टीम इंडियाचा जबरदस्त कमबॅक, २१० धावांचा विशाल स्कोर उभा करून अफगानिस्तानला झोपवले

November 04, 2021 , 0 Comments

T20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या गट 2 च्या सामन्यात भारताने 20 षटकात 210/2 अशी मोठी धावसंख्या उभारली, ज्याला प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ केवळ 144/7 धावा करू शकला.

रोहित शर्माने 47 चेंडूत 74 धावा केल्या तर केएल राहुलने 48 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले असून सूर्यकुमार यादव आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जागी इशान किशन आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आला होता.

अफगानिस्तानने असगर अफगाणच्या जागी शरफुद्दीन अश्रफचा संघात समावेश केला होता. भारतीय संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने केएल राहुलसोबत 140 धावांची जबरदस्त भागीदारी केली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत 53 धावा जोडल्यानंतर दोघांनी 12 व्या षटकात संघाला 100 च्या पुढे नेले.

रोहित 15 व्या षटकात 140 धावा असताना बाद झाला आणि 17 व्या षटकात राहुल 147 धावा असताना बाद झाला, पण तिथून हार्दिक पंड्याने ऋषभ पंतसोबत 63 धावांची दमदार भागीदारी केली आणि संघाला 200 च्या पुढे नेले. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 आणि ऋषभ पंतने 13 चेंडूत 27 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आणि मोहम्मद शहजाद (0) आणि हजरतुल्ला झाझाई (13) चौथ्या षटकात 13 धावा असताना बाद झाले. रहमानउल्ला गुरबाजने 10 चेंडूत 19 धावांची जलद खेळी खेळली, पण सातव्या षटकात तो 48 धावा असताना बाद झाला.

10 व्या षटकात 59 धावांवर गुलबदिन नायब (18) आणि 12 व्या षटकात 69 धावा असताना नजीबुल्लाह झद्रान (11) दोघेही बाद झाले. मोहम्मद नबीने (35) करीम जनातसह सहाव्या विकेटसाठी 57 धावा जोडून संघाला 17 व्या षटकात 100 च्या पुढे नेले. मोहम्मद नबी 19 व्या षटकात 126 धावा असताना बाद झाला. त्याच षटकात 127 धावा असताना राशिद खानही खाते न उघडताच बाद झाला.

करीम जनातने 22 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी करत संघाला 140 च्या पुढे नेले. शरफुद्दीन अश्रफ 2 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, रविचंद्रन अश्विनने दोन आणि जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. सुपर 12 मध्ये भारताचा पुढील सामना 5 नोव्हेंबरला स्कॉटलंडशी होईल, तर अफगाणिस्तानचा सामना 7 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होईल.

महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारचं नागरीकांना दिवाळी गिफ्ट; एका झटक्यात पेट्रोल पाच तर डिझेल दहा रूपयांनी स्वस्त
शिवसेना मंत्र्याच्या पीएची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी व्हिडीओतून मंत्र्यावर केले गंभीर आरोप
हाॅटेल ललितमध्ये कोणते कांड व्हायचे? नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
वडील घाणेरडी भाषा बोलतात तर आई पॉर्न साइट चालवते? सारा अली खानने केला धक्कादायक खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: