फडवणवीसांच्या देखरेखीखालीच राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू; सीबीआय चौकशीच्या मागणीने राज्यात खळबळ

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच तापले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक भाजपवर गंभीर आरोप करत आहेत. रोज पत्रकार परिषद घेऊन ते अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. असे असताना आज देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ड्रग्जचा खेळ हा फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच आणि देखरेखीखाली राज्यात ड्रग्जचा धंदा सुरू आहे या ड्रग्ज कनेक्शनची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. यामुळे आता फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या गाण्याला ड्रग्ज पेडलरने फायनान्स केला असल्याचाही गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे चांगले संबंध आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यवसायाशी काय संबंध आहेत, त्यांचे आणि जयदीप राणाचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केला, असे सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

‘व्हॅटिकनमध्ये मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे?’

मुंबई । सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. असे असताना नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांचा हा दौरा सध्या चर्चेत आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

दरम्यान, व्हॅटिकनमध्ये नरेंद्र मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. याचा धागा पकडून सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते, असे सामनातून म्हटले आहे.

दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा झाले असते, मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले.

हे सर्व मोदींना शोभते, दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. असा टोला यामधून लगावण्यात आला आहे. यामुळे आता भाजपकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच आता अंध भक्तांनी काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल! असेही सामनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते.मोदींचे मोठ्या उत्साहात तेथील भारतीयांनी स्वागत केले. यावेळी मोठ्या घोषणा देण्यात आल्या.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

विराटला ‘या’ १० चूका पडल्या महागात, त्याच चुकांची पुनरावृत्ती केल्याने होतोय टिकेचा भडीमार

दुबई । भारतीय कर्णधार विराट कोहली टी-20 विश्वचषकामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सपशेल अपयशी ठरले. विराट कोहलीची कॅप्टन म्हणून अखेरची स्पर्धा आहे. यानंतर आपण टी-20 फॉरमॅटमध्ये टीमचे नेतृत्व करणार नसल्याच विराटने आधीच स्पष्ट केले आहे. असे असताना देखील त्याने अनेक चुका केल्या.

त्याने केलेल्या दहा चुका देखील त्याने पुन्हा सुधारल्या नाहीत. यामध्ये इंग्लंड दौऱ्यात पुजाराला डच्चू देण्यात आला होता. टेस्ट स्पेशलिस्ट असलेल्या पुजाराला टेस्ट टीममधूनच काढल्यानंतर विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसेच टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनची टीममध्ये निवड करण्यात आली.

पण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अश्विनला खेळवण्यात आले नाही. तसेच गेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर पाठवले. २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एमएस धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आले. यामुळे भारत हा सामना हरला.

तसेच अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली. २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवरूनही बराच वाद पाहायला मिळाला. वर्ल्ड कपआधी बराच काळ अंबाती रायुडू टीम इंडियामध्ये होता, पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये रायुडूची निवड झाली नाही. रायुडूऐवजी विजय शंकर याला टीममध्ये संधी देण्यात आली.

तसेच २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने सेमी फायनलपर्यंत मजल मारली. मात्र नंतर भारताचा पराभव झाला. यामध्ये भारताला चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनमुळे अडचणीचा सामना करावा लागला. त्यावर कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. यामुळे देखील विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

२०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग घेण्यात आली. तेव्हा देखील मोठ्या प्रमाणावर कोहलीवर टीका करण्यात आली. तसेच याच सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात वाद झाले. अखेर अनिल कुंबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हतबल आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटो बघताच अनेकांच्या डोळ्यात आले पाणी..

अनेकदा आपण बघत असतो की, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येत असतात. काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होतात. या व्हिडिओ बघून कधी हसू येते तर कधी आपल्या डोळ्यात पाणी येते. सध्या असाच डोळ्यात पाणी आणणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला. लोकांनी या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये मेट्रो ट्रेनच्या महिला डब्यात सर्व महिला सीटवर बसल्या आहेत, आणि यावेळी प्रत्येकीचे लक्ष आपापल्या मोबाईलमध्ये आहे.

याच ठिकाणी खाली एक महिला आपल्या छोट्याश्या लेकराला घेऊन बसली आहे. शिक्षणाने सर्वकाही मिळवले असे नाही, त्याला थोडी माणूसकीची जोड हवी, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. यामुळे हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

यावर मुळ कारण मोबाईल फोनच वाटत आहे. ऊभे राहून फोन हाताळणे कठीण होईल म्हणून कोणी सीट देत नसावे. असे काहींनी म्हटले आहे. काहींनी आपले स्वत:चे अनुभव शेअर केले आहेत. तसेच बसलेल्या स्त्रियांच्या बाबतीत देखील काहींनी आपले मत मांडले आहे.

कदाचित हा फोटो काढल्यावर ती जागी होऊन तिने त्या दुसरीला जागा दिली असेल. एक क्षणावरून त्या खुर्चीवरच्या बाईची डिग्री कुचकामी वगैरे म्हणणे काही पचत नाही. अशी कमेंट एका महिलेने केली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.

अनेकांनी दोन्ही बाजूने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियावर मात्र हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. कधी काही अपंग व्यक्तींबाबत देखील असे फोटो व्हायरल होत असतात. यावर तीव्र संताप व्यक्त केला जातो.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

विराट कोहली आणि रोहित शर्मा खात आहेत सोशल मीडियावर शिव्या, पराभवानंतर झाले ट्रोल

दुबई । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक-2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सपशेल अपयशी ठरले. विराटला १७ चेंडूत एकही धाव करता आली नाही, तर रोहित शर्मा १४ चेंडूत केवळ १४ धावा करून बाद झाला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले.

यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही लोक त्याला पुढच्या सामन्यातून वगळण्यास सांगत आहेत, तर काहींनी बीसीसीआयला त्याच्यापुढे विचार करण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही सामन्यात भारतीय टीमचा पराभव झाला आहे.

विराट कोहली सामन्याच्या मध्ये सुरू असणाऱ्या जाहिरातींमध्ये अनेकदा दिसला. त्यावरून काहींना त्याच्यावर राग व्यक्त केला. जाहिरातींपेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्याला अनेकांनी दिला. त्याशिवाय, दिवाळीत फटाके वाजवू नका असा विराटने सल्ला दिला होता.

त्यामुळे भारतीयांनी फटाके वाजवू नये म्हणून तुम्ही सामने हारताय का असा प्रश्नही अनेकांनी विचारला. तसेच रोहित शर्माला टीम मधून काढून टाका असेही अनेकांनी म्हटले आहे. तुम्ही आजपण १० विकेट्सनी हारणार का? असाही प्रश्न अनेकांनी विचारला.

तुम्ही दोघे आयपीएलच खेळा कशाला शिव्या खायला आलात? असेही अनेकांनी म्हटले आहे. यामुळे सोशल मीडियावर हे दोघे मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत. दोघांवर मोठी जबाबदारी असताना दोघांनीही चांगली कामगिरी केली नाही.

दरम्यान, इशान किशन ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १४, लोकेश राहुल १८, विराट कोहली ९, ऋषभ पंत १२ असे सारे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी काही काळ झुंज दिली.

पांड्या २३ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर जाडेजाने शेवटपर्यंत पिच सांभाळत नाबाद २६ धावा केल्या. हीच भारताच्या डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. ट्रेंट बोल्टने ३, इशा सोढीने २ तर मिल्न आणि साऊदीने १-१ बळी टिपला.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या शेअर्समधून मिळतोय जबरदस्त परतावा, जाणून घ्या शेअर्सबद्दल…

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने चांगली तेजी दिसून आली आहे. बाजारातील तेजीत अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट किंवा तिप्पट झाली आहे.

यामध्ये सध्या असे स्टॉक्स आहेत, ज्यात भविष्यात गुंतवणूकदारांसाठी मजबूत कमाई करण्याची क्षमता आहे. पूनावाला फिनकॉर्प आणि प्रिझम जॉन्सन हे असेच दोन स्टॉक्स आहेत. पूनावाला फिनकॉर्पने गेल्या एका वर्षात ३४३ टक्के परतावा दिला आहे. तर प्रिझम जॉन्सनचा परतावा सुमारे ७० टक्के आहे.

ब्रोकरेज हाऊसेसमध्ये अजूनही या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. ICICI सिक्युरिटीजने या दोन्ही शेअर्सला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने पूनावाला फिनकॉर्पमध्ये खरेदी सल्ला देताना हा शेअर २६५ रुपयांना होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच वेळी, प्रिझम जॉन्सनवर खरेदी सल्ला देऊन, हा शेअर्स १५२ पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने पूनावाला फिनकॉर्पसाठी २६५ रुपयांचे टार्गेट दिले आहे. २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे १६३ रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीवरून या स्टॉकमध्ये सुमारे ६० टक्के परतावा मिळू शकतो.

गेल्या एका वर्षात या कंपनीच्य स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे तिपटीने वाढले. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत ३६.७५ रुपयांवरून १६३ रुपयांपर्यंत वाढली आहे. शेअर्सची किंमत वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला होता.

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की कंपनी व्यवसायात खुप बदल होत आहे. या कंपनीचा नेतृत्व संघ मजबूत होत आहे. पतधोरणातही बदल करण्यात येत आहेत. याशिवाय, कंपनी जोखीम व्यवस्थापन, डेटा विश्लेषण आणि डिजिटल क्षमता वाढवत आहे. हे पाहता कंपनीचे शेअरची किंमत कायम ठेवण्यात आली आहे.

ICICI सिक्युरिटीजने प्रिझम जॉन्सनसाठी १५२ रुपयांचे टार्गेट दिले आहे. २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे १२० रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपासून सुमारे २६ टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत ७१ रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-
४६ व्या वर्षी जग सोडणारा पुनीत मरताना सोडून गेला करोडोंची संपत्ती, एका सिनेमाचे घ्यायचा २२ कोटी
मी आंबेडरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवले जातीचे सर्टिफिकेट
आर्यन खानला जामीन मिळताच वकील मुकुल रोहतगींनी साधला एनसीबीवर निशाणा; म्हणाले..

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मनीषा कोईरालाने नाना पाटेकर यांना ‘या’ अभिनेत्रीसोबत पकडले रंगेहाथ; नंतर अशी जुंपली की..

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. त्याच्या डायलॉग डिलिव्हरीचे सगळेच चाहते असायचे. आजही त्यांचे नाव इंडस्ट्रीत मोठ्या आदराने घेतले जाते.

मात्र, चित्रपटांव्यतिरिक्त नाना पाटेकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते. नाना पाटेकर यांच्या व्यक्तिरेखेवर त्यावेळी अनेक अभिनेत्री हरपून जायच्या असे म्हणतात. त्याच्या प्रेमात अभिनेत्री मनीषा कोईरालालाही अटक झाली होती. तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते, पण नंतर असे काही घडले की त्यांच्या नात्याचा शेवट वाईट झाला.

खर तर, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी १९९६ मध्ये ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघांमधील जवळीक इतकी वाढली होती की नाना तिच्या घरी येऊ लागले.

मनीषा कोईराच्या घरातून सकाळी बाहेर पडताना नाना अनेकदा दिसल्याचे मनीषाच्या शेजाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी नानांनीही सांगितले होते की, मनीषा त्यांच्या आई आणि मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी येते.

nana_patekar.jpg

तसेच त्यावेळी नाना पाटेकर आणि मनीषा लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, नाना आधीच विवाहित होते. असे असूनही मनीषाचे त्याच्यावरील प्रेम कमी झाले नाही. हळूहळू मनीषा नाना पाटेकरांबद्दल खूप पझेसिव्ह झाली होती.

मनीषा कोईराला बिलकुल पसंद नव्हते की, नाना पाटेकरांनी कोणत्याही मुलीसोबत मिळून मिसळून राहावे. पण एके दिवशी मनीषाने नाना पाटेकरला एका अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडले. ती अभिनेत्री म्हणजे आयशा झुल्का. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जिव्हाळ्याचे होते.

दोघांना एकत्र पाहून मनीषाचा राग अनावर झाला. तिची आणि नानांची चांगलीच झटापट झाली. मनीषाने तर आयशाला खूप चांगले-वाईट सुनवले. त्यानंतर दोघांमध्ये खूप भांडण झाले. या घटनेनंतर मनीषा आणि नानांचे नाते कायमचे तुटले. मात्र, मनीषापासून दूर जाण्याचे दु:ख नाना विसरू शकले नाहीत. अनेकदा त्यांची वेदना त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत असे.

महत्वाच्या बातम्या-
अक्षय कुमारमुळे मोडले अभिनेत्रीचे लग्न; नंतर ‘या’ मुस्लिम अभिनेत्यावर जडले प्रेम
मुलीला लग्नाचं प्रॉमिस करून केला बलात्कार नंतर आपल्या मैत्रिणींना सांगून भर रस्त्यात मारले; पहा व्हिडिओ…
कोण होता ‘पॉवर स्टार’ पुनीत, ज्याच्यासाठी अख्ख कर्नाटक ढसाढसा रडलं, कित्येकांनी आत्महत्या केल्या

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

४६ व्या वर्षी जग सोडणारा पुनीत मरताना सोडून गेला करोडोंची संपत्ती, एका सिनेमाचे घ्यायचा २२ कोटी

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने २९ ऑक्टोबर रोजी जगाचा अचानक निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या ४६ वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याचे सांगितले केली. त्यानंतर पुनीतची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा मृत्यु झाला.

पुनीत केवळ अभिनेताच नाही तर गायकही होता. पुनीतचा जन्म १७ मार्च १९७५ मध्ये झाला होता. त्‍याने २००२ मध्‍ये ‘अप्पू’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

पुनीत चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. त्याच्या निधनामुळे फक्त कर्नाटकातच नाही, तर देशभरात शोककळा पसरली आहे. पुनीतच्या निधनाने कर्नाटकमध्ये मोठी खळबळ पसरली आहे. त्यामुळे तिथल्या शहरांमधील काही भागात कलम १४४ लावण्यात आला आहे.

पुनीतने २९ चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका साकारल्या होत्या. वसंत गीता, एराडू नक्षत्रगालू, बेय्यादा हूवू या चित्रपटातील अभिनयामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. इतकेच नाही, तर पुनीतने जेव्हा बाल कलाकार म्हणून काम केले होते, तेव्हा त्याला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा कर्नाटक राज्य पुरस्कार मिळाला होता.

पुनीत कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता. तो एका चित्रपटासाठी २०-२२ कोटी रुपये मानधन घ्यायचा. तसेच चित्रपटाच्या कमाईचा अर्धा हिस्साही घ्यायचा. सुव्रत्थान हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनीतची वर्षाची इन्कम ४० ते ५० कोटी रुपये होती. पुनीत राजकुमारकडे प्रॉपर्टीत ३ बंगले होते शिवाय त्याच्याकडे रोख स्वरूपात मालमत्ता देखील होती, तसेच २०१९ मध्ये सोन्याच्या त्याच्या संपत्तीचा खुलासा झाला होता, तेव्हा त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने होते.

पुनीतला कार आणि बाइक्सची खूप आवड होती, पुनीत राजकुमारकडे महागड्या बाइक्स आणि महागड्या कार्स होत्या, त्या वाहनांची किंमत आहे ७० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत होती. त्याची एकूण संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पुनीत समाजसेवक म्हणूनही कार्यरत होता.

तो अनेक मुलांचे संगोपन करत होता. पुनीत २६ पेक्षा जास्त अनाथाश्रम, २५ शाळा, १९ गोशाळा, १८०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, १६ वृद्धाश्रम या सर्व गोष्टी सांभाळत होता. इतकेच नाही, तर ४५ शाळकरी मुलांचे जीवनही त्याने घडवले होते. तो सिनेमातून मिळालेल्या मानधनाचाही काही भाग वृद्धाश्रमाला दान करायचा.

महत्वाच्या बातम्या-
मी आंबेडरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवले जातीचे सर्टिफिकेट
याला म्हणतात खरा हिरो! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुनीत कुमारनेही केले नेत्रदान
आर्यन खानला जामीन मिळताच वकील मुकुल रोहतगींनी साधला एनसीबीवर निशाणा; म्हणाले..

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मी आंबेडरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवले जातीचे सर्टिफिकेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंवर गंभीर हे रोज नवनवीन आरोप करताना दिसून येत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी दलित असल्याचे सांगत नोकरी मिळवली होती, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावून घेतला. समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत आणि त्यांच्या वडीलांचे नाव दाऊद आहे असा दावा नवाब मलिकांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या जातीच्या सर्टीफिकेटसह इतर प्रमाणपत्र दाखवली आहे.

मी आंबेडकरवादी आहे. जयभीमवाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी इथे आलो आहे. माझा मुलगाही इथपर्यंत आला आहे. असं सांगत ज्ञानदेव यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्या जातीचे प्रमाणपत्र दाखवले आहे.

ज्ञानदेव वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी आपली सर्व कागदपत्रे दाखवली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

मी आंबेडरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा मला अभिमान आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करु नका, असे आवाहन ज्ञानदेव वानखेडे यांनी केले आहे.

तसेच मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात खरा हिरो! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुनीत कुमारनेही केले नेत्रदान
तब्बल ५० एअर होस्टेसनी भर चौकातच काढली कपडे; लाजेने पाहणाऱ्यांचं पाणी पाणी झालं..
आर्यन खानला जामीन मिळताच वकील मुकुल रोहतगींनी साधला एनसीबीवर निशाणा; म्हणाले..

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

याला म्हणतात खरा हिरो! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुनीत कुमारनेही केले नेत्रदान

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने २९ ऑक्टोबर रोजी जगाचा अचानक निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या ४६ वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याचे सांगितले केली. त्यानंतर पुनीतची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा मृत्यु झाला.

पुनीत अभिनेत्यासोबतच एक समाजसेवकही होते, त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये होती. पुनीतने वडिलांप्रमाणेच डोळे दान केले आहे. प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः १९९४ मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजकुमार यांचाही २००६ साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता अभिनेता चेतन कुमारने ट्विट करुन माहिती दिली आहे की, पुनीतच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन पुनीतच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले आहे.

अभिनेत्याने लिहिले की, ‘मी जेव्हा अप्पू सरांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डॉक्टरांचा एक गट त्यांचे डोळे काढण्यासाठी आला होता. राजकुमार आणि निम्माशिवा या डॉक्टरांप्रमाणे अप्पू सरांनीही नेत्रदान केले. यासोबतच अभिनेत्याने हे उदाहरण म्हणून घेत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नेत्रदान करण्याचे आवाहन केले.

पुनीतची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच शिवराजकुमार यांची कन्या निवेदिता रुग्णालयात पोहोचली होती. पुनीतची प्रकृती पाहण्यासाठी स्टार रविचंद्रन आणि निर्माते जयन्ना आणि केपी श्रीकांत यांनीही हॉस्पिटलला भेट दिली. पुनीतच्या मृत्यूच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुनीत हा फक्त अभिनेताच नव्हता, तर तो अनेक मुलांचे संगोपन करत होता. पुनीत २६ पेक्षा जास्त अनाथाश्रम, २५ शाळा, १९ गोशाळा, १८०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, १६ वृद्धाश्रम या सर्व गोष्टी तो सांभाळत होता. इतकेच नाही, तर ४५ शाळकरी मुलांचे जीवनही त्याने घडवले होते. तो सिनेमातून मिळालेल्या मानधनाचाही काही भाग वृद्धाश्रमाला दान करायचा.

तसेच पुनीत केवळ अभिनेताच नाही तर गायकही होता. पुनीतचा जन्म १७ मार्च १९७५ मध्ये झाला होता. त्‍याने २००२ मध्‍ये ‘अप्पू’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

पुनीत हे साऊथ इंडियन इंडस्ट्रीतले प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे पण इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले कन्नड इंडस्ट्रीतले अभिनेते होते. पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे.

महत्वाच्या बातम्या-
तब्बल ५० एअर होस्टेसनी भर चौकातच काढली कपडे; लाजेने पाहणाऱ्यांचं पाणी पाणी झालं..
एका निर्दोष मुलाला २६ दिवस कोठडीत राहावे लागते हा कुठला न्याय? सुप्रीया सुळे आर्यनसाठी मैदानात
मृत्यूनंतर पुनीत राजकुमार ‘इतक्या’ कोटींची संपत्ती गेला सोडून, आकडा वाचून हैराण व्हाल

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नवाब मलिकांचे खळबळजनक ट्वीट; अमृता फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan drug case) आतापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी (Amruta Fadanvis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. नवाब मलिक यांनी राजकीय विश्लेषकांनी केलेल्या एका ट्वीटचा आधार घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. आज सकाळीच त्यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. चलो भाजपा और ड्रग्ज पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, असं म्हणत नवाब मलिकांनी हा फोटो ट्विट केला आहे. तर, अन्य एका ट्वीटमध्ये या व्यक्तीचे नाव जयदीप राणा असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. तसंच, या ट्वीटनंतर आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत ते आणखी काय खुलासा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाचाः देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा दरम्यान, नवाब मलिकांनी काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय नीरज गुंडे हा एक दलाल असून, तो सध्या वारंवार अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) कार्यालयात जातो, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसंच, वानखेडे यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गुंडे याच्याशी आहे. गुंडे कुणाचे पैसे कुठे लपवतो, हे मला माहिती आहे. त्याच्या चेंबूरच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचे, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नवाब मलिकांनी उल्लेख केलेला तो व्यक्ती कोण?; राणेंनी दिलं प्रत्युत्तर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री () व एनसीबीचे संचालक () यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरुच आहे. नवाब मलिक यांनी या प्रकरणात आता थेट देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावरही निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय नीरज गुंडे हा एक दलाल असून, तो सध्या वारंवार अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) कार्यालयात जातो, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे ()यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडे यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गुंडे याच्याशी आहे. गुंडे कुणाचे पैसे कुठे लपवतो, हे मला माहिती आहे. त्याच्या चेंबूरच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचे. विविध सचिवांकडे त्याचे जाणे-येणे होते. ‘वर्षा’वर त्याचा वावर असायचा. रश्मी शुक्ला प्रकरणातदेखील तो गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. त्यामागे कारण आहे. काशिफ खान, मोहित कंबोज आणि कॉर्डियला क्रूझचा एकमेकांशी संबंध आहे. याबाबत लवकरच माहिती देऊ. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना राज्यभरात तोंड दाखवता येणार नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. वाचाः नवाब मलिक यांच्या आरोपांवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुंडे याच्यावर केलेल्या मलिक यांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘चेंबूरमधील ती व्यक्ती आमचा मित्र नाही, तर कार्यकर्ता आहे. माझे आयुष्य चेंबूरमध्ये गेले आहे. तो दोन नंबरवाल्यांची माहिती देतो. भुजबळ यांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. वाचाः नवाब मलिक यांनी अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा शब्दांत भाजपवर टीका केली होती. त्यावर बोलताना राणेंनी अधिवेशन म्हणजे काय, कोणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? आमचेही १०५ आमदार आहेत. समीर वानखेडेंनी काय केलं?, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले? भ्रष्टाचारच केला नाही, त्यामुळं लागू द्या मागे, असं म्हणत राणेंनी नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वाचाः

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

इंदिरा गांधींनी सीमावासीयांना दिलेला शब्द कोणत्याच सरकारने पाळला नाही…

गेल्या पन्नास वर्षापासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचा बेळगाव धारवाड कारवार भाग हा आजही अन्यायाच्या अंधकारात अडकलेला आहे. अनेक सरकारे आली अन गेली. कित्येक आंदोलने झाली अनेकांनी रक्त सांडलं पण हा प्रश्न आजही सुटलेला नाही.

एकदाच हा प्रश्न अगदी सुटण्याच्या मार्गावर आला होता

गोष्ट आहे साठच्या दशकातली. इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या तर वसनातराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सीमाभागातील आंदोलनाने पेट घेतला होता. आता करो किंवा मरो अशी स्थिती आली आहे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईत होणाऱ्या सभेच्या वेळी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला.

१९६५ साली सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सातही आमदारांनी विधानसभा सभासदत्वाचे राजीनामे देऊ केले.

त्यावेळी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आणि माहाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दिल्लीला भेटीस बोलावले. बॅ. नाथ पै यांच्या नेतृत्वाखाली १६ मे १९६५ रोजी महाराष्ट्र एकीकरणाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेतली, खासदार नाथ पै यांनी सीमावासीयांची कैफियत पंतप्रधानांच्या समोर मांडली. 

श्रीमती इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. दिल्लीच्या भेटीत नाथ पै यांच्यासमवेत शिष्टमंडळाने गृहमंत्री आणि काँग्रेसच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. सर्वांची सहानुभूती दिसून आली. पण ताबडतोबीने काही निष्पत्र होण्याची शक्यता दिसून आली नाही.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईच्या सभेच्या वेळी उपोषणाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले.

२० मे १९६६ राजी उपोषणाला बसण्यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. बा. र. सुंठणकर, अॅड. बळवंतराव सायनाक आणि दे. भ. पुंडलिकजी कातगडे सेनापती बापट यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता सेनापती यांनीही त्यांच्याबरोबर उपोषणास बसण्याचा आपला निर्धार जाहिर केला. उपोषणास बसण्यापूर्वी ही मडळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेली. 

वसंतराव नाईक घरी नव्हते. सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी वाटेत रस्त्यावरच अडविले.

तेव्हा सेनापती बापटांनी रस्त्यावरच बैठक मारून उपोषण सुरु केले. थोड्या वेळात मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले आणि उपोषणाला बसलेल्या नेत्यांना भेटून बंगल्यात घेऊन गेले. हे उपोषण मागे घेण्यासाठी नामदार वसंतराव नाईक यांची शिष्टाई काही सफल झाली नाही आणि उपोषण सुरूच राहिले.

दिनांक २२ मे १९६६ रोजी रात्री ८.३० वाजता पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी सेनापती बापट आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते उपोषणास ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.

त्यांनी उपोषणास बसलेल्या नेत्यांना या प्रश्नांसाठी कमिशन नेमण्याचे आश्चासन दिले. त्यावर सत्याग्रहींनी कमिशनला स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालण्याविषयी सूचना केली असता इंदिरा गांधीनी त्याबाबतीत काही अड़चणी असल्याचे सांगितले. त्यावर सत्याग्रहीनी इतरांशी चर्चा करून आपला निर्णय कळवतो असे पंतप्रधानांना सांगितले.

श्रीमती इंदिरा गांधी निघुन गेल्यावर संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना घेऊन मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुन्हा उपोषणास बसलेल्या नेत्याना घेऊन आले. खूप विचारांती उपोषण करणाऱ्यांची पुढीलप्रमाणे श्रीमती इंदिरा गांधींना पत्र पाठविण्याबाबत एकवाक्यता झाली.

“आम्ही उपोषण सुरू केल्यापासून ज्या उद्दीष्टासाठी आम्ही हे उपोषण सुरू केले त्याच्या दिशेने प्रगती होण्यासारखे असे अद्यापि काही घडलेले नाही कि, त्यासाठी आम्ही उपोषण सोडावे.

बॅ. नाथ पै यांनी हे पत्र श्रीमती इंदिरा गांधीना पोहोचते करावे असा सत्याग्रहींनी आग्रह धरला. त्यानुसार नाथ पै यांनी ते पत्र दिल्लीत इंदिरा गांधीना पोहोच केले.

इंदिरा गांधींनी दिनांक २३ मे रोजी सदर पत्राला पाठविलेल्या उत्तराने उपोषण करणाऱ्या सत्याग्रहीना कळविले की, 

“आंतरराज्यीय सीमावाद न्याय्य आणि शांततेच्या मार्गाने आम्हास सोडवायचा आहे आणि त्यासाठी योग्य अशी यंत्रणा उभी करण्याच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी आज रात्री काँग्रेस वर्किंग कमिटीची सभा भरत आहे.”

श्रीमती इंदिरा गांधीच्या वरील पत्रावर काँग्रेस वर्किंग कमिटीचा ठराव पाहून उपोषणाबाबत निर्णय घेण्याचे उपोषणास बसलेल्या नेत्यानी ठरविले. 

दिनांक २३ मे १९६६ रोजी रात्रौ १२ ३० वाजता श्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक उपोषणास बसलल्या नेत्याना भेटावयास आले. सेनापतीना उठविण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेनापतीनां म्हणाले,

“एक सदस्य यंत्रणा उभी करण्याचा निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटीने घेतला आहे. आपल्या आंदोलनाने खूप मिळविले आहे. उपोषण सोडा.”

पण काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ठरावाने उपोषणास बसलेल्या नेत्यांचे समाधान झाले नाही. ठरावात कालावधी नव्हता. लोकेच्छेबद्दल काही नव्हते. त्यामुळे नामदार यशवंतराव चव्हाण यांची विनंती उपोषण करणार्या नेत्यांनी मान्य केली नाही.

बॅ. नाथ पै यांनी उपोषणास बसलेल्या नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ठरावात कालमर्यादा व निकष यांचा अभाव असल्याने उपोषणास बसलेल्या नेत्यांचे उपोषण सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

दिनांक २४ मे १९६६ रोजी सेनापती बापट यांची प्रकृती खूपच बिघडली. सेनापती बापट यांनी पंतप्रधान इंदिरा गांधीना याबाबत अखेरचे पत्र लिहावे असे ठरले.  हे पत्र नाथ पै यांनी इंदिरा गांधींना द्यावे असे ठरले. 

इंदिरा गांधी वर्किग कमिटीची बैठक संपताच पुण्याला रवाना झाल्या होत्या. २४ मे १९६६ रोजी त्यांचा मुक्काम पुण्याला होता. फोनाफोनी झाली. रात्री नाथ पै यांना पुण्याला पाठवा असा त्यांचा निरोप आला. पुण्याला २५ तारखेला पंतप्रधानांची विरोधी पक्षाच्या नेत्याशी बैठक होती व प्रेस कॉन्फरन्सही होती. त्यावेळी ब. नाथ पै यांची उपस्थिती तेथे अनिवार्य होती.

नाथ यांना बोलवायला प्रा. अनु वर्दे नाथ यांच्या निवासस्थानी गेले. नाथ पै यांना त्या दिवशी बरे वाटत नव्हते. रात्रौ पुण्याला जायचे म्हटल्यावर नाथच्या पत्नी सौ क्रिस्टल संतापल्या. 

‘तुम्ही काय नाथला मारायचे ठरविले आहे काय?’ 

असे खूप संतापाने बोलून गेल्या, पण नाथला स्वत:च्या जीवापेक्षा सेनापती बापटांचे प्राण वाचविणे अधिक मोलाचे वाटले. क्रिस्टलच्या विरोधाला न जुमानता नाथ पुण्याला जावयास निघाले.

सेनापती बापट यांनी पंतप्रधान इंदिरा गांधीना लिहिलेल्या अखेरच्या पत्रात नमूद केले होते की, 

“सीमा भागातील जनता नेहमी आवर्जून सांगत आली आहे की, लोकशाही मार्गानी व्यक्त झालेली लोकेच्छा लक्षात घेऊनच हा प्रश्न सोडवावा ही मागणो योग्य आणि न्याय आहे असे माझे मत आहे. ही मागणी आपण मान्य करावी अशी कळकळीची विनती मी करू इच्छितो.”

सेनापती बापटांचे पत्र नाथनी इंदिराजींना दिले. मुख्यमंत्री वसंतराव नाईकही तिथे उपस्थित होते. एक महिन्यात एक सदस्य कमिशनचा नेमणूक करण्यात येईल आणि विवाद्य भागतील लोकेच्छा हे मूलभूत मार्गदर्शक तत्त्व राहील असे नि सदिन्ध स्पष्टीकरण इंदिराजीनी केले आणि त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेतही श्री. नाईक यांनी ते स्पष्टपणे सांगितले. 

विरोधी पक्षनेत्यांशी झालेल्या बैठकीतही श्रीमती इंदिरा गांधींनी “मी हे अभिवचन पूर्वी दिले आहे. आताही दिले आहे आणि त्याचाच मी पुनरुच्चार करीत आहे!” असे सांगितले.

नाथ पै २५ मे रोजी सायंकाळी मुंबईत आले आणि उपोषणास बसलेल्या नेत्यांना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इतर नेत्यांना सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

श्रीमती इंदिरा गांधींनी आश्वासन दिल्याग्रमाणे एक महिन्याच्या कालावधीत सीमा प्रश्नासाठी एक सदस्य महाजन कमिशनची नियुक्ती केली. पण महाजन कमिशनला कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे दिली नसल्याने महाजन कमिशनचा अहवाल महाराष्ट्राच्या विरोधात गेला आणि सीमा समस्या अधिक जटिल बनला.

त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुका, काँग्रेस पक्षाचे झालेले विभाजन, बांगला देशाची लढाई आणि १९७१च्या जानेवारीत लोकसभा बरखास्त करून इंदिरा गांधींनी घेतलेली लाकसभेची मध्यावधी निवडणूक अशा धकाधकीच्या राजकीय वातावरणात सीमा पश्न रेंगाळत राहिला. आजही तो सुटलेला नाही.

हे ही वाचा भिडू – 

The post इंदिरा गांधींनी सीमावासीयांना दिलेला शब्द कोणत्याच सरकारने पाळला नाही… appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दुचाकी चोरी करणं पडलं महागात; आरोपीला न्यायालयाने ठोठावला 'इतक्या' महिन्यांचा कारावास

: दुकानासमोर उभी असलेली दुचाकी चोरणारा आरोपी शेख जाहेद शेख गुणी याला चार महिन्‍यांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी ठोठावली. देविदास एकनाथ पवार (४९, रा. धनगल्ली, हर्सूल) यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास सेंट्रल नाका येथे मित्राच्‍या दुकानासमोर हॅन्डल लॉक करुन दुचाकी उभी केली होती. दरम्यान, या दुचाकीची चोरी झाली. संबंधित दुचाकी फायनान्‍स कंपनीने जप्‍त केल्याचा संशय आल्याने त्‍यांनी दुसऱ्या दिवशी फायनान्‍स कंपनीकडे चौकशी केली असता, दुचाकी जप्‍त झाली नसून तिची चोरी झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्‍ह्यात दोषारोपपत्र दाखल होऊन प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी आरोपी शेख जाहेद शेख गुणी (२५, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) याने गुन्‍ह्याची कबुली दिली. दरम्यान, न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवून आरोपीला भादंवी कलम ३७९ अन्‍वये चार महिने कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील समीर बदरे यांनी काम पाहिले, तर पैरवी म्हणून जमादार प्रकाश पाईकराव यांनी काम पाहिले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

कोल्हापूर : ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; अत्याचार झाल्याचा संशय

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील खोची या गावातील नवीन मशिदीजवळील स्मशानभूमीत सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीवर अत्याचार करून तिला ठार केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी एका संशयित तरुणास वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा निर्जनस्थळी झाडीत मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या परिसरात गर्दी जमल्याने मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. तसंच संशयिताच्या घराजवळ पोलिसांनी कडक पहारा ठेवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय मुलगी दुपारी बारापासून घरातून गायब झाली होती. आई शेतात कामाला गेली असल्यामुळे दुपारी आई घरी आल्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू झाली. गल्लीतील युवकांनी व काही महिलांनी परिसरामध्ये, नदीकाठी, शेतात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी चार वाजता येथील गावच्या पश्चिमेला असणाऱ्या जुन्या स्मशानभूमीजवळ तिचा मृतदेह काही तरुणांना आढळून आला. त्यांनी तात्काळ वडगाव पोलिसांनी घटनेची माहिती कळवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी जमावाला सांगून घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Kranti Redkar: 'आमच्या घराची तिघांनी रेकी केली आहे, याबाबत काही केलं जावं'; क्रांती रेडकर यांची मागणी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे () विभागीय संचालक यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज नवे आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट करत पाठिंबा मागितला. त्यानंतर वानखेडेंच्या निवासस्थानी भेट दिलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे समीर वानखेडेंनी आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार केली. यादरम्यान, आपच्या घराची तीन जणांनी रेकी केल्याचा खळबळजनक दावा समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तीन जणांनी आमच्या घराची रेकी केली गेल्याचे त्या म्हणाल्या. आमच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार चित्रित झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. (three people have conducted recce of our house says sameer wankhedes wife ) एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या घराजवळ तीघे जण आले होते. त्या तिघांनी आमच्या घराची रेकी केली आहे, असे सांगत या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही मिळवले असल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या. आता आम्ही या प्रकाराची माहिती पोलिसांना देणार असून हे फुटेजही पोलिसांना देणार असल्याचे त्या म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- रेकी करण्यासाठी आलेले लोक भयानक आहेत. ते काय करतील याबाबत काही सांगता येत नाही. माझ्या घरी माझी मुले असतात. ती लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, अशा शब्दात क्रांती रेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. आमच्या घरी कर्मचारी असतात. मात्र, मी आणि समीर घरी नसताना आमच्या मुलांची जबाबदारी कोण घेईल?, त्यांची सुरक्षा कोण पाहील?, असे सवाल क्रांती रेडकर यांनी उपस्थित केले आहेत. आमच्या सुरक्षेसाठी काहीतरी केले जावे असे मला वाटते असेही त्या पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. आपण मुसलमान नसून हिंदू दलित असल्याचे वानखेडे यांनी आठवले यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या जातीसंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे आठवले यांना दाखवले. त्यानंतर आठवले यांनी वानखेडे कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला. नवाब मलिक करत असलेले आरोप चुकीचे असून आपण वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे आठवले म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- तसेच आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या भेटीदरम्यान हलदर यांनीही ज्ञानदेव वानखेडे यांची सर्व कागदपत्रे पाहिली. यावेळी आपल्याला त्रास दिला जात असून आपल्या कुटुंबाला दररोज बेइज्जत केले जात असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी हलदर यांच्याकडे केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या; आरोपीचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला!

: वेतन वाढीसाठी प्‍लांट मॅनेजरला वारंवार पैसे देऊनही वेतन वाढ न देता, उलट होणाऱ्या त्रासाला कंटाळून कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आत्‍महत्‍या केली. या प्रकरणात आरोपी प्‍लांट मॅनेजर मनोज काशिनाथ पवार याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. एम. सुंदाळे यांनी फेटाळला. मृत शिवनाथ कोलते (२८) यांचा भाऊ सोमिनाथ सखाराम कोलते (३२, रा. कविटखेडा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत शिवनाथ हे २०१४ पासून वाळूज येथे १८ हजार रुपयांच्‍या वेतनावर काम करत होते. १६ ऑक्‍टोबर रोजी शिवनाथ यांनी कचरु कोलते यांच्‍या गट क्रं. ८२ येथील शेतातील विहिरीत आत्‍महत्‍या केली. पोलिसांच्‍या पंचनाम्याच्या दरम्यान शिवनाथ यांच्‍या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्‍यात, माझ्या मृत्‍यूस मनोज पवार हा कारणीभूत असल्याचं व मोबाइलमध्‍ये सर्व काही टाईप करुन ठेवलं असल्याचं चिठ्ठीत नमूद करण्‍यात आलं होतें. मृत शिवनाथ यांनी फिर्यादीला मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की, मॅनेजर मनोज पवार हा गेल्या दोन वर्षांपासून वेतन वाढीचे आश्वासन देत होता. त्‍याने शिवनाथ यांना वेतन वाढ देण्‍यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्‍यातील ८० हजार रुपये शिवनाथ यांनी त्‍याला दिले होते. उर्वरित २० हजार रुपयांसाठी आरोपी हा शिवनाथ यांना त्रास देत होता व ‘हा व्‍यवहार घरी सांगू नको’ अशी धमकी देखील पवार हा शिवनाथ यांना देत होता. या घटनेनंतर वडोदबाजार पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. दरम्यान, गुन्‍ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपी मनोज पवार याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्‍यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता एम. एम. अदवंत यांनी काम पाहिले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

elevator collapse: इमारतीची लिफ्ट कोसळून ५ जखमी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: भायखळा येथील जे. जे. मार्ग येथील गुलमोहर टॅरेस या इमारतीमधील लिफ्ट कोसळून () झालेल्या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. (5 injured in building collapse against unknown person) लिफ्ट कोसळून ५ व्यक्ती जखमी झाल्याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. लिफ्टची बांधणी, देखभाल आणि दुरूस्ती यामध्ये निष्काळजीपणे केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आला असून त्याअनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र काहीजण जखमी असून यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- लिफ्ट दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे: १. हुमा खान (२४) २. अर्षा खान (७) ३. सोहन काद्री (३) ४. निलोफर रिजवान शेख (३६) ५. शाहिन खान (४५) क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ऑनलाईन पद्धतीने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी फार्मसीच्या विद्यार्थ्याने केलं धक्कादायक कृत्य!

: भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात एका २४ वर्षीय युवकाने चाकूच्या धाकावर ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बँकेतील नागरिक व सुरक्षारक्षकांनी पकडले. यावेळी त्याला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑनलाइन काढलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. शिवदास रामेश्वर पाडे (अकोट) असं पकडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. श्याम चौकातील एसबीआय परिसरातच बँक ग्राहकांच्या सुविधेसाठी ग्राहक सुविधा केंद्र सुरू आहे. दरम्यान, शिवदास या ग्राहक सेवा केंद्राजवळ गेला. त्या ठिकाणी एक युवती ग्राहकांना रक्कम देणे, अर्ज स्वीकारणे आदी कामांसाठी कर्तव्यावर होती. याचवेळी शिवदासने त्या युवतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यासमोर असलेल्या ड्रावरमधून ५० हजार रुपये काढले आणि पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्याचवेळी युवतीने त्याच्या हाताला झटका दिल्यामुळे ती रक्कम त्याच ठिकाणी पडली. यावेळी युवतीने आरडाओरड केल्यामुळे बँकेचे सुरक्षारक्षक व नागरिकांनी त्याला पकडले. ही माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी तरुण हा शहरातील मार्डी मार्गावरील एका महाविद्यालयात फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. मागील काळात ऑनलाइन पद्धतीने सुमारे ६० ते ७० हजार रुपये त्याने कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करणे गरजेचे असल्यामुळे त्याला पैशांची आवश्यकता होती, त्यासाठीच शिवदीप पाडे याने हा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, अशी माहिती कोतवालीचे एपीआय सोनोने यांनी दिली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

धक्कादायक! सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा निर्घृण खून

: सावंतवाडी शहरात दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या महिलांची नावे निलीमा नारायण खानोलकर आणि शालिनी शांताराम सावंत अशी आहेत. उभा बाजार परिसरात घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या निलीमा खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. मी त्यांची विचारपूस करत आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी आलो असता हाक मारल्यानंतर त्यांनी आवाज दिला नाही. त्यामुळे मी थेट घरात गेलो तेव्हा त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून मी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली. हा प्रकार अज्ञात चोरट्यांकडून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण खून झालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.