कलाबेन डेलकर यांचे मातोश्रीवर जंगी स्वागत; CM ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या...

मुंबई: लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर प्रथमच यश मिळवत इतिहास रचला. लोकसभा मतदारसंघात उमेदवार यांनी भाजप उमेदवाराचा धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला. या निकालाची चर्चा देशभरात होत असताना कलाबेन यांनी आज मुंबईत मातोश्री निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी कलाबेन यांचे औक्षण केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना कलाबेन यांनी हृद्य भावना व्यक्त केल्या. ( ) वाचा: दादरा नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांवर गंभीर आरोप केले होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने मोठा आघात डेलकर कुटुंबावर झाला होता. या संकटाच्या वेळी शिवसेना नेतृत्वाने डेलकर कुटुंबाला धीर दिला. त्यानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर व मुलगा अभिनव डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आणि एका निश्चयाने त्या लढल्या. त्यांनी भाजप उमेदवाराचा दारूण पराभव केला. शिवसेनेसाठी हा विजय अनेक अर्थांनी खास ठरला आहे. भाजपशी संघर्ष सुरू असताना राज्याबाहेर पहिला मोठा विजय मिळवून शिवसेनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या विजयानंतर शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निकालानंतर कलाबेन डेलकर आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भेटायला आल्या तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कलाबेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेने दिलेली भक्कम साथ, दादरा नगर हवेलीतील जनतेचा पाठिंबा आणि मोहन डेलकर यांची पुण्याई याच्या जोरावर मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले, असे कलाबेन म्हणाल्या. डेलकर कुटुंबाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. यावेळी लढाई अन्यायाविरुद्ध होती आणि आम्ही ती जिंकली आहे. यापुढेही विकास हेच आमचे ध्येय असेल व त्यामार्गाने आम्ही पुढे जाणार आहोत, असे सांगताना उद्धव ठाकरे हेसुद्धा लवकरच दादरा नगर हवेलीला येणार आहेत, असे कलाबेन म्हणाल्या. अभिनव डेलकर यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली व शिवसेनेचे आभार व्यक्त केले. दादरा नगर हवेलीत लोकशाही जिंकली आहे. भाजपचे बडे नेते प्रचाराला येऊनही आम्ही मात दिली. हा ऐतिहासिक विजय आहे, असे अभिनव म्हणाले. हुकूमशाहीविरोधात माझे वडील लढत होते. ही लढाई आम्ही पुढे नेत आहोत. आमच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. येत्या काळात दमण आणि गुजरातमध्येही शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही झटून काम करणार आहोत, असे अभिनव डेलकर म्हणाले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

करोना: राज्याची चिंता वाढवणाऱ्या 'या' जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी

: मधल्या काळात राज्यात चिंतेचा विषय ठरलेल्या नगर जिल्ह्यात आता करोना रुग्णांची संख्या उतरणीला लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत अद्यापही चढउतार पहायला मिळत असला तरी आज उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच हजाराच्या आत आली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १६० जणांना डिस्चार्ज मिळाला असून ९६ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या ९५० जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूंच्या संख्येतही चढउतार होत असली तरी आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच चिंताजनक स्थिती असलेल्या तालुक्यात आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. ( ) वाचा: ओसरत असली तरी नगर जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे कमी होत नव्हते. शेवटी ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनचा उपाय करण्यात आला. तब्बल ६९ गावांमध्ये लावण्यात आला. त्यातील काही ठिकाणी मुदत वाढविण्यातही आली होती. त्यामुळे आकडे कमी होत जाऊन दिवाळीच्या आधीच सर्व ठिकाणचे कडक निर्बंध उठविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील व्यवहारही आता सुरळीत करण्यात आले आहेत. आठवडे बाजार आणि जनावरांचे बाजारही सुरू करण्यात आले आहेत. एका बाजूला निर्बंध खुले होत असताना दुसरीकडे करोना रुग्णांची आकडेवारी कमी जास्त होत आहे. आज जिल्ह्यात ९६ नवे रुग्ण आढळून आले. सर्वाधिक १५ रुग्ण नगर शहरातील आहेत. ज्या तालुक्यामुळे नगर जिल्ह्याची चिंता वाढली होती, त्या संगमनेर तालुक्यात आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहेत. नेवासा, अकोले आणि राहाता तालुक्यांत अद्यापही दहापेक्षा जास्त रुग्ण आहेत. वाचा: दिलासादायक गोष्ट अशी की, जिल्ह्यात प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या ९५० पर्यंत खाली आली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत अकरा, सात अशी मृत्यूंची नोंद होत होती. आज एकाही मृत्यूची नोंद नाही. मात्र, अनेकदा मृत्यूच्या नोंदी करण्यात उशीर होत असल्याने एकदम आकडे वाढल्याचे आढळून येते. एकूण परिस्थिती पाहता नगर जिल्ह्यातही आता करोना उतरणीला लागल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाचे प्रमाणही बरे असून पहिला डोस घेण्याचे प्रमाण सत्तर टक्क्यांच्या आसपास आहे. मधल्या काळात नाशिक आणि औरंगाबादमध्येही नगर जिल्ह्याबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

प्रवीण दरेकर यांनी घेतली अनिल परब यांची भेट; आभार मानले आणि...

मुंबई: महामंडाळाचे राज्य सरकारमध्ये तातडीने विलीनीकरण करून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी आज परिवहन मंत्री यांच्याकडे केली. ( ) वाचा: विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज परिवहन मंत्री परब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घतेली. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले व मंत्री परब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सविस्तर माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विषय महाराष्ट्रभर सुरू आहे. विविध कर्मचारी यूनियन, कृती समित्या आणि काही ठिकाणी कर्मचारी न्यायासाठी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना सांगून व आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिवहनमंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. हा पगाराचा दिलासा कायम स्वरूपी राहावा, अशी विनंतीही दरेकर यांनी परब यांना केली. दोन-तीन महिन्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी विनंतीही दरेकर यांनी केली. त्यामुळे परिवहन खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. वाचा: विलीनीकरणामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा येईल याचे मला भान आहे. तथापि राज्य सरकार ही प्रॉफिट मेकिंग संस्था नाही. आपण सेवा देणारी संस्था आहोत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे असणारे त्यांचे वजन परब यांनी वापरावे. विरोधी पक्ष म्हणून जे सहकार्य लागेल ते आपल्याला व राज्य सरकारला निश्चितपणे करू, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. यांच्याशीही याविषयी चर्चा केली आहे. राज्य सरकारने या विषयावर विरोधकांना चर्चेसाठी बोलावले तर आम्ही निश्चितपणे सरकारला सहकार्य करू, असे आश्वासनही दरेकर यांनी परब यांना दिले. वाचा: सध्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात त्यांच्यावर करण्यात येणारी प्रशासकीय कार्यवाही थांबविण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. प्रामुख्याने डीएमध्ये झालेली वाढ ही लवकर द्यावी व वेतन आणि इतर भत्ते वेळेवर देण्यात यावेत, अशी मागणीही दरेकर यांनी परिवहनमंत्री परब यांच्याकडे केली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा देत आहेत. आपल्या आरोग्याची व तब्येतीची पर्वा न करता प्रामाणिकपणे दिवसरात्र सेवा देत आहेत. त्याचा सहानुभूतीने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; शिर्डीत यंदा दीपोत्सव होणार, पण...

अहमदनगर : मंदीर खुले झाल्यानंतर आलेला साजरा करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केली आहे. मंदिरावर रोषणाई आणि सजावटही करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाच्यावेळी दर्शन थांबवण्यात येणार असले तरी पूजा संपताच पुन्हा दर्शन सुरू करण्यात येणार असल्याने यावर्षी भाविकांनाही दीपोत्सवाचा आंनद लुटता येणार आहे. संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा केला जाणार असल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. ( ) वाचा: संस्थानतर्फे परंपरेनुसार श्री लक्ष्मीपूजन उत्सव गुरुवारी (४ नोव्हेंबर) रोजी साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ६ यावेळेत साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता दर्शनरांग बंद करण्याात येईल. लक्ष्मी-कुबेर पूजन झाल्यानंतर श्रींची धुपारती होऊन पावणेसात वाजता साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वाचा: शनिशिंगणापूर येथील गणेश शेटे यांच्यावतीने देणगीस्वरूपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदीर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. रतलाम येथील श्री साई सेवा समिती ट्रस्ट यांच्यावतीने मंदीर परिसरात व प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सवाचे सर्व कार्यक्रम करोना नियमांचे पालन करून करण्यात येणार आहेत, असे बानायत यांनी सांगितले. ऑफलाइन दर्शन खुले करा! शिर्डी येथे दरवर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षीपासून करोनामुळे त्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी यावेळी मंदीर दर्शनासाठी खुले असल्याने दिवाळीत भाविकांना दर्शन उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही केवळ ऑनलाइन दर्शनपास घेतलेल्या भाविकांनाच दर्शन घेता येत आहे. आता करोनाचे प्रमाण कमी झाले आहे. शिर्डीत करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे आता भाविकांना ऑफलाइन दर्शन पास घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक आणि शिर्डीतील पदाधिकाऱ्यांकडूनही करण्यात येत आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण: मंत्री शंकरराव गडाख म्हणतात, 'मी दोषी असेन तर...'

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री व शिवसेनेचे यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपनं महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप करत गडाख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे. मात्र, केवळ राजकीय हेतू समोर ठेवून माझ्यावर हे आरोप केले जात असून मी कोणत्याही चौकशील सामोरे जाण्यास तयार असल्याचे गडाख यांनी म्हटले आहे. (i am being targeted with political motives in the suicide case and i am ready for any inquiry said minister ) क्लिक करा आणि वाचा- प्रतिक काळे असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मुळा एज्युकेशन सोसायटीचत लिपिक पदावर काम करत होता. त्याने २९ ऑक्टोबर या दिवशी अहमदनगरमधील धनगरवाडी येथील एका शिवारात कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागमी केली. एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली. त्याची दखल कुणी घेतली नाही. तो शंकरराव गडाख यांच्याकडे काम करत होता, असे उपाध्ये यांनी म्हटले होते. मात्र प्रतिक काळे माझा स्वीय सहाय्यक नव्हता. तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता, असे गडाख यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. 'प्रतिक काळेची आत्महत्या ही एक दुर्दैवी घटना आहे. मात्र प्रतिक काळे हा माझी स्वीय सहाय्यक नव्हता, तर तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता. विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहेत, या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शंकरराव गडाख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. प्रतिक हा माझे बंधू प्रशांत गडाख यांच्या संस्थेत कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो माझा स्वीय सहाय्यक नव्हता. विरोधकांनी एक तरी पुरावा ‌द्यावा ज्यात मी दोषी आहे हे समोर येईल, असेही गडाख म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणात जर मी दोषी असेन तर मला हवी ती शिक्षा द्या. प्रतिकवर माझ्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. या प्रकरणी हवी ती चौकशी करा, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही गडाख यांनी म्हटले आहे.

from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

जॅग्वार चालवणारा माणूस दरोडा टाकेल अशी कल्पनाही कुणी करत नसे……

रॉबिनहूड म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकदम भला माणूस उभा राहतो जो गोरगरिबांना मदत करतो वैगरे, पोलिसांना गुंगारा देतात आणि सापडतच नाही परंतु सर्व ‘रॉबिन हूड’ भाग्यवान नसतात. गाझियाबादच्या कवी नगर पोलिसांनी अलीकडेच खऱ्या आयुष्यातील रॉबिन हूड, मोहम्मद इरफान उर्फ ​​’जॅग्वार चोर’ याला अटक केली. हा भिडू एका रॉबिन हुडला अटक केलीय. सध्या तो उत्तर प्रदेशच्या डासना तुरुंगात बंद असताना, सध्या सुरू असलेल्या बिहार पंचायत निवडणुकीत इरफान चर्चेत आला आहे. ह्या रॉबिनहूड इरफानचा विषय म्हणजे हा गडी जॅग्वार मधून चोरी करायचा आणि कुणाला संशयही यायचा नाही. त्याच्या नावावर त्याच्या बायकोने निवडणूक सुद्धा जिंकलीय.

भारतातील 12 राज्यांमध्ये किमान 40 दरोडे टाकल्याचा आरोप असलेल्या या सुपरचोराच्या भोवती अनेक गोष्टी फिरतात.

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रॉबिन हूड इरफान या गावात त्यांची पत्नी गुलशन परवीन यांनी ‘रॉबिन हूड’ इरफानच्या नावावर मते मागून सीतामढीच्या पुपरी ब्लॉक वॉर्ड क्रमांक 34 मधून जिल्हा पंचायत निवडणूक जिंकली. का? कारण इरफानने आपल्या बक्षीसाचा वापर करून जोगिया गावात आणि जवळपास 1 कोटी रुपये खर्चून सात रस्ते बांधले होते. तिच्या विजयानंतर, परवीनला आता इरफानने स्वतः विधानसभा निवडणूक लढवावी जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा अशी तिची इच्छा आहे.

गुलशन परवीन यांचा निवडणूक प्रचार पूर्णपणे त्यांच्या पतीच्या लिजेंड कार्यांवर आधारित होता. प्रचाराच्या प्रत्येक पोस्टरमध्ये इरफान आणि गुलशन एकत्र दिसत होते. तिने वॉर्ड क्रमांक 34 मधील तिची जागा 2,000 मतांनी जिंकली आणि जवळपास 50 टक्के मतांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केल्याचा दावा केला. गुलशनच्या विजयाचे बहुतेक श्रेय इरफानच्या ‘उदारतेला’ जाते गुलशनला जेवढी मते गावकऱ्यांनी दिली.

आता एवढे कांड केले म्हणल्यावर सुरवात पण तशी जब्रि झाली असणार. गुलशन परवीन आणि तिचे पती मोहम्मद इरफान यांचीही सुरवात प्रेम प्रकरणापासून झाली. गुलशन सांगते की इरफानने तिला पहिल्यांदा त्याच्या मोठ्या मेहुण्याच्या घरी भेटीदरम्यान पाहिले होते. दोघे प्रेमात पडले आणि लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही गरीब होतो आणि आमच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले, असं ती सांगते.

या जोडप्याला गरिबीचा सामना करायचा होता, परंतु लहान हॉटेल उघडण्यापासून ते कापडाचे दुकान चालवण्यापर्यंत – वेगवेगळे प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत फेरफटका मारला, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हाच इरफानने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दरोडे घालण्याचा निर्णय घेतला.

“मैं हमेशा मना करती थी ऐसे काम करने से असं गुलशन म्हणते. आता निवडणूक जिंकलेली गुलशन दुसऱ्या बाजूने आपल्या पतीचा बचाव करते. “इरफान कधीही कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. त्याने आपल्या कुटुंबासाठी काहीही केले नाही, फक्त ज्यांना मदतीची गरज आहे आणि गरीब आहेत अशा लोकांसाठी तो धावून जायचा.

कवी नगर पोलिस स्टेशनच्या प्रेस नोटनुसार इरफानविरुद्ध दाखल करण्यात आलेला पहिला एफआयआर 2013 चा आहे आणि नवीन एफआयआर यावर्षी 4 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. इरफानने 2010 मध्ये पहिला दरोडा टाकला आणि लुटमारीचा वापर आपल्या बहिणीच्या लग्नासाठी केला.

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्रीशीटरने पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, गोवा आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यांमध्ये दरोडे टाकले आहेत. तपास अधिकारी (IO) देवेंद्र सिंग, ज्यांच्या पथकाने इरफानला पकडले, म्हणतात की रॉबिनहूड असलेल्या इरफानने पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील तुरुंगातही वेळ घालवला आहे.

इरफानची अटक गाझियाबादच्या एका घरात केलेल्या दीड कोटी रुपयांच्या घरफोडीप्रकरणी झाली. उजळे/ उजले टोळीचा भाग असलेला इरफान हा बहुतांशी गुन्हे स्वत:हून करत असे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडण्यापूर्वीच टोळीतील अकरा जणांना अटक केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्याच्या काही दिवस आधी ‘जॅग्वार चोर’ने दिल्लीतील एका न्यायाधीशाच्या घरातून 65 लाखांची रोकड चोरल्याचा खुलासा झाला. घर फोडा आणि जग्वारमध्ये निघून जा, ही गोष्ट इरफानच्या बाबतीत पोलिसांनाही माहिती होती. कारण हा जॅग्वार चोरच इरफान होता.

जॅग्वार चालवणारा माणूस नुकताच दरोडा टाकणारा चोर आहे अशी कल्पना कोण करेल,” असं कवी नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणतात.

आता रॉबिनहूड ही पदवी सुद्धा त्याला सहजासहजी लाभली नव्हती तर त्याचे पुरावे सुद्धा लोकं सांगतात.
“त्याने ज्याला गरज असेल त्याला तो नेहमी मदत करायचा,” एका स्थानिक महिलेने याविषयी सांगितलं होतं की “आमच्या गावात एक धोबी होता त्याला इरफान मदत करत असे. त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला महागडे ऑपरेशन करण्यासाठी पैशांची गरज होती. इरफानने प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिले.

गुलशनचा दावा आहे की इरफानने त्याच्या गावात आणि आजूबाजूच्या वंचित कुटुंबातील किमान 50 महिलांचे विवाह आयोजित करण्यात मदत केली आहे. खरं तर, गावकऱ्यांनीच इरफानला पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवायला सांगितली होती.

गुलशन आणि इरफान यांना 10 आणि 7 वर्षांच्या दोन मुली आहेत. गुलशन म्हणते की तिला तिच्या कुटुंबासोबत ‘सन्मानित’ जीवन जगायचे आहे, आता तिने निवडणूक जिंकली आहे. इरफानने आपल्या पत्नीला निवडणूक जिंकल्यास गुन्हेगारी जग सोडेन असे सांगितले होते.

हे ही वाच भिडू :

The post जॅग्वार चालवणारा माणूस दरोडा टाकेल अशी कल्पनाही कुणी करत नसे…… appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक दररोज हल्ला करत आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वानखेडेंनी तुरुंगात पाठवले होते. तेव्हापासून ते नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहे. नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.

त्यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्थान मिळाले आहे, पण आज आम्ही तुम्हाला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी सांगणार आहोत. त्यांचे शिक्षण किती आहे? कुटुंबात कोण आहे? मालमत्ता किती आहे आणि त्यांची वादग्रस्त विधाने कोणती?

जन्म यूपीत, पण मंत्री महाराष्ट्रात
नवाब मलिक यांचा जन्म 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील उत्रौला तहसील भागातील धुसवा येथे झाला. नोंदीनुसार, 1970 मध्ये ते कुटुंबासह मुंबईत शिफ्ट झाले. मलिक कुटुंबाचे मुंबईत छोटे-मोठे व्यवसाय होते. त्यांचे एक छोटे हॉटेलही होते. याशिवाय त्यांचा रद्दी, भंगाराचा व्यवसायासोबत आणखी काही छोटे व्यवसाय होते.

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मलिक एकदा म्हणाले होते की, “होय, मी भंगार विक्रेता आहे. माझे वडील मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय करायचे. मी आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसायही केला. माझ्या कुटुंबाला आजही त्याचा अभिमान आहे.” त्यांनी अंजुमन हायस्कूलमधून 10 वी आणि त्यानंतर 1978 मध्ये बुरहानी कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण घेतले.

घरच्यांच्या विरोधामुळे सोडली इंग्रजी शाळा
प्राथमिक शिक्षणासाठी नवाबांना सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वडील मोहम्मद इस्लाम यांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या विरोधामुळे ते इंग्रजी शाळेत गेले नाहीत. नंतर नवाब मलिकांना महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत दाखल करण्यात आले.

येथून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर, डोंगरी येथील जीआर क्रमांक 2 शाळेत सातवीपर्यंत आणि सीएसटी विभागातील अंजुमन इस्लाम शाळेत 11वी पर्यंतचे शिक्षण घेतले. मॅट्रिकनंतर त्यांनी बुरहानी कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. त्याच कॉलेजमध्ये बीएला प्रवेशही घेतला. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.

देशातील नेत्यांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘मायनेटा’ या वेबसाईटनुसार, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. 1979 मध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला, परंतु शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. मलिकवर कोणताही गुन्हा दाखल नाही.

कुटुंबात कोण आहे?
नवाब मलिकांचा पत्नी मेहजबीन, मुलगा मेराज, अमीर आणि मुली निलोफर आणि सना असा परिवार आहे. नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव समीर खान आहे. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग्जच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला तेव्हा समीर खानचे नावही पुढे आले. एका ड्रग पेडलरने त्याचे नाव घेतले होते तेव्हा एनसीबीने त्यांच्या जावयाला अटक केली होती.

राजकारणात कधी आले?
नवाब मलिक यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील नेहरू नगरमधून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही ते येथून विजयी झाले. 2009 मध्ये, मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार झाले.

2014 मध्ये त्यांनी त्याच विधानसभेतून पुन्हा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2020 मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात.

पुलवामा हल्ल्यावर दिलेले वादग्रस्त विधान
नवाब मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्यांबाबत 2020 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त मलिक म्हणाले होते, ‘एका वर्षात हे कळले नाही की आरडीएक्स आले कुठून? 40 जवान शहीद झाले, निवडणूकीचा हा मुद्दा बनला आणि मोदीजींनी निवडणूक जिंकली.

नवाब मलिकांना असे म्हणायचे होते की, पुलवामा हल्ला हा भाजपच्या कटाचा भाग होता. या विधानावर बराच गदारोळ झाला होता. आता सध्याही नवाब मलिक त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्यातील वाद वाढतच चालला आहे.

महत्वाच्या बातम्या
नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?
टीम इंडियाचा जबरदस्त कमबॅक, २१० धावांचा विशाल स्कोर उभा करून अफगानिस्तानला झोपवले
मोठी बातमी! राहूल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब
वडील घाणेरडी भाषा बोलतात तर आई पॉर्न साइट चालवते? सारा अली खानने केला धक्कादायक खुलासा

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

टीम इंडियाचा जबरदस्त कमबॅक, २१० धावांचा विशाल स्कोर उभा करून अफगानिस्तानला झोपवले

T20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या गट 2 च्या सामन्यात भारताने 20 षटकात 210/2 अशी मोठी धावसंख्या उभारली, ज्याला प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ केवळ 144/7 धावा करू शकला.

रोहित शर्माने 47 चेंडूत 74 धावा केल्या तर केएल राहुलने 48 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले असून सूर्यकुमार यादव आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जागी इशान किशन आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आला होता.

अफगानिस्तानने असगर अफगाणच्या जागी शरफुद्दीन अश्रफचा संघात समावेश केला होता. भारतीय संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने केएल राहुलसोबत 140 धावांची जबरदस्त भागीदारी केली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत 53 धावा जोडल्यानंतर दोघांनी 12 व्या षटकात संघाला 100 च्या पुढे नेले.

रोहित 15 व्या षटकात 140 धावा असताना बाद झाला आणि 17 व्या षटकात राहुल 147 धावा असताना बाद झाला, पण तिथून हार्दिक पंड्याने ऋषभ पंतसोबत 63 धावांची दमदार भागीदारी केली आणि संघाला 200 च्या पुढे नेले. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 आणि ऋषभ पंतने 13 चेंडूत 27 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आणि मोहम्मद शहजाद (0) आणि हजरतुल्ला झाझाई (13) चौथ्या षटकात 13 धावा असताना बाद झाले. रहमानउल्ला गुरबाजने 10 चेंडूत 19 धावांची जलद खेळी खेळली, पण सातव्या षटकात तो 48 धावा असताना बाद झाला.

10 व्या षटकात 59 धावांवर गुलबदिन नायब (18) आणि 12 व्या षटकात 69 धावा असताना नजीबुल्लाह झद्रान (11) दोघेही बाद झाले. मोहम्मद नबीने (35) करीम जनातसह सहाव्या विकेटसाठी 57 धावा जोडून संघाला 17 व्या षटकात 100 च्या पुढे नेले. मोहम्मद नबी 19 व्या षटकात 126 धावा असताना बाद झाला. त्याच षटकात 127 धावा असताना राशिद खानही खाते न उघडताच बाद झाला.

करीम जनातने 22 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी करत संघाला 140 च्या पुढे नेले. शरफुद्दीन अश्रफ 2 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, रविचंद्रन अश्विनने दोन आणि जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. सुपर 12 मध्ये भारताचा पुढील सामना 5 नोव्हेंबरला स्कॉटलंडशी होईल, तर अफगाणिस्तानचा सामना 7 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होईल.

महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारचं नागरीकांना दिवाळी गिफ्ट; एका झटक्यात पेट्रोल पाच तर डिझेल दहा रूपयांनी स्वस्त
शिवसेना मंत्र्याच्या पीएची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी व्हिडीओतून मंत्र्यावर केले गंभीर आरोप
हाॅटेल ललितमध्ये कोणते कांड व्हायचे? नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
वडील घाणेरडी भाषा बोलतात तर आई पॉर्न साइट चालवते? सारा अली खानने केला धक्कादायक खुलासा

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना धक्का; संप करण्यास हायकोर्टाची मनाई

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने तसंच संघर्ष एसटी कामगार संघटनेने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला मुंबई हायकोर्टाने () तातडीचा अंतरिम आदेश काढून मनाई केली आहे. तसंच याविषयी गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सविस्तर सुनावणी ठेवली आहे. एसटी महामंडळाने अ‍ॅड. जी. एस. हेगडे यांच्यामार्फत तातडीने याचिका दाखल करत न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाला संध्याकाळी ५ वाजता विषयाचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर पुन्हा रात्री ८ च्या सुमारास याविषयी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून मनाई करणारा आदेश काढला. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्या संघटनांनी केल्या आहेत. एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. एसटी सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने औद्योगिक न्यायालयाने २९ ऑक्टोबरच्या आदेशाने कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. तरीही संघटनांनी संपाची भूमिका घेतल्याने महामंडळाने तातडीने रिट याचिकेद्वारे हायकोर्टात धाव घेतली. ‘सध्या दिवाळीच्या सणासुदीचा काळ असूनही काही संघटना संपावर जात असून यामुळे नागरिकांचे खूप हाल होणार आहेत. शिवाय औद्योगिक न्यायालयाचा आदेश टाळून संघटनांनी संपाची भूमिका घेतली असून त्याविषयी महामंडळाला आजच नोटीस देण्यात आली आहे’, असं हेगडे यांनी निदर्शनास आणले. त्याची दखल घेत खंडपीठाने महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी मध्यरात्रीपासून आणि कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत संपावर जाण्यास मनाई करून गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता याप्रश्नी पुन्हा सुनावणी ठेवली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा गोंधळ महागाई भत्त्यातील वाढीसह विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आणि राज्यभरात नागरिकांना प्रवासासाठी ऐनवेळी पर्यायी वाहन शोधावे लागले. प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक झाली आणि या बैठकीनंतर तोडगा निघाला. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र अनेक आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अशी मागणी करत या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल सुरू झाले होते. महामंडळाने कर्मचाऱ्यांना काय आवाहन केलं? एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या वाहतूक सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. 'सर्व एसटी कामगारांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी देण्यात आले. सुधारित महागाई भत्ता, घरभाडे आणि दिवाळी भेट असे या वेतनाचे स्वरूप आहे. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू आहे. दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,' असं आवाहन एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पंकजा मुंडेंनी घेतली शिवसेना आमदाराची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडेंनी आपल्या दौऱ्यात नाशिकचे पालकमत्री छगन भुजबळ यांच्यावर जाहीर भाषणात स्तुतीसुमने उधळल्यानंतर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना आमदार यांच्या घरी भेट दिली. जिल्ह्यात सध्या कांदे आणि भुजबळांमध्ये संघर्ष सुरू असताना मुंडेंनी कादे यांच्या घरी सदिच्छा भेट देत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मुंडे तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी संदर्भसेवा हॉस्पिटलच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुंडे व छगन भुजबळ एकाच मंचावर आले होते. यावेळी मुंडेंनी आपल्या भाषणात भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा गौरव करत, ते आपल्याला वडिलांसमान असल्याचे सांगितले होते. यासोबतच नामको बँकेसह सिन्नरच्या कार्यक्रमात मुंडेंनी भुजबळांचे कौतुक केले. मुंडे यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ यांचा ओबीसींसाठी राहिला आहे. त्यामुळे हा समान धागा पकडत त्यांनी भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे भुजबळांच्या गोटात समाधानाचे वातावरण होते. परंतु, मुंडे यांनी भुजबळांचे कट्टर विरोध असलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप आणि शिवसेनेत सध्या संघर्षाचे वातावरण असतांना मुंडे यांनी कांदेंच्या घरी सदिच्छा भेट देत वेगळाच राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुंडेंनी कांदे यांच्यासोबतच विविध विषयांवर चर्चा केल्याने या दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, याची दिवसभर शहरात चर्चा होती. शिष्टाई की बळ? 'डीसीपीसी'चा निधी वाटपावरून सध्या भुजबळ आणि कांदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. भुजबळांच्या विरोधात कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत, निधीवरून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंडे आणि कांदे यांच्यात भुजबळ-कांदे वादावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदगाव मतदारसंघावरून भुजबळ आणि कांदे यांच्या संघर्षाची राज्यभर चर्चा आहे. त्यामुळे मुंडेंनी या भेटीत दोघामंध्ये शिष्टाई करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. भुजबळांविरोधात कांदेंना बळ देण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा दोघांच्या समर्थकांमध्ये होती.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुखांच्या अटकेचे ट्वीट दोन तास आधीच; भाजप समर्थकाच्या ट्वीटनं गोंधळ वाढला

म. टा. प्रतिनिधी, सुमारे १२ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे माजी गृहमंत्री यांना सोमवारी मध्यरात्री अटक झाली. या सर्व घडामोडी मध्यरात्रीनंतर 'ईडी'च्या दक्षिण मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात घडल्या. परंतु त्यांच्या अटकेच्या दोन तास आधीच भाजप समर्थकांकडून ट्विटरवर या अटकेबाबतचे ट्विट करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पाच समन्सनंतर अखेर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास 'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. दुपार, संध्याकाळ ते रात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरू होतीच. रात्री ९ दरम्यान त्यांना चौकशी करून पाठवले जाईल व दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले जाईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु त्याचवेळी दिल्लीहून अचानक दोन उच्चाधिकारी 'ईडी' कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे चौकशी आणखी लांबणार हे स्पष्ट झाले. रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास सारे चित्र संदिग्ध असताना 'सुनैना होले' नावाच्या ट्विटर हँडलवरून 'मध्यरात्रीनंतर अनिल देशमुखांच्या दिवाळीचे फटाके ईडी कार्यालयात अनुभवा' असे ट्वीट आले. या ट्वीटला भाजपच्या काही मध्यम फळीतील नेत्यांनी री-ट्विट केले. ट्विटच्या कॉमेंटमध्ये अनिल देशमुखांच्या अटकेनंतर दिवाळीत खूप फटाके वाजवू, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली, असेच वृत्त सर्वत्र पसरले. वास्तवात त्यांना मध्यरात्री १ ते दीडच्या सुमारास अटक झाली. या सर्व धामधुमीत सुनैना होले यांचे ते ट्विट चर्चेत राहिले. होले या भाजपच्या समर्थक आहेत. महाविकास आघाडी सरकारविरुद्ध त्या सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून टीका-टिप्पणी करीत असतात. परंतु अनिल देशमुख यांना अटक होणार की नाही, याबाबत पत्रकारांनादेखील ठोस माहिती नसताना, होले यांनी मध्यरात्रीनंतर त्यांना अटक होणार, अशा आशयाचे ट्विट दोन तास आधीच कसे केले, यावरून भाजप कार्यकर्ते व समर्थक 'ईडी'शी संलग्न आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुणेकरांना मिळालेल्या टॅक्स कन्सेशनमधूनच सदाशिव पेठ तयार झाली

अस्सल पुणेकर कुठे मिळतील? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर एकच उत्तर मिळेल भिडू ते म्हणजे  सदाशिव पेठ. पुणेरी पाट्या, पुणेरी मंडळी, पुणेरी जेवण, जुन्या पुण्याच्या खाणाखुणा अजूनही जिवंत ठेवणार असं हे ठिकाण. आता सध्या हे स्पर्धा परीक्षांच्या पोरा-पोरीचं राहण्याचं- खाण्याचं ठिकाण म्ह्णूनही ओळखलं जात. म्हणजे गल्लीबोळातलं हॉस्टेल आणि मेससाठी. 

असो, तर प्रत्येकाच्या मुखात आणि आठवणीत असणाऱ्या या इन्टरेस्टिंग सदाशिव पेठेच्या तयार होण्याची स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. 

तर अडीचशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. आणि हे फक्त पुण्यातल्याच नाही तर आसपासच्या भागातील विद्वान ब्राह्मण सुद्धा दक्षिणेसाठी पुण्याची वारी करू लागले. 

सुरुवातीला पेशवे शनिवारवाड्यातच दक्षिणा वाटप करायचे. पण या प्रथेच्या बोलबाल्यामुळे प्रचंड गर्दी वाढली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्ह्णून रमणबागेत सोय केली गेली. पण तिथंसुद्धा जागा पुरेना म्हणून नानासाहेबांनी पर्वतीच्या पायथ्याशी प्रशस्त असा रमणा बांधला. 

दरम्यान, ही श्रावणमासातली दक्षिणा पदरी पाडून घेण्यासाठी अनेक परप्रांतीय ब्राह्मण सुद्धा पुण्याकडे वळायला लागले. तेलंगण म्हणजे सध्याच्या कर्नाटक प्रांतातून तर अशा ब्राह्मणांची मोठी रांग लागायची. ज्यांना ‘तेलंगी ब्राह्मण’ असं म्हंटल जायचं. आता या सगळ्यांना राहण्याचा प्रश्न उभं राहिला. 

त्या वेळी आंबिल ओढा भर गावातून, म्हणजेच सध्याच्या बाजीराव रस्त्याच्या मार्गावरून वाहत अमृतेश्वरापाशी मुठा नदीला मिळायचा. ओढ्याला भरपूर पाणीही असायचा. थोडक्यात काय तर हा ओढा पुण्याच्या परिसराची पूर्व-पश्चिम भागांत विभागणी करत असे.  म्हणजे पूर्वेला पुणे शहर आणि पश्चिमेचा सगळा परिसर डोळ्यांना सुखावणाऱ्या बागांनी व्यापलेला असल्याने, या भागात ब्राह्मणांनी तळ ठोकणे स्वाभाविकच होते.

कर्नाटकात ‘कारकल’ नावाचे गाव अद्यापही आहे. दगडी खोदकामाच्या सुंदर मूर्ती तयार करण्यात या गावाची मंडळी अग्रेसर आहेत. या गावातील ब्राह्मणांचा एक जथा एकमेकांच्या सोबतीने श्रावण महिन्यात दक्षिणेसाठी पुण्यात येत असे.

त्यांचा मुक्काम आंबिल ओढ्याच्या किनारी भागात व्हायचा. वर्षानुवर्षं ही प्रथा चालू होती. त्यामुळे या भागाला आपोआपच ‘कारकलपुरा’, असे नाव पडले. पूढे बोली भाषेतील उच्चारानुसार ‘कारकल’चे ‘कारकोळ’ झाले. तत्कालीन कागदपत्रांतून कारकोळपुरा असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

 सध्याच्या खुनांनवरून सांगायचं झालं तर ही जागा शनीच्या पारापलीकडे खुन्या मुरलीधराच्या देवळापर्यंतच्या परिसरात होती असे म्हणता येईल. थोडक्यात सांगायचे तर सध्याची टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची इमारत ते बाजीराव रस्ता या भागात कारकोळपुऱ्याची सुरुवातीची वस्ती होती. 

या भागाला अगदी कालपरवापर्यंत ‘लोणीविके दामले आळी’ म्हणत. आता असे म्हणताना हे दामले कोण आणि ते लोणी का आणि कुठे विकायचे असा प्रश्न मनाला पडला, तर त्यांचे मंडईत लोणी विकायचे दुकान होते व ते या गल्लीत राहायचे हे उत्तर आहे.

इ.स. १७५५च्या सुमारास आंबिल ओढा गावातून वाहणे बंद करून त्याचा प्रवाह पर्वती तळ्यापाशीच वळवण्यात आला. पुण्याची या बाजूची वाढ थांबवणारा हा अडसर दूर झाल्याने पुण्याची वस्ती या बाजूला पसरणे साहजिकच होत . पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ कारकोळपुऱ्याच्या जागी नवीन पेठ वसवायचे थोरल्या माधवराव पेशव्यांनी ठरवले आणि त्यानुसार दि. १९ ऑगस्ट १७६९ मध्ये त्यांनी सदाशिव पेठेत नवी वसाहत व बाजार उभारण्यासाठी कौल दिला.

 सदाशिव पेठ वसवण्याचा एक कौल इ.स. १७४५च्या आसपास दिल्याचे आढळते. त्याप्रमाणे नायगाव या गावी सदाशिव पेठ वसली, असा निष्कर्ष काहींनी गृहीत धरला आहे. दरम्यान हे नायगाव सांडस तालुक्यात होते. सांडस तर्फ ही पुण्याच्या विरुद्ध टोकाला असून उरळीकांचन, यवत या भागाला ते नाव होते. त्यामुळे त्या भागातील नायगावात सदाशिव पेठेची वस्ती करण्यासाठीचा हा कौल आहे. त्या नायगावचा पुण्याच्या सदाशिव पेठेशी काहीही संबंध नाही.

कारकोळपुऱ्याचा परिसर उत्तमोत्तम बागांनी वेढलेला होता. विश्रामबाग वाड्याच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या ठिकाणी सावकार दादा गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या पलीकडे रास्त्यांची बाग, अलीकडे नगरकरांची बाग अशी बांगाची रेलचेल असलेली ही जमीन, नवीन पेठ वसवण्याच्या दृष्टीने अगदी योग्य होती.

परंतु लोकांना ही जागा गावापासून लांबच वाटायची म्हणून माधवरावांनी नव्या वस्तीसाठी सात वर्षं करमाफी दिली. मग मात्र, सदाशिव पेठेची वस्ती हळू हळू वाढू लागली. सुपीक जमीन, मोकळे वातावरण, हिरव्यागार बागांची सोबत पुणेकरांना भावली. गावातल्या इतर पेठांतील गर्दीपिक्षा सदाशिव पेठेत वाडा बांधणे जास्त सुखाचे वाटू लागले.

आज जसे पुणेकर बावधन, पाषाण, सूस, आंबेगाव, धायरी अशा ठिकाणी हौसेने घरे बांधतात, तीच परिस्थिती दोनशे वर्षापूर्वी होती. तथापि, सदाशिव पेठ खऱ्या अर्थाने वसली ती सवाई माधवरावांच्या काळात, विशेषत: इ.स. १७८० नंतरच्या काळात.

माधवराव पेशव्यांच्या काळात, तेलंगणातील कृष्णशास्त्री व सदाशिवशास्त्री द्रविड हे दोन विद्वान पंडित पुण्यात स्थायिक झाले. तेव्हा पूर्वापार वहिवाटीप्रमाणे त्यांनी कारकोळपुऱ्यातच गद्र्यांच्या बागेसमोरील जागा पसंत केली. आपल्या घराबरोबरच त्यांनी श्रीकृष्णेश्वराचे देऊळही बांधले. सदाशिव पेठेचा हौद झाल्यावर त्यांनी हौदाकडे जाणाऱ्या नळाद्वारे पाणी मिळवून या जागी एक हौदही बांधला होता.

द्रविडांच्या हौदाच्या पश्चिमेला लागून नारो रघुनाथ साठे यांनीही आपल्या घराबरोबरच शरमीच्या झाडाखाली श्रीमोरेश्वर गणपतीचे सुरेख छोटेखानी मंदिर उभारले. आज मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नाही.

इ.स. १८०७ मध्ये पेठेच्या उत्तर नाक्यावर फडक्यांच्या बागेत दुसऱ्या बाजीरावाने सुप्रसिद्ध विश्रामबाग वाडा बांधला. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनीही आपापले वाडे बांधून पेठ सजवली. कारकोळपुऱ्याची आठवणही पुसट होत गेली.

शनिपार, गायआळीपासून चिमण्या गणपतीपर्यंतच्या भागात भरपूर वाडे बांधले गेले. पेठ गजबजली.  पेठेची वस्ती वाढत गेली तरी, इ.स. १९२५च्या सुमारासही पेरूगेट, पावनमारुती, टिळक स्मारक मंदिरापासून थेट भिकारदास मारुतीपर्यंतच्या परिसरात अजिबात वस्ती नव्हती, याचे आज आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.

वस्ती वाढूनही सदाशिव पेठ आपली ऐट बाळगून होती. कारण, या पेठेने पुणेकरांना अनेक थोर मंडळी दिली. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाट्य, चित्र, कला, संशोधन अशा अनेकविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी सदाशिव पेठेतलीच. अनेक नावारूपाला आलेल्या संस्थांचीही मुळे रुजली ती याच पेठेत. म्हणूनच सदाशिव पेठेला आजही एक वेगळेच वलय आहे. 

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मात्र ओनरशिप स्कीम इमारतींमुळे सदाशिव पेठ आमूलाग्र बदलली. जुन्या गल्ल्या आता रुंद झाल्या तशाच त्या परक्याही वाटू लागल्या. गाय आळी, डोलकर आळी, लोणीविके दामले आळी, अशा जुन्या आठवणी बुजत चालल्या. पुष्करणी होदाच्या रस्त्याचा दिमाख संपला. महत्त्व लक्ष्मी रस्त्याला आले.

 नानांनी हौसेने उभारलेल्या हौदाचे अस्तित्व केवळ मोक्याची जागा अडवणारी अडगळ म्हणून शिल्लक राहिले. आपल्या पेठेचा अभिमान बाळगणारी सदाशिव पेठेतली पारंपरिक पुणेकर मंडळीही, दूरवरच्या कोथरूडसारख्या उपनगरात हलली.

आज द्रविडांचा हौदही नाही, भुताच्या वाड्याच्या जागी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची इमारत आहे. आता फक्त सदाशिव पेठेचे नाव आणि कर्तृत्वाचे अदृश्य वलय बाकी उरले आहे. ते पुढे चिरंतर राहीलही कदाचित; परंतु या पेठेचा पाया घालण्याचे काम करणाऱ्या चिमकुल्या कारकोळपुऱ्याची आठवण कोण जपणार?

हे ही वाच भिडू :

The post पुणेकरांना मिळालेल्या टॅक्स कन्सेशनमधूनच सदाशिव पेठ तयार झाली appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.

भाई केशवराव धोंडगे

शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते.

केशवराव म्हणजे मराठमोळा माणूस. कपाळावर मातीचा टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे अगदी शांत आणि चालतेबोलते व्यक्तिमत्व. हा पण एक गोष्ट त्यांची मोठीच डेंजर होती म्हणजे, कधी काय बोलतील सांगता यायचं नाही. कधी बोलता-बोलता नाचतील तर कधी थेट  काळजाला लागेल असं तिखट बोलतील. पण जे काही वागणूक असायची ती खरी आणि तितकीच स्पष्ट असायची.

थोडक्यात सांगायचं तर केशवराव म्हणजे अगदी नितळ मनाचे.  तुकारामांच्या गाथेमध्ये प्रत्येक शब्दाचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करणारे व्यक्तिमत्व. 

छत्रपती शिवाजी महाराज, जीवा महाला यांचे चरित्र, कंधार तालुक्‍यातील चळवळ, गुराखी गड, शिवाजी मोफत शिक्षण संस्था, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्र. के . अत्रे हे व्यक्तिमत्वे ज्यावर ते भरभरून बोलत असत. 

त्यांचा एक मुका जो आजही महाराष्ट्रातल्या जनतेला आठवणीत राहतो, तो म्हणजे…

नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीमध्ये ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून ठिकठिकाणी पवारांचे सत्कार झाले होते.अशाच एका सत्काराच्या कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी पवारांचा स्टेजवरच मुका घेतला होता. आता केशवराव धोंडगे यांचा स्वभावच मृदू आणि तितकाच हसता -खेळता आहे. आणि तितकाच परखड आणि स्पष्ट आणि त्याची प्रचीती याच कार्यक्रमात आलेली.

मुका घेतल्यानंतर लग्गेच धोंडगेंनी त्यांच्या भाषणात पवारांवर सडकून टीका केली होती. “शरद पवार हे बिना चीपड्याचे नारद आहेत. पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार कोणाच्या घरचा माणूस कसा फोडतील याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदही पवारांची बरोबरी करू शकत नाहीत”, अशा तिखट शब्दांमध्ये धोंडगेंनी पवारांवर तोंडसुख घेतलं होतं, असो ..

राजकारणातील जातीचे राजकारण आणि वाढते गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी घातक आहे. हा प्रकार आम्ही पूर्वीही सहन केला नाही अन पुढेही सहन करणार नाही. माझं वय झालं असेल मी थकलो असेल पण माझे विचार थकणार नाहीत ना संपणार नाहीत. पूर्ण आयुष्य गोरगरीब, उपेक्षित, ‘नाहिरे’वाल्यासाठी काम केले. पुढेही करत राहणार असं ते नेहेमीच म्हणत असत आणि त्याचा अवलंब करत असत. 

हैदराबाद मुक्तिसंग्राम असो कि, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा  सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले. 

१९५७ -१९६२-१९६७- १९७२- १९८५-१९९० असं सलग तब्बल सहा विधानसभा निवडणुका त्यांनी गाजवल्या आणि जिंकल्या. 

१९७५ साली आणीबाणीचा विरोध करताना १४ महिने कारावास भोगला. यात विशेष म्हणजे आणिबाणीनंतर १९७७ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि  दिल्लीत आपले वजन निर्माण केले.  पण याच नेत्याला १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आणि तोही त्यांनी मोठ्या मानाने स्वीकारला. 

राजकारण, समाजकारण, अर्थकारण या तिन्हीची सांगड घालत जनतेवर लादलेल्या सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करण्याची तयारी देखील ठेवावी लागते हा गुण मात्र त्यांच्याकडून विशेष शिकण्यासारखा आहे.  

आणखी एक म्हणजे त्यांची लेखणी अगदीच दर्जेदार आणि तितकीच प्रखर होती. ‘जयक्रांती’च्या माध्यमातून ते लिखाण करीत असत. त्यांचे लिखाण हे ग्रामीण समाजाला जवळचे वाटत.  कर्मकांड, आचार-विचार, श्रद्धा-अंधश्रद्धा व त्यातून निर्माण झालेली सांस्कृतिक गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी मोडीत काढण्यासाठी त्यांनी लिखाण केलं, समाजाला ज्ञान दिलं. ग्रामीण विकासावर त्यांचं खास लक्ष असायचं. विकासाच्या कामात अडचण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरून मोर्चे, उपोषणे करत असत. 

या सर्वांचे मूळ म्हणजे त्यांनी स्वतःला शेतकरी कामगार पक्षातूनच घडवलं, वाढवलं.

जिल्ह्यातील राजकारणात कॉंग्रेसचे दिवंगत बलाढ्य नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व त्यांचे कधीच जमले नाही. विशेषत: सिंचनाच्या मुद्द्यावरून तर त्यांचे खूप मतभेद होत असायचे.

केशवराव काँग्रेस पक्षात गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते
अलीकडेच त्यांना वयाच्या १०२ व्या वर्षी लोकशाही न्युज चॅनलने “लोकशाही मराठवाडा रत्न” पुरस्कार दिला आहे. त्यांच्या कार्यांची सुरुवात पाहता अनेक चळवळीतुन व सत्याग्रहातुन झाली तसेच त्यांचे विधानसभा व लोकसभेतील कामकाज हे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होते. हा पुरस्कार म्हणजे मन्याड खोर्‍यातील जनता जनार्धनास मिळालेला बहुमान आहे.

त्यांना दिलेला प्रत्येक मान -सन्मान हा त्यांच्या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानापुढे फिकाच आहे.

हे ही वाच भिडू :

The post केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते. appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शाहरूखने समाजासाठी काय काय केलं हे सांगीतलं तर डोळे पांढरे होतील; मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

मुंबई । ड्रग्ज प्रकरणी झालेल्या आर्यन खानमुळे सध्या शाहरुख खान देखील चर्चेत आहे. यातच काल शाहरुख खानचा काल वाढदिवस होता. यामुळे त्याचे चाहते त्याला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत होते. जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

असे असताना आता शाहरूखचा मोठा फॅन असलेले मराठमोळे अभिनेते किरण माने याने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. किरण माने यांनी शाहरूखच्या वाढदिवसाला मोठी पोस्ट लिहिली आहे. यावरून ते शाहरुख खानचे किती मोठे फॅन आहेत हे दिसून येते.

ड्रग्ज प्रकरणी शाहरुखवर अनेकांनी मोठी टीका केली. शाहरूखवर टीका करणाऱ्यांना किरण माने यांनी खास शब्दांत उत्तर दिले आहे. यामुळे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे अनेकांचे लक्ष त्याने वेधून घेतले आहे.

सगळा पिच्चर नाय सांगत, फक्त ‘ट्रेलर’ सांगतो, ऐकाच, असे म्हणत किरण मानेंनी ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, आपन ऐर्‍यागैर्‍यांना डोक्यावर घेत नाय भावांनो! ह्यो किरण माने सातारी मातीतला हाय.. उगं कुना लुंग्यासुंग्याची उगाच तळी उचलून धरनार्‍यातला नाय!

समोर मानूसच डोंगराएवढा हाय… त्याची का स्तूती करनार नाय सांगा? त्यो मानूस समाजासाठी काय-काय करतो हे जर सांगीतलं, तर त्याची निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल.. सगळा पिच्चर नाय सांगत..फक्त ‘ट्रेलर’ सांगतो.

यामध्ये शाहरुख खानने देशाला केलेली मदत, तसेच वैयक्तिक मदत, अनेकदा देशावर संकट आले अनेक राज्यावर संकट आले. यामध्ये त्याने केलेली मदत त्याने सांगितली आहे. जवानांच्या कुटूंबासाठी तसेच कोरोना काळात त्याने मोठी मदत केली.

तसेच त्याला बाहेरच्या अनेक देशात सन्मानित करण्यात आले आहे. हे देखील सांगितले गेले आहे. तो फक्त अभिनयातला ‘बादशाह’ नाय, तर ‘मानूस’ म्हनून बी ‘किंग’ हाय ! सलाम शाहरूख खान… कडकडीत सलाम !! कुठल्याबी सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटंल.. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा भावा! असे त्याने म्हटले आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पंकजा मुंडे यांचं नाशकात काय चाललंय?; 'या' दोन घडामोडींमुळे मोठं वादळ

नाशिक: भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री यांनी आपल्या दौऱ्यात नाशिकचे पालकमत्री यांच्यावर जाहीर भाषणात स्तुतीसुमने उधळल्यानंतर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना आमदार यांच्या घरी भेट दिली. जिल्ह्यात सध्या कांदे आणि भुजबळांमध्ये संघर्ष सुरू असताना पंकजा यांनी कांदे यांच्या घरी सदिच्छा भेट देत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. ( ) वाचा: पंकजा मुंडे तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. पंकजा यांच्या उपस्थितीत सोमवारी संदर्भसेवा हॉस्पिटलच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पंकजा व छगन भुजबळ एकाच मंचावर आले होते. यावेळी पंकजा यांनी आपल्या भाषणात भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा गौरव करत, ते आपल्याला वडिलांसमान असल्याचे सांगितले होते. यासोबतच नामको बँकेसह सिन्नरच्या कार्यक्रमात पंकजा यांनी भुजबळांचे कौतुक केले. पंकजा यांचे वडील दिवंगत आणि भुजबळ यांचा ओबीसींसाठी मोठा लढा राहिला आहे. त्यामुळे हा समान धागा पकडत त्यांनी भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे भुजबळांच्या गोटात समाधानाचे वातावरण होते. परंतु, पंकजा यांनी भुजबळांचे कट्टर विरोध असलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आणि शिवसेनेत सध्या संघर्षाचे वातावरण असतांना पंकजा यांनी कांदेंच्या घरी सदिच्छा भेट देत वेगळाच राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंकजा यांनी कांदे यांच्यासोबतच नेमकी कशावर चर्चा केली, याची शहरात जोरदार चर्चा होती. वाचा: शिष्टाई की बळ? ‘डीसीपीसी’चा निधी वाटपावरून सध्या भुजबळ आणि कांदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. भुजबळांच्या विरोधात कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत, निधीवरून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंकजा आणि कांदे यांच्यात भुजबळ-कांदे वादावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदगाव मतदारसंघावरून भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्षाची राज्यभर चर्चा आहे. त्यामुळे पंकजा यांनी या भेटीत दोघामंध्ये शिष्टाई करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृतपणे कुणीच बोलायला तयार नाही. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आर्यन खान 'त्या' अटींचे पालन करतोय का?; महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई: प्रकरणात अभिनेता याचा मुलगा याला जवळपास एक महिना कोठडीत काढावा लागला. त्याला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला असला तरी जामीन देताना कठोर अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करणे बंधनकारक असून आर्यन या अटी पाळत आहे की नाही, याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ( ) वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, त्याचा मित्र आणि मूनमून धामेचा या तिघांना एकाचवेळी जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटी घातल्या. त्यात जामिनावर असताना तिघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही, अशी अट कोर्टाने घातली आहे. त्यामुळे बालपणीपासूनचे मित्र असलेल्या आर्यन व अरबाज यांच्यासाठी ही मोठी परीक्षाच ठरली आहे. याबाबत अरबाजचे वडील यांनी महत्त्वाची माहिती दिली. वाचा: अस्लम मर्चंट म्हणाले,' कोर्टाने जी अट घातली आहे, त्यानुसार जामिनावर सुटल्यानंतर आता आर्यन व अरबाज या दोघांनाही एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करता येणार नाही. हे दोघांसाठीही खरंतर आव्हान आहे पण अरबाज माझ्याशी याबाबत बोलला आहे. अटींचे पालन मला करावेच लागेल, असे तो म्हणालाय. त्या नरकात कोण जाईल, त्यापेक्षा सक्तीने कोर्टाचे नियम पाळलेले बरे, असेही त्याने सांगितल्याचे अस्लम मर्चंट म्हणाले. अरबाज हा आर्यनचा जवळचा मित्र आहे आणि आर्यन अडचणीत येईल असं कोणतंही काम तो करणार नाही. म्हणूनच दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवले आहे, असे मर्चंट यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान याला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याच्यासोबत अरबाज व मूनमूनलाही अटक करण्यात आली होती. तिघांनाही प्रथम एनसीबी कोठडी देण्यात आली होती तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आर्यनला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. जामिनासाठी या तिघांनाही मोठी धडपड करावी लागली. एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिघांनीही हायकोर्टात धाव घेतली. तिथे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली. अटकेनंतर अखेर २६व्या दिवशी आर्यनसह तिघांनाही जामीन मिळाला. हा जामीन देताना कोर्टाने अनेक अटी घातल्या आहेत. जो आरोप आहे तशी कोणतीही कृती घडता नये, कोर्टाच्या कार्यवाहीबाबत कोणतेही विधान करू नये, पासपोर्ट जमा करावा, विशेष एनडीपीएस कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा त्यातील काही अटी आहेत. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भाजपवर हल्ला करताना जयंत पाटलांचं मोठं विधान; पुन्हा निवडणूक घेतली तर...

पुणे: ' सरकारमधील काहीजण जात्यात आहेत, तर काही जण सुपात आहेत. यांच्या मालकीची बाराशे कोटींची प्रॉपर्टी सील करण्यात आली आहे. आता तरी यांनी अशा सहकाऱ्यांना पाठीशी घालणे थांबवावे आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे', असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी केले असताना त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी घेतला आहे. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. ( ) वाचा: देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्या निकालाचा दाखला देत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. 'देगलूरमध्ये आज निकाल लागला. तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल', असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांचं विधान पाहता त्यांना सत्ता मिळवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी सगळी धडपड चालली आहे. त्यातूनच धाडी आणि अटकसत्र चालवलं आहे. पण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, असे सांगत भाजपने भानावर यावं आणि समर्थ व स्वच्छ विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं आवाहन पाटील यांनी केलं. वाचा: भाजपला टोकाचा विरोध करून राष्ट्रवादी सत्तेत आहे, हे भाजप नेत्यांना बोचत आहे. तो राग त्यांच्या मनात आहे आणि म्हणूनच सूडाचे राजकारण ते करत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारा अधिकारी देश सोडून पळून गेला आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही त्यांना अटक केली जात असेल तर हा बदला घेतला असेच म्हणावे लागेल, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांच्या मालमत्ता जप्त केल्याची ओरड केली जात आहे. मात्र, त्या मालमत्ता त्यांच्या आहेत की नाहीत याचीही खातरजमा केली जात नाही. काहीही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी हे सगळं भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे, असे ट्वीटही जयंत पाटील यांनी केले आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ऐन दिवाळीत CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश; 'कोविड अद्याप गेला नसून...'

मुंबई: विक्रमी संख्येने दर दिवशी देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची सूचना केली आहे. या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिला डोस १०० टक्के नागरिकांना दिला गेला पाहिजे, हे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवून तसे नियोजन करा, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितले. अद्याप गेलेला नाही, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्त्वाचे आवाहनही केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन महत्त्वाचे ठरले आहे. ( ) वाचा: प्रधानमंत्री हे उद्या (३ नोव्हेंबर) कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना येथून सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. करोना संसर्गाची साथ अजून गेलेली नाही. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टिंगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करून द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहीम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. वाचा: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाइल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनीही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे बैठकीला उपस्थित होते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

परमबीर सिंग बेल्जियममध्ये?; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर थेट आरोप

मुंबई: खंडणी आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर तक्रारदार कुठे आहेत, असा सवाल केला जात असून त्यावर बोलताना भाजप आमदार यांनी पर्यावरण मंत्री यांना लक्ष्य केले आहे. ( ) वाचा: परमबीर सिंग हे काही भाजपचे जावई नाहीत. त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच हवी. ते देश सोडून पळाले आणि सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत प्रश्न विचारत असताना ते महाराष्ट्र सोडून कसे गेले याचे उत्तर आधी दिले गेले पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत निशाणा साधला. परमबीर सिंग हा अधिकारी कुणाचा लाडका होता?, सुशांतसिंग मृत्यू प्रकरण असेल, दिशा सालियन प्रकरण असेल, टीआरपी घोटाळा असेल, या सर्वात तुमच्यासाठी परमबीर सिंगच काम करत होते ना?, असे प्रश्न विचारताना तुमच्या इशाऱ्यावर काम करणारे परमबीर आता तुम्हाला का नकोसे झालेत?, अशी विचारणा नितेश यांनी केली. वाचा: परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आदित्य ठाकरे यांचे सतत त्यांच्या कार्यालयात असायचे. ते परमबीर यांच्या नियमितपणे संपर्कात असायचे. त्यावेळचे आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर तपासले तर ती बाब समोर येईल. मग परमबीर कुठे गेले हे आदित्य ठाकरे यांना विचारा, असे आम्ही म्हणायचे का, असा उलट सवाल नितेश यांनी केला. परमबीर यांच्याकडे केवळ अनिल देशमुख यांचीच नाही तर सुशांतसिंग राजपूत व दिशा सालियन प्रकरणाचीही सगळी माहिती असून त्यांना अटक होऊ नये असे या सरकारला वाटत असावे, असा तर्कही नितेश यांनी काढला. परमबीर यांच्या ज्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. त्या पत्रात यांचाही उल्लेख असून त्यांना अटक केली गेली पाहिजे, म्हणजे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असेही नितेश यांनी नमूद केले. वाचा: