४६ व्या वर्षी जग सोडणारा पुनीत मरताना सोडून गेला करोडोंची संपत्ती, एका सिनेमाचे घ्यायचा २२ कोटी

November 01, 2021 , 0 Comments

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने २९ ऑक्टोबर रोजी जगाचा अचानक निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या ४६ वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याचे सांगितले केली. त्यानंतर पुनीतची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा मृत्यु झाला.

पुनीत केवळ अभिनेताच नाही तर गायकही होता. पुनीतचा जन्म १७ मार्च १९७५ मध्ये झाला होता. त्‍याने २००२ मध्‍ये ‘अप्पू’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

पुनीत चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. त्याच्या निधनामुळे फक्त कर्नाटकातच नाही, तर देशभरात शोककळा पसरली आहे. पुनीतच्या निधनाने कर्नाटकमध्ये मोठी खळबळ पसरली आहे. त्यामुळे तिथल्या शहरांमधील काही भागात कलम १४४ लावण्यात आला आहे.

पुनीतने २९ चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका साकारल्या होत्या. वसंत गीता, एराडू नक्षत्रगालू, बेय्यादा हूवू या चित्रपटातील अभिनयामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. इतकेच नाही, तर पुनीतने जेव्हा बाल कलाकार म्हणून काम केले होते, तेव्हा त्याला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा कर्नाटक राज्य पुरस्कार मिळाला होता.

पुनीत कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता. तो एका चित्रपटासाठी २०-२२ कोटी रुपये मानधन घ्यायचा. तसेच चित्रपटाच्या कमाईचा अर्धा हिस्साही घ्यायचा. सुव्रत्थान हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनीतची वर्षाची इन्कम ४० ते ५० कोटी रुपये होती. पुनीत राजकुमारकडे प्रॉपर्टीत ३ बंगले होते शिवाय त्याच्याकडे रोख स्वरूपात मालमत्ता देखील होती, तसेच २०१९ मध्ये सोन्याच्या त्याच्या संपत्तीचा खुलासा झाला होता, तेव्हा त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने होते.

पुनीतला कार आणि बाइक्सची खूप आवड होती, पुनीत राजकुमारकडे महागड्या बाइक्स आणि महागड्या कार्स होत्या, त्या वाहनांची किंमत आहे ७० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत होती. त्याची एकूण संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पुनीत समाजसेवक म्हणूनही कार्यरत होता.

तो अनेक मुलांचे संगोपन करत होता. पुनीत २६ पेक्षा जास्त अनाथाश्रम, २५ शाळा, १९ गोशाळा, १८०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, १६ वृद्धाश्रम या सर्व गोष्टी सांभाळत होता. इतकेच नाही, तर ४५ शाळकरी मुलांचे जीवनही त्याने घडवले होते. तो सिनेमातून मिळालेल्या मानधनाचाही काही भाग वृद्धाश्रमाला दान करायचा.

महत्वाच्या बातम्या-
मी आंबेडरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवले जातीचे सर्टिफिकेट
याला म्हणतात खरा हिरो! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुनीत कुमारनेही केले नेत्रदान
आर्यन खानला जामीन मिळताच वकील मुकुल रोहतगींनी साधला एनसीबीवर निशाणा; म्हणाले..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: