नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

November 04, 2021 , 0 Comments

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक दररोज हल्ला करत आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वानखेडेंनी तुरुंगात पाठवले होते. तेव्हापासून ते नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहे. नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.

त्यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्थान मिळाले आहे, पण आज आम्ही तुम्हाला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी सांगणार आहोत. त्यांचे शिक्षण किती आहे? कुटुंबात कोण आहे? मालमत्ता किती आहे आणि त्यांची वादग्रस्त विधाने कोणती?

जन्म यूपीत, पण मंत्री महाराष्ट्रात
नवाब मलिक यांचा जन्म 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील उत्रौला तहसील भागातील धुसवा येथे झाला. नोंदीनुसार, 1970 मध्ये ते कुटुंबासह मुंबईत शिफ्ट झाले. मलिक कुटुंबाचे मुंबईत छोटे-मोठे व्यवसाय होते. त्यांचे एक छोटे हॉटेलही होते. याशिवाय त्यांचा रद्दी, भंगाराचा व्यवसायासोबत आणखी काही छोटे व्यवसाय होते.

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मलिक एकदा म्हणाले होते की, “होय, मी भंगार विक्रेता आहे. माझे वडील मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय करायचे. मी आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसायही केला. माझ्या कुटुंबाला आजही त्याचा अभिमान आहे.” त्यांनी अंजुमन हायस्कूलमधून 10 वी आणि त्यानंतर 1978 मध्ये बुरहानी कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण घेतले.

घरच्यांच्या विरोधामुळे सोडली इंग्रजी शाळा
प्राथमिक शिक्षणासाठी नवाबांना सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वडील मोहम्मद इस्लाम यांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या विरोधामुळे ते इंग्रजी शाळेत गेले नाहीत. नंतर नवाब मलिकांना महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत दाखल करण्यात आले.

येथून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर, डोंगरी येथील जीआर क्रमांक 2 शाळेत सातवीपर्यंत आणि सीएसटी विभागातील अंजुमन इस्लाम शाळेत 11वी पर्यंतचे शिक्षण घेतले. मॅट्रिकनंतर त्यांनी बुरहानी कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. त्याच कॉलेजमध्ये बीएला प्रवेशही घेतला. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.

देशातील नेत्यांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘मायनेटा’ या वेबसाईटनुसार, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. 1979 मध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला, परंतु शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. मलिकवर कोणताही गुन्हा दाखल नाही.

कुटुंबात कोण आहे?
नवाब मलिकांचा पत्नी मेहजबीन, मुलगा मेराज, अमीर आणि मुली निलोफर आणि सना असा परिवार आहे. नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव समीर खान आहे. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग्जच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला तेव्हा समीर खानचे नावही पुढे आले. एका ड्रग पेडलरने त्याचे नाव घेतले होते तेव्हा एनसीबीने त्यांच्या जावयाला अटक केली होती.

राजकारणात कधी आले?
नवाब मलिक यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील नेहरू नगरमधून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही ते येथून विजयी झाले. 2009 मध्ये, मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार झाले.

2014 मध्ये त्यांनी त्याच विधानसभेतून पुन्हा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2020 मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात.

पुलवामा हल्ल्यावर दिलेले वादग्रस्त विधान
नवाब मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्यांबाबत 2020 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त मलिक म्हणाले होते, ‘एका वर्षात हे कळले नाही की आरडीएक्स आले कुठून? 40 जवान शहीद झाले, निवडणूकीचा हा मुद्दा बनला आणि मोदीजींनी निवडणूक जिंकली.

नवाब मलिकांना असे म्हणायचे होते की, पुलवामा हल्ला हा भाजपच्या कटाचा भाग होता. या विधानावर बराच गदारोळ झाला होता. आता सध्याही नवाब मलिक त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्यातील वाद वाढतच चालला आहे.

महत्वाच्या बातम्या
नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?
टीम इंडियाचा जबरदस्त कमबॅक, २१० धावांचा विशाल स्कोर उभा करून अफगानिस्तानला झोपवले
मोठी बातमी! राहूल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब
वडील घाणेरडी भाषा बोलतात तर आई पॉर्न साइट चालवते? सारा अली खानने केला धक्कादायक खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: