नगर : शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार : राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे

July 13, 2023 0 Comments

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कृतिशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी व शासनाने राबवलेल्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात टाकळीमिया येथे करण्यात आली आहे. आगामी होणार्‍या निवडणुका शिवसेना पक्ष धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार असल्यांचे शिवसेना शिंदे गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे सांगितले. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवदूतांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, ता. उपाध्यक्ष प्रशांत खळेकर, ता. संघटक महेंद्र उगले, शेतकरी सेना प्रमुख किशोर मोरे, महिला आघाडी अध्यक्ष .वानिता जाधव उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना लांबे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे शासन स्तरावर कामे अडकली असतील तर शिवदुतांनी स्वतः लक्ष घालून शासकीय कार्यालयातून कामे मार्गी लावावीत शासनाने 1 रूपयात पीक विमा उतरविण्याचे आदेश दिलेले आहेत. पिक विमा उतरवताना शेतकर्‍यांकडून सेतू चालक पैशाची मागणी करत असल्यास तहसिलदार यांच्याकडे तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्राचे बूथ प्रमुख नेमण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रू. पाच लाख मध्ये सर्व उपचार केले जाणार आहेत, या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे, याची जनजागृती करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. तालुक्यात होणार्‍या निवडणुका खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असून शिवसेना पक्षाचे मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांनी शिवसैनिकांना विचारात न घेतल्यास तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी सक्षम आहे. या निवडणुका लढवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याची सुचाना तालुकाध्यक्ष लांबे यांनी दिल्या. याप्रसंगी अशोक शेळके, बाळासाहेब जाधव, वनिताताई जाधव, संदीप गल्हे, बापूसाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे, वसंत कदम, सतिष चोथे, रोहित नालकर, अरुण जाधव, नानासाहेब काचोळे, भागवत करपे, रमेश म्हसे, ज्ञानेश्वर सप्रे, दिनकर मोरे, दादासाहेब शिंदे, कल्पना धनवटे, बाळासाहेब कदम, दत्तात्रय कणसे, संगीता गायकवाड, गणेश विटनोर, मंदा साळवे, राणी साळवे, गयाबाई करपे, दत्तात्रय आढाव, प्रभाकर तुपे, रमेश सोनवणे, कमल घोरपडे, स्वाती करपे, नारायण शेटे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र शेळके यांनी तर आभार प्रणय पटारे यांनी मानले. हे ही वाचा :  मंचर : नियंत्रण सुटल्याने खोल दरीत बस कोसळली; ३ जण गंभीर नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण The post नगर : शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार : राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Ss63Wh

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: