणाणून सोडला. हिंदू भगिणीवर अत्याचार झालेल्या शहरालगतचा अवैध मदरसा 24 तासांच्याआत काढावा, शहरात मस्जिदवरील भोंगे तातडीने बंद करावेत, अन्यथा त्यांच्यासमोर हिंदूंच्या घरांवर प्रति भोंगे लावू, असा सज्जड इशारा सुदर्शन वाहिनीचे प्रमुख संचालक सुरेश चव्हाणके यांनी यावेळी दिला. दरम्यान, लव- जिहाद विरोधात कठोर कायदा करून, त्याची राज्यात अंमलबजावणी करावी, गोहत्या बंद करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. मोर्चाचे एक टोक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून गांधी चौक, गांधीनगर, श्रीराम मंदिर रोडपर्यंत दुसरे टोक होते. तहसील कार्यालयासमोरून धारणगाव रोड येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याला वळसा घालून मुख्य रस्त्यावर स्मारकाजवळ मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. मोर्चेकरांच्या हातात विविध फलक, भगवे ध्वज, डोक्यात भगव्या टोप्या, महिलांनी परिधान केलेल्या भगव्या साड्यांमुळे सर्व परिसर भगवामय झाला होता. चव्हाणके म्हणाले, कोपरगावचा परिसर ऐतिहासिक पौराणिक संदर्भाचा आहे. येथे गुरु शुक्राचार्य महाराजांचे जगातील एकमेव मंदिर आहे. संजीवनी मंत्राची येथे उत्पत्ती झाली. हे अतिशय धार्मिक ठिकाण आहे, मात्र कोपरगाव शहरातकडे बारकाईने लक्ष दिले नाही, म्हणून पाकिस्तान व बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते, असे निदर्शनास आणून देत चव्हाणके म्हणाले, हिंदूंनी या प्रकाराला प्रखर विरोध केला पाहिजे. अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठले पाहिजे. दक्षिण गंगा गोदावरी किनारी हनुमान मंदिर परिसर, सुभाष नगर काबीज केला जात आहे, याबाबत हिंदूंना पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शहर परिसरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर आल्याचा दावा चव्हाणके यांनी केला. शहरात अवैध कत्तलखाने तातडीने बंद करा, धर्मांतरण बंदी कायदा त्वरित आणावा, इस देशमें रहना है तो, वंदे मातरम् कहेना होगा, असा इशारा अबू आजमी यांना देऊन टिपू सुलतान जयंती बंद करावी, हिंदू मंदिरात ड्रेस कोड त्वरित लागू करावा, जनसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, अशा मागण्या चव्हाणके यांनी केल्या. यावेळी सागर बेग यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. लव- जिहादसारख्या प्रकरणात पोलिस गुन्हे दाखल करीत नाहीत. लव- जिहाद्यांनी नगर जिल्ह्याला विळखा घातला आहे. अनधिकृत मदरशांविरुद्ध कारवाई करावी, हिंदू मुलींना न्याय मिळालाच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हर्षदा ठाकूर व श्वेता शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी मंजूरचे संत शिवानंदगिरी महाराज, कुंभारीचे राघवेश्वरानंद महाराज, माजी आ. स्नेहलता कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, पुष्पाताई काळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, हजारो नागरिक व महिला उपस्थित होत्या. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ येऊन निवेदन स्वीकारले. सूत्रसंचालन करुन संतोष गंगवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कोपरगाव शहराला आले छावणीचे स्वरुप..! हिंदू जनक्रोश मोर्चासाठी1 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 1 अप्पर पोलिस अधीक्षक, 5 उपविभागीय पोलिस अधिकारी, 17 पोलिस निरीक्षक, 38 सहाय्यक पोलिस निरीक्षक व उप निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या 6 प्लाटून, 326 पोलिस अंमलदार, 50 महिला राखीव पोलिस, साध्या वेषातील पोलिस असा पोलिस बंदोबस्त तैणात ठेवल्याने कोपरगावला जणू छावणीचे स्वरुप आले होते. * कोरोनानंतर प्रथमच कोपरगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. * सभा सर्वांना पाहता यावी यासाठी मोठे स्क्रीन (एलसीडी) लावले होते. * मोर्चेकरांसाठी ठिक-ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती. * भगवे ध्वज, भगव्या टोप्या, उपरण्यांमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसले. * मुख्य रस्त्यांवर दुतर्फा इमारतींवर महिलांची गर्दी होती. * फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची केली मागणी हेही वाचा अर्जुन चौथ्यांदा झाला पिता, गॅब्रीएलाने दुसऱ्यांदा दिला मुलाला जन्म संतापलेल्या विद्यार्थ्यांनी चार एसटी बस रोखल्या ; कमी फेऱ्यांमुळे संताप महत्त्वाची बातमी ! वरंधा घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीकरिता बंद The post हिंदूजन आक्रोश मोर्चामुळे दणाणले कोपरगाव शहर..! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsXkgy

कोपरगावच्या प्रश्नांवर मंत्री विखेंची सकारात्मक भूमिका

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्नांबाबत आ. आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. यावेळी कोपरगावात उपकारागृहाच्या नवीन इमारत प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगाव मतदार संघातील शेती महामंडळाच्या जमिनी गावठाण विस्तारीकरणास गावांना मिळाव्या, वाकडीगावच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावास आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मुल्यांकन माफ करावे आदी विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी आ.काळे यांनी कोपरगावातील उपकारागृहाच्या दुरावस्थेची माहिती मंत्री विखे पा. यांच्यापुढे कथन केली. उपकारागृह इमारत अनेक वर्षांपूर्वीची आहे. सद्यस्थितीत ती मोडकळीस आल्याने तिची दुरावस्था झाली आहे. उपकारागृहात कोपरगावसह राहाता तालुक्यातील आरोपींना ठेवले जाते. कारागृहाची क्षमता कमी असूनसुद्धा एका बराकीत 10 पेक्षा जास्त आरोपी ठेवले आहेत. क्षमता वाढविण्यासाठी उपकारागृह नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महसूल ई-8 या विभागाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी संबंधित विभागाला सूचना देवून सहकार्य करावे, अशी मागणी आ. काळे यांनी केली. कोपरगाव मतदार संघातील 79 गावांमध्ये नागरिकांना आवश्यक मुलभूत सोयी -सुविधा निर्माण करण्यास ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सोयी- सुविधांचा अभाव आहे. लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे, परंतु त्यांना स्वत:ची जागा नसल्यामुळे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. यामुळे या समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघातील ज्या गावांमध्ये शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे, अशा गावांना गावठाण विस्तारीकरण व सोयी- सुविधा निर्माण करण्यास शेती महामंडळाची जमीन मिळावी. वाकडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावास आवश्यक असलेली स्वतःच्या मालकीची जागा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले. साठवण तलावाकरीता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची गट नंबर 216 मधील 4 हेक्टर 88 आर जागा मिळण्याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. साठवण तलावाला देण्यासाठी शेती महामंडळाने तयारी दर्शविली, परंतु या क्षेत्राची शेती महामंडळाने चालू बाजारभावाप्रमाणे येणार्‍या मूल्यांकनाची शेती महामंडळाने मागणी केली आहे. ही रक्कम 1 कोटी 87 लाख 38 हजार एवढी आहे. वाकडी ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे वाकडी ग्रामपंचायत जमीन मूल्यांकनाप्रमाणे एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडकला आहे. यामुळे या जागेचे मूल्यांकन माफ करून वाकडीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आ. काळे यांनी महसूल मंत्री विखे पा. यांच्याकडे केली. अनेक गावांमध्ये शेती महामंडळाच्या जागेवर अनेक वर्षापासून भूमिहिन नागरिक वास्तव्यास आहेत. या रहिवाशांच्या जागा नियमानुकूल कराव्या, अशा विविध मागण्या केल्या. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य..! सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आ. आशुतोष काळे यांना दिली. The post कोपरगावच्या प्रश्नांवर मंत्री विखेंची सकारात्मक भूमिका appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsTzhm

खबरदार...छेड काढणारांची धिंड काढणार ! अध्यक्ष शिवाजी कर्डिले

करंजी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षणासाठी बाहेरगाहून येणार्‍या मुलींची काही टवाळखोर छेड काढत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापुढे शालेय विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार झाल्यास खबरदार…गावभर धींड काढल्याशिवाय राहणार नाही, यामुळे पोलिसांनीही याची गंभीर दखल घ्यावी. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूचक इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी छेड काढणार्‍या तरुणांसह पोलिस प्रशासनाला दिला आहे. मंगळवारी तिसगाव येथील वृद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांच्यासह पोलिस उपाधीक्षक प्रवीण पाटील, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, माजी सभापती काशिनाथ लवांडे, पुरुषोत्तम आठरे, संस्थेचे सदस्य अरुणराव आठरे, डॉ. बाळकृष्ण मरकड, चंद्रकांत पाटील म्हस्के, माजी सदस्य सुनील परदेशी, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर कायंदे, कौशल्यनिरंजन वाघ, सरपंच इलियास शेख, विक्रमराव ससाने, सरपंच नितीन लोमटे, युवानेते मनोज ससाने, बंडू पाठक, संतोष शिंदे, धीरज मैड, दादासाहेब चोथे, सरपंच महेश लवांडे, दिलीप वांढेकर, राजेंद्र दगडखैर, सुरेश चव्हाण, अकील लवांडे, संजय लवांडे, प्रसाद देशमुख, साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, बाबा पुढारी, मन्सूर पठाण, पंकज मगर, लतीफ शेख, वहाब इनामदार आदी उपस्थित होते. तिसगावमध्ये छेडछाड होत असल्याने काही पालकांनी पाथर्डी शहरात मुलींना प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. शाळेत गेलेली मुलगी पुन्हा घरी सुरक्षित येईल की नाही, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांनी छेडछाड करणार्‍या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, ही अतिक्रमणे काही चुकीच्या गोष्टी घडण्यास कारणीभूत ठरत असल्याने शाळा परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची गरज असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले. कडक कारवाई करणार : पाटील पोलिस उपधीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, यापुढे तिसगावमध्ये छेडछाड करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात येईल. संस्थेकडे बोट करून चालणार नाही : आठरे तिसगावमध्ये अडीच-तीन हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामुळे तिसगावचा नावलौकिक झाला आहे. त्यामुळे शाळेत येणार्‍या मुला-मुलींना त्रास होणार नाही, याची दक्षता तिसगावकारांनी घेतली पाहिजे. केवळ संस्थेकडे बोट करून चालणार नाही, अशी भूमिका अरुण आठरे यांनी व्यक्त केली. अवैध धंदे परिसरातून हद्दपार करा : लवांडे तिसगावातील विद्यालय सुरू व्हावे यासाठी आम्ही सुरुवातीपासून सहकार्याची भूमिका घेतली; परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यातून कमवलेला पैसा आणि संपत्तीच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवली जात असून, तिसगावचे वातावरण दूषित करण्याचे काम सुरू आहे. विद्यालय परिसरात मटका, जुगार, चक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. सर्व अवैधधंदे हद्दपार केल्यानंतर टवाळखोरांचे चौकात थांबणे बंद होणार, असे काशिनाथ लवांडे म्हणाले. The post खबरदार...छेड काढणारांची धिंड काढणार ! अध्यक्ष शिवाजी कर्डिले appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsR91Z

पावसाने अडविली खरिपाची वाट !

ज्ञानदेव गोरे :  वाळकी : नगर तालुक्याच्या दक्षिण भागात वळीव पावसाने तर मान्सून पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी दमदार पावसाची अजुनही शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. दिवसभर वाहणारा वारा अन् आकाशात दिसणार्‍या पोकळ ढगामुळे शेतकरी हैराण आहे. पावसाने खरीपाची वाट अडविली असल्याने तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत. बळीराजा आता पुनर्वसु नक्षत्रातील पावसाच्या प्रतिक्षेत आहे. यंदाही पावसाची बंडखोरी कायम असल्याने खरीपाची वाट खडतर बनली आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव, राळेगण, देऊळगाव सिद्धी, वडगाव तांदळी, रुईछत्तीशी, गुणवडी, हातवळण, मढपिंप्री, दहिगाव, साकत, वाटेफळ, घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, भोरवाडी परिसरात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांच्या बहुतांशी पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात 27 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे; मात्र तालुक्याच्या उत्तर भागात जास्त झाल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरणीही लांबणीवर गेली. काही ठिकाणी जुन महिन्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने, पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, उगवण झालेल्या पिकांची पावसाअभावी बिकट परिस्थिती बनली आहे. परिणामी या ठिकाणचे शेतकरी संकटात सापडले आहेत. दररोज केवळ ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र पडत नसल्याचे चित्र आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव, सारोळा कासार परिसरात पावसाच्या आशेवर शेतात पेरलेले उगवले.. मात्र उगवलेले पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. निसर्गाच्या बेगडी प्रेमाने बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवले..अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणार्‍या काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे. यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खोटा ठरला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, उडीद पिके शेताततून उगवत आहे. तर काही उगवले आहेत. ही पिके शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र परिसरात आहे. दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर तालुक्यातील दक्षिण भागातील हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. शेतकर्‍यांना नुकसानीच्या संकटाचा सामना करावा लागणार असून, शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकीर दिसते. मात्र, संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर सोडाच, पण पावसाचा एक थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंतात आहे. दुसर्‍या दिवसाची वाट पहातो आहे. आता, खरीपाच्या पेरण्या होणार की, नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट नगर तालुक्यात ठरावीक गावे वगळता अन्य ठिकाणी दमदार पाऊस पडलेला नाही. अल्प स्वरुपाच्या पावसावर खरीपाची पेरणी शेतकर्‍यांनी केली. पिकांची उगवण झाली; मात्र पावसाने दांडी मारल्याने या पिकांचे भवितव्य धोक्यात आले. दोन चार दिवसांत पावसाचे आगमण न झाल्यास उगवण झालेली पिके जळतील अशी भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले. पावसा अभावी खरीपातील मूग, उडीद पेरणी वाया गेली. इतर पिकांच्या पेरण्याही खोळंबल्या असून, शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करून नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. आता, 25 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला तरच शेतकर्‍यांना बाजरी, तूर, मका व सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.                                   -पोपटराव नवले, उपविभागीय कृषी अधिकारी, नगर    The post पावसाने अडविली खरिपाची वाट ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsNBbd

राजकीय उलथापालथीत राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : आ. थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला राज्यात पाऊस नसल्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मात्र मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे पडले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची टीकामाजी कृषीमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पावसाळी अधि वेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारवर केली.  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. या पावसाळी अधिवेशनात  बोलताना आ थोरात म्हणाले की राज्यात मान्सून उशिराने सुरू झाला आहे. मात्र, तोही म्हणावा असा पडत नाही त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या २० टक्केच खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी तर पेरण्याच झालेल्या नाही असे चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या मुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस आठ दिवसात मदत पाठवतो असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता. परंतु, तो अद्यापही सरकारने तोशब्द पूर्ण केला नसल्याचा आरोप आ थोरात यांनी केला तसेच सरकारनेकांदाउत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले परंतु ते अनुदानही अद्याप ही कांदा उत्पादक शेत कऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नसल्याचा आरोप आ थोरात यांनी राज्य सरकारवर केला बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्या कडे शासनाचे दुर्लक्ष – आ थोरात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे खते बाजारामध्ये विक्रीसाठीआले आहेत तर काही जणांनी सरकारी टोळ्या दाखवून त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्या चाही कार्यक्रम राज्यात सुरू केला आहे या गंभीर प्रकाराकडे राज्यसरकारचे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी केला The post राजकीय उलथापालथीत राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : आ. थोरात appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsKMnC

संगमनेरात फक्त 25 टक्के पेरण्या

संगमनेर शहर : शिवाजी क्षीरसागर : संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जून महिना संपून जूलैचे 15 दिवस उलटले तरी पावसाची टक्केवारी अतिशय कमी आहे. योग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळबल्या आहेत. तालुक्यात अवघ्या 25 टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी दिली. तालुक्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला होता. शिवाय अवकाळी पावसाने वर्षभर हजरी लावल्याने पाण्याची पातळी समाधान कारक होती. यामुळे पिके चांगली बहरली होती. चालू वर्षीही अशाच अनुभवाची प्रतिक्षा असताना जून महिना सुरू होताच मुबलक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. खरीपाच्या शेती मशागतीच्या कामांना गती आली होती. पेरणीसाठी वावर तयार करून पावसाची प्रतिक्षा असताना सुरूवातीलाच पावसाने उशिरा हजेरी लावली. यामुळे अंदाज चुकल्याने शेतकरी आजही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यात बहुतांश शेती पावसावर अवलबून आहे. यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांना खरीप हंगाम महत्वाचा आहे, पण यंदा पाऊस लांबल्याने चिंतेचे वातावरण असून, दुष्काळाची भिती व्यक्त केली जात आहे. मागिल वर्षी ऊस व कांदा सोडून खरिपाची 59 हजार 997 हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यात भात, बाजरी, मका, तृणधान्य 30105 हेक्टर , भुईमुग , सोयाबीन 25975 हेक्टर तर कापुस 2145 हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. ऊसाचे क्षेत्र 1500 हेक्टर तर काद्दाचे क्षेत्र 1447 होते. मागिल वर्ष समाधान कारक जात असताना यंदा पाऊस लाबल्याने पेरण्या खोळबल्या आहेत. जून महिन्यात 37.3 मिमी तर 9 जूलै पर्यंत 19.7 मिमी पाऊस पडला. यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या, पण पावसाने पाठ फिरविल्याने अंदाज चुकले. यंदा खरिप हंगाम अडचणीत सापडला आहे. पेरण्या उशिरा झाल्या तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. यंदाच्या खरिपाचा विचार करता कृषी विभागाने अंदाज वर्तविला आहे. भात बाजरी व मका क्षेत्र 30993 हेक्टर, तूर मूग व उडीद 484 हेक्टर, भूईमुग व सोयाबीन 22776 हेक्टर, कापुस 230 हेक्टर , ऊस 3200 हेक्टर तर कांदा 1120 हेक्टवर लागवडीचा अंदाज आहे. यात परिस्थितीनुसार चढ- उतार होतो. यंदा ऊस क्षेत्र वाढले तर कांदा, भुईमुग व सोयाबीन क्षेत्र मात्र घटले आहे. कडधान्य पिकाचे क्षेत्रही हळू-हळू कमी होत असून, भाजीपाला पिकाकडे शेतकरी वळत आहे. भंडरदरा व निळवंडे धरण क्षेत्रात पाऊस चांगला होत असल्याचे दिलास दायक चित्र आहे. नोव्हेबर 2023 अखेर पाटाचे पाणी देण्याचे नियोजन असल्याने दुष्काळी भागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाळी शेती करणारा शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने डोळे वटारले आहे. परिणामी शेती पिकेधोक्यात आल्याने बळीराजापुढे आणखी एक नवे संकट उभे राहिल्याची बिकट परिस्थिती दिसत आहे. हे ही वाचा : नगर : जमीन मोजणीस आलेल्या अधिकार्‍यांना पिटाळले..! Ajit Pawar Group Meet Sharad Pawar : मोठी बातमी; अजित पवारांसह गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण The post संगमनेरात फक्त 25 टक्के पेरण्या appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsGlBm

चौंडी जिल्हा परिषद शाळेला निधी सरकारने मंजूर केला : आमदार प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी दोन कोटी तीन लाख 43 हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांशी संबंधित 10 ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती. तसेच, विधीमंडळ सदस्याच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली होती. यानंतर मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सरकारने या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आला आहे. आमदार प्रा.राम शिंदेंचा पाठपूरावा चौंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयाचे राज्यातून कौतूक होत आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे चोंडी शाळेला भरीव निधी मंजूर झाला आहे. चोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. The post चौंडी जिल्हा परिषद शाळेला निधी सरकारने मंजूर केला : आमदार प्रा. राम शिंदे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsDnKv

Cover up Hair Thinning & Bald Patches in Seconds | Most Natural Hair Toppers in India #Shorts

Cover up Hair Thinning & Bald Patches in Seconds | Most Natural Hair Toppers in India #Shorts

If you're someone who has hair thinning and grey roots on the top that you want to cover up, then 1 Hair Stop's New Limited series of 3x5" T Silk topper is a must have product for you. This size is a new launching size in our silk topper collection series. This topper covers the hair thinning area and grey roots perfectly without adding too much volume. The Silk base of the topper gives the most natural looking hair parting and makes it look like your own natural scalp. The adjustable band attached to the topper makes sure you get the right grip around your head without making it look bouncy and it helps the front of the topper to lay flat on your scalp. Silk Topper used in the video - 3x5" T Silk Topper Shop the 3x5" T Silk Topper here - https://1hairstop.in/collections/silk-hair-toppers Shop our whole collection here - https://1hairstop.in/ ♥ Instagram - https://bit.ly/3adMoMy ♥ Facebook - https://bit.ly/3mNBBO6 ♥ Website - https://bit.ly/3uTlfqg Get in touch with us! 📞 +91 86882 47247 ✉️ care@1hairstop.in Like, share and subscribe for more hair tutorials and easy hairstyle videos! #hairtoppers #silkhairtoppers #hairwigs #wigsforwomen #humanhair #humanhairtoppers #humanhairwigs #humanhairextensions
via YouTube https://www.youtube.com/watch?v=QaXKSkhYhl4

संगमनेर पोलिसांकडून महिलांच्या वेशातील विदर्भातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: महिलांचा वेश परिधान करुन भर रस्त्यामध्ये वाहने अडवून त्यांना लुटणाऱ्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. त्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी दरोड्याच्या साहित्यासह चारचाकी वाहन असा सुमारे २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पत्रकार परिष देत दिली. संगमनेर शहरातील पावबाकी रस्त्या जवळील एका उपनगरात बुधवारी मध्य रात्री चार वाजण्याच्या सुमारास एका दुकानामध्ये तरुणी पाहून तृतीय पंथीयांचा वेश परिधान केलेले दोघेजण घुसले. त्यांनी त्या तरुणीकडे पैसे मागितले. तिने पैसे दिल्यानंतर त्यांनी तिला तिच्या कानातील दागिने काढण्यास सांगितले. त्यामुळे तिला संशय आला. तिने आरडाओरडा केला अन त्या तृतीयपंथीयांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत तिने थेट ११२ नंबरला फोन लावून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसाचे नाकाबंदी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पो.हे. कॉ. विजय खाडे, पोना. विजय पवार, पो. कॉ.विशाल कर्पे, रोहिदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्मराम पवार यांच्या पथकाने २०० मीटर पाठलाग करत त्या सहाही दरोडेखोरांना पकडले आणि वाहनासह त्यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पकडलेल्या या दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, चार चाकी वाहन, लोंखडी कडे, साडी व मिरची पूड तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ८३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पो. कॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय मारुती शिंदे (वय 25, रा.चिसखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि बुलढाणा), सुनील बाबुराव सावंत (वय ३२ रा.टाकळी तलाव, ता. खामगाव, जि.बुलढाणा), राजेश शंकर शेगर (वय 25, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), साजन शिवलाल चव्हाण (वय 25, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि किशोर महादेव इंगळे (वय 21, रा. टाकळी तलाव, पो. ढोरप गाव, ता. खामगाव जि. बुलढाणा) या सहा जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी सतर्क झालेली होती. त्यामुळे गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टू प्लसमधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी व पेट्रोलिंग करणे अशा प्रकारच्या समांतर कारवाया चालू होत्या. परंतु, पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नसलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्यात पथकाने ही दरोडेखोर पकडण्याची धडक कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हेही वाचा: लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका !   The post संगमनेर पोलिसांकडून महिलांच्या वेशातील विदर्भातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsBYXX

नगर : शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार : राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कृतिशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी व शासनाने राबवलेल्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात टाकळीमिया येथे करण्यात आली आहे. आगामी होणार्‍या निवडणुका शिवसेना पक्ष धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार असल्यांचे शिवसेना शिंदे गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे सांगितले. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवदूतांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, ता. उपाध्यक्ष प्रशांत खळेकर, ता. संघटक महेंद्र उगले, शेतकरी सेना प्रमुख किशोर मोरे, महिला आघाडी अध्यक्ष .वानिता जाधव उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना लांबे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे शासन स्तरावर कामे अडकली असतील तर शिवदुतांनी स्वतः लक्ष घालून शासकीय कार्यालयातून कामे मार्गी लावावीत शासनाने 1 रूपयात पीक विमा उतरविण्याचे आदेश दिलेले आहेत. पिक विमा उतरवताना शेतकर्‍यांकडून सेतू चालक पैशाची मागणी करत असल्यास तहसिलदार यांच्याकडे तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्राचे बूथ प्रमुख नेमण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रू. पाच लाख मध्ये सर्व उपचार केले जाणार आहेत, या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे, याची जनजागृती करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. तालुक्यात होणार्‍या निवडणुका खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असून शिवसेना पक्षाचे मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांनी शिवसैनिकांना विचारात न घेतल्यास तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी सक्षम आहे. या निवडणुका लढवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याची सुचाना तालुकाध्यक्ष लांबे यांनी दिल्या. याप्रसंगी अशोक शेळके, बाळासाहेब जाधव, वनिताताई जाधव, संदीप गल्हे, बापूसाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे, वसंत कदम, सतिष चोथे, रोहित नालकर, अरुण जाधव, नानासाहेब काचोळे, भागवत करपे, रमेश म्हसे, ज्ञानेश्वर सप्रे, दिनकर मोरे, दादासाहेब शिंदे, कल्पना धनवटे, बाळासाहेब कदम, दत्तात्रय कणसे, संगीता गायकवाड, गणेश विटनोर, मंदा साळवे, राणी साळवे, गयाबाई करपे, दत्तात्रय आढाव, प्रभाकर तुपे, रमेश सोनवणे, कमल घोरपडे, स्वाती करपे, नारायण शेटे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र शेळके यांनी तर आभार प्रणय पटारे यांनी मानले. हे ही वाचा :  मंचर : नियंत्रण सुटल्याने खोल दरीत बस कोसळली; ३ जण गंभीर नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण The post नगर : शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार : राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Ss63Wh