२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या शेअर्समधून मिळतोय जबरदस्त परतावा, जाणून घ्या शेअर्सबद्दल…

November 01, 2021 , 0 Comments

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने चांगली तेजी दिसून आली आहे. बाजारातील तेजीत अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांची रक्कम एका वर्षात दुप्पट किंवा तिप्पट झाली आहे.

यामध्ये सध्या असे स्टॉक्स आहेत, ज्यात भविष्यात गुंतवणूकदारांसाठी मजबूत कमाई करण्याची क्षमता आहे. पूनावाला फिनकॉर्प आणि प्रिझम जॉन्सन हे असेच दोन स्टॉक्स आहेत. पूनावाला फिनकॉर्पने गेल्या एका वर्षात ३४३ टक्के परतावा दिला आहे. तर प्रिझम जॉन्सनचा परतावा सुमारे ७० टक्के आहे.

ब्रोकरेज हाऊसेसमध्ये अजूनही या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. ICICI सिक्युरिटीजने या दोन्ही शेअर्सला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने पूनावाला फिनकॉर्पमध्ये खरेदी सल्ला देताना हा शेअर २६५ रुपयांना होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच वेळी, प्रिझम जॉन्सनवर खरेदी सल्ला देऊन, हा शेअर्स १५२ पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने पूनावाला फिनकॉर्पसाठी २६५ रुपयांचे टार्गेट दिले आहे. २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे १६३ रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीवरून या स्टॉकमध्ये सुमारे ६० टक्के परतावा मिळू शकतो.

गेल्या एका वर्षात या कंपनीच्य स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे तिपटीने वाढले. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत ३६.७५ रुपयांवरून १६३ रुपयांपर्यंत वाढली आहे. शेअर्सची किंमत वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला होता.

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की कंपनी व्यवसायात खुप बदल होत आहे. या कंपनीचा नेतृत्व संघ मजबूत होत आहे. पतधोरणातही बदल करण्यात येत आहेत. याशिवाय, कंपनी जोखीम व्यवस्थापन, डेटा विश्लेषण आणि डिजिटल क्षमता वाढवत आहे. हे पाहता कंपनीचे शेअरची किंमत कायम ठेवण्यात आली आहे.

ICICI सिक्युरिटीजने प्रिझम जॉन्सनसाठी १५२ रुपयांचे टार्गेट दिले आहे. २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे १२० रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपासून सुमारे २६ टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत ७१ रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-
४६ व्या वर्षी जग सोडणारा पुनीत मरताना सोडून गेला करोडोंची संपत्ती, एका सिनेमाचे घ्यायचा २२ कोटी
मी आंबेडरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवले जातीचे सर्टिफिकेट
आर्यन खानला जामीन मिळताच वकील मुकुल रोहतगींनी साधला एनसीबीवर निशाणा; म्हणाले..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: