... म्हणून लोकल सुरु झाल्यानंतर १०० एसटी बस जाणार माघारी

म. टा. प्रतिनिधी, सोमवार, १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० मुंबईकरांच्या वाहतुकीतून माघारी बोलावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या एसटी बस पुन्हा आपल्या मूळ आगारात जाणार असल्याने मुंबईकरांच्या सुमारे २०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक हजार एसटी बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत. शहरांतील विविध मार्गावर त्यांच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत. मात्र लॉकडाउन काळात सर्वांसाठी रेल्वे वाहतुकीवरील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून उद्या, सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एसटीच्या बस मुंबईतील वाहतुकीतून कमी करण्यात येणार आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईबाहेरून आलेल्या चालक-वाहकांची राहण्याची सोय ओयो रुम्स आणि कासा होम्स या ठिकाणी करण्यात आली होती. महामंडळाने त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करत, हे कर्मचारी पुन्हा आपापल्या विभागांत परत जाणार आहेत, यामुळे ३१ जानेवारीपासून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. कमी करण्यात आलेल्या एसटी बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागात पाठवण्यात येतील. त्यानंतर स्थानिक विभागातील दैनंदिन फेऱ्या सुरू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. चार आगारांतून सुटी या पार्श्वभूमीवर, काळा किल्ला, मालवणी, मालाड आणि मागठाणे या बेस्ट आगारातील प्रत्येकी २५ गाड्या कमी करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महामंडळाच्या वाहतूक विभागाने स्पष्ट केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सायबर गुन्ह्यातील गोल्डन अवर म्हणजे काय?

म. टा. खास प्रतिनिधी, देशभरात सध्या प्रथम क्रमांकावर असून यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. सायबर भामट्यांनी लाटलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. अशातच मुंबई सायबर पोलिसांनी एका व्यापाऱ्याचे १० लाख ७० हजार रुपये परत मिळवून दिले आहे. फसवणूक झाल्यानंतरच्या 'गोल्डन अव्हर'मध्ये केलेली तक्रार आणि त्यावर तत्काळ कारवाई यामुळे पोलिसांनी गेल्या वर्षभरात सुमारे १५ कोटी रुपये वाचविले आहेत. वडाळा येथील व्यापारी मनोज शहा यांना एका बनावट ई-मेलद्वारे फसवण्यात आले. काही कळण्याआधीच त्यांच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यामधून १२ लाख ७० हजार रुपये परस्पर वळते करण्यात आले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट गाठले. सहायक पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, उपनिरीक्षक महादेव शिंदे आणि कॉन्स्टेबल सांगळे यांनी शहा याच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यास सुरू केले. ज्या खात्यामध्ये पैसे वळवण्यात आले त्या खात्यावर फसवणूक करून घेतलेली रक्कम शिल्लक असल्याचे दिसत होते. खात्याचा तपशील पोलिसांनी थेट रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आणि पैसे काढण्याआधी ही खाती ब्लॉक करण्याची विनंती केली. त्यानुसार रिजर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार या बँक खात्यामधील व्यवहार बंद करण्यात आले. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांना शहा यांचे १० लाख ७० हजार रुपये परत मिळवता आले. मुंबई सायबर पोलिसांनी २०२०मध्ये अशाप्रकारे सुमारे १५ कोटी रुपये वाचविल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. कुर्ला येथील एक महिला अंत्यविधीमध्ये असताना तिला एक फोन आला. बोलण्याच्या नादात तिने फोन करणाऱ्याला ओटीपी दिला आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे वळविण्यात आले. मात्र या महिलेने विलंब न करता सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने तिचे आठ लाख पुन्हा मिळवता आहे. अमेझॉनमध्ये बक्षीस लागल्याचे सांगून अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या महिलेलाही सुमारे दीड लाखाची रक्कम परत मिळवून देता आल्याचे करंदीकर म्हणाल्या. 'गोल्डन अवर' महत्त्वाचा फसवणूक झाल्यापासून वळते केलेले पैसे काढण्यापर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. अपघाताप्रमाणे सायबर गुन्ह्यामध्ये हा गोल्डन अवर मानला जातो. वळवण्यात आलेले पैसे काढले नसतील तर ज्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आली ती गोठविण्यात येतात. तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे या प्रक्रियेत वेळ घालविण्यापूर्वी बँक खात्याचा तपशील पोलिसांना द्यायला हवा.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाला हसण्यावारी नेऊ नका; अजितदादांनी फटकारले

म. टा. प्रतिनिधी, नगर 'करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. अजूनही करोनासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बघा, येथेही हे पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत,' असे सांगून, मास्क न वापरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री यांनी आपल्या खास शैलीत फटकारले. पवार शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राहुरी, नगर शहर व श्रीगोंदा तालुक्यात विविध कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने करण्यात आली. राहुरी तालुक्यातील कार्यक्रमात त्यांनी करोनाच्या स्थितीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, 'करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात.' 'करोनाचे संकट अद्याप संपले नसून, करोनाला हसण्यावारी घेऊ नका. अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,' असे आवाहन पवार यांनी केले. राज्यात हाय अलर्ट दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी बॉम्बस्फोटाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. 'महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आवश्यक तिथे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील संपूर्ण पोलिस खाते अलर्ट झाले आहे,' असे त्यांनी सांगितले.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

पु. ल. देशपांडे कुटुंबीय-'आयुका' वाद चिघळला

म. टा. प्रतिनिधी, ज्येष्ठ साहित्यिक आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या मृत्युपत्रांवरून देशपांडे कुटुंबीय आणि '' यांच्यामधील वाद आता चिघळला आहे. देशपांडे कुटुंबीय 'पुलं' व सुनीताबाईंचे कायदेशीर वारस नसल्याच्या 'आयुका'चा दावा सिद्ध करण्याचे आव्हान करून देशपांडे कुटुंबीयांनी 'आयुका'ला दुसरी नोटीस पाठवली आहे. तिला 'आयुका'ने अद्याप उत्तर दिले नसल्याचा देशपांडे यांचा दावा आहे. तर 'आयुका'ने या संदर्भात पुणे सत्र न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केल्याने संभ्रमात भर पडली आहे. देशपांडे कुटुंबीयांनी आपल्या वकिलांमार्फत ३० डिसेंबर २०२० रोजी 'आयुका'ला दुसरी नोटीस पाठवली. मात्र, 'आयुका'ने भविष्यातील कायदेशीर पेचात संरक्षण मिळावे, यासाठी आपल्या वकिलांमार्फत चार डिसेंबर २०२० रोजी पुणे सत्र न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केले आहे. 'पुतणे या नात्याने आमचे काका पु. ल. देशपांडे यांची स्मृती व ख्याती जपून आमच्या हक्कांचे संरक्षणही करायचे आहे; तसेच कोणताही हक्क नसताना पुल व त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेवर अधिकार सांगणाऱ्यांना रोखायचे आहे. कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क असतानाही आम्ही त्यावर कार्यवाही केलेली नाही. अलिकडे न्यायालय प्रतिवादींना नोटीस दिल्याशिवाय अंतरिम आदेश काढत नसल्याची कल्पना असताना; तसेच या प्रकरणात कोणतीही घाई नसताना आयुकाने 'कॅव्हेट' दाखल केली आहे,' असे देशपांडे यांच्या नोटिशीत म्हटले आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांचे व पुलंचे मृत्युपत्र आपल्याकडे दिल्याचे 'आयुका'ने म्हटले आहे. त्यामुळे 'आयुका'कडेच या मृत्युपत्रांची मूळ प्रत असल्याचे समजते. मात्र, त्यानंतर 'आयुका'ने पाठवलेल्या पत्रात आपल्याकडे या मृत्युपत्राची प्रत असल्याचे म्हटले आहे. त्यातून 'आयुका'चा खोटेपणा सिद्ध होतो, असा दावा देशपांडे कुटुंबीयांनी केला आहे. 'आयुका'च्या मते देशपांडे कुटुंबीय हेच पुलं व सुनीताबाई देशपांडे यांचे एकमेव कायदेशीर वारस नसतील, तर पुलं व सुनीताबाई यांचे कायदेशीर वारस कोण आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे. तसे शक्य न झाल्यास ही पुलं, सुनीताबाई तसेच देशपांडे कुटुंबीयांचीही गंभीर बदनामी आहे. कोणत्याही खुलाशाशिवाय केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांची गंभीर दखल घेण्याचा इशाराही देशपांडे कुटुंबीयांनी दिला आहे. 'सुनीताबाईंच्या मृत्युपत्राबाबतचे गैरसमज आम्ही दूर करू असे म्हणणाऱ्या 'आयुका'ने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. न्यायालयीन लढाईऐवजी एकमेकांचे म्हणणे समजून घेत त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. हे प्रकरण न्यायालयापुढे येऊन शिक्षण व संशोधनाला वाहिलेल्या 'आयुका'सारख्या संस्थेच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, हाच आमचा हेतू आहे, असा देशपांडे यांच्या नोटिशीत नमूद आहे. 'आयुका'ने द्यावी ही माहिती 'पुल व सुनीताबाई देशपांडे यांच्या पुस्तकांची रॉयल्टी 'आयुका'कडे आहे, हे सिद्ध करणारी कागदपत्र माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आम्ही केली होती. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती देणे बंधनकारक असतानाही 'आयुका'ने ही माहिती दिलेली नाही, असा दावा देशपांडे कुटुंबीयांनी केला आहे. पुलं व सुनीताबाई देशपांडे यांच्या मृत्युपत्राचा आवक क्रमांक व तारीख याची माहिती, पुलं व सुनीताबाईंच्या मृत्युपत्रासंदर्भात 'आयुका'ने केलेल्या ठरावांची प्रमाणित प्रत, मृत्युपत्राचे वाचन केलेल्या समितीची माहिती, पुलंच्या विवादित मृत्युपत्राची प्रमाणित प्रत १५ दिवसांच्या आत सादर करावी,' अशी मागणी देशपांडे कुटुंबीयांनी आपल्या वकिलांमार्फत 'आयुका'कडे केली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट : आयुका 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत आम्ही काहीच बोलणार नाही. आमच्याकडे ही मृत्युपत्र आहेत, असे आम्ही पूर्वीच स्पष्ट केलेले आहे,' असे 'आयुका'तर्फे सांगण्यात आले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई लोकल प्रवासासाठी वेळा पाळा; अन्यथा भरावा लागणार दंड

म. टा. प्रतिनिधी, मुंबई सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवल्यास २०० रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. यामुळे सामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी वेळेपूर्वी सामान्यांना तिकीट देण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. यामुळे एकाच वेळी स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी रोखणे शक्य होईल. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ ही वेळ वगळता उर्वरित वेळेत सर्व प्रवाशांना लोकलमुभा देण्यात आलेली आहे. सध्या कार्यालयीन वेळेत बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी कामावर जाण्यासाठी लोकलमध्ये प्रवेश केल्यास त्यांना रेल्वे पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. साथीच्या रोगाचा कायद्याचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कामात अडथळा आणणे आणि सरकारी सूचनांचे पालन न केल्यास कारवाई होणार आहे. आणि कलम १८८नुसार ही कारवाई होईल. विविध कलमानुसार २०० रुपये दंडाची तरतूद आहे याच बरोबर एक महिन्यापासून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेचादेखील समावेश आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तिकिट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी सामान्यांना प्रवास वेळेपूर्वी तिकिट देण्यात येईल. प्रवासी वेळेत गर्दी विभागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी सांगितले. कार्यालयीन वेळेत बदल झालेला नसताना नेमक्या प्रवास वेळेत प्रवाशांना मुभा देण्यात आलेली नाही. सकाळी ९-१० वाजता सुरु होणाऱ्या कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी सकाळी ७ च्या आधी घरातून बाहेर पडावे लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ३०१ तिकिट खिडक्या ६४२ शिफ्टमध्ये सुरु राहतील. पश्चिम रेल्वेवरील सर्व एटीव्हीएम सुरु करण्यात येतील. सर्व स्थानकांतील सरकते जिने, लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. स्थानकांतील १९८ प्रवेशद्वार खुले करण्यात येतील. यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. सध्या ८६ प्रवेशद्वार खुले आहेत. -सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यात सर्वत्र पोलीस अॅलर्टवर; उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

नगर: 'महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. , यासह महाराष्ट्रात आवश्यक तिथे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील संपूर्ण खाते हे अॅलर्ट झाले आहे,' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज पुन्हा एकदा दिली. ( वाचा: राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ काल बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्यादृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. नगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. वाचा: महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी अजित पवार यांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई-पुण्याच्या सह सर्व राज्यांमध्ये योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत व पोलीस सुद्धा आता अलर्ट झाले आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्लीमध्ये शुक्रवारी आयईडी स्फोट घडवून आणला गेला. त्यानंतर देशातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी देखील अॅलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री पवार तसेच गृहमंत्री यांच्याच चर्चाही झाली होती. त्यानंतर आज नगरमध्ये पवार आले असता त्यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी केली तुकाराम मुंढेंची प्रशंसा; 'हे' कारण

नागपूर: केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) यांनी नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त (Tukaram Mundhe) यांचे तोंड भरून कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. करोनाच्या काळात नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगले काम केल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. करोना काळात लॉकडाउनच्या अंमलबजावणीवरून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वादंग माजले होते. त्यानंतर त्यांची बदलीही झाली होती. (union minister praised ) नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या करोना योद्धा सन्मान कार्यक्रमात बोलताना नीतीन गडकरी यांनी मुंढे यांची प्रशंसा केली. करोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांनी केलेले काम गडकरी यांना आवडले. मुंढे आणि आमदारांनी चांगेल काम केल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. आगामी काळात नागपूर महानगरपालिकेने औषध बँक तयार करावी अशी सूचना गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. त्याच प्रमाणे या औषध बँकेत अत्यावश्यक औषधांचा साठा तयार करावा अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी कार्यकर्त्यांना देत असलेल्या सल्ल्याबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. आम्ही पक्षाला जीवन देतो असे सांगणारे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. मात्र, आधी घर नीट चालवा असे मी त्यांना सांगतो, असे गडकरी म्हणाले. जे कार्यकर्ते घर नीट चालवू शकत नाहीत ते पार्टी काय चालवणार. त्यामुळे आधी घराची जबाबदारी सांभाळा असा सल्ला मी या कार्यकर्त्यांना देत असल्याचे गडकरी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एल्गार परिषद: अरुंधती रॉय यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या...

पुणे: प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर (Arundhati Roy) यांनी एल्गार परिषदेला () संबोधित करताना भारतीय जनता पक्ष (BJP), (RSS) आणि केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असून तो हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी गाजवू पाहत आहे. लपून वार करणे, तसेच दहशत निर्माण करण्याबरोबरच आणि हुकुमशाही लादण्याचे काम देशात सध्या सुरू आहे, अशा शब्दांत रॉय यांनी केंद्रातील मोदी सरकारवर नशाणा साधला आहे. (arundhati roy criticizes bjp and ) पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. देशातील जातीयवाद अजून संपलेला नाही. तसेच धर्माची सर्कसही अजून संपलेली नाही, असे म्हणत आजही जाती आणि धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात असल्याचे अरुंधती रॉय म्हणाल्या. देशातील जनतेला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. या विरोधात सर्वांना एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही लढाई अस्तित्वाची आहे. आता आरएसएस विरुद्ध रेझिस्टन्स अशी ताकद उभी करावी लागेल, असे रॉय पुढे म्हणाल्या. जात, धर्म आणि पुरुषत्व याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी निर्णय घेतले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल म्हणजे त्यांचाच गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असेही रॉय आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- ही भारतीय राज्यघटनेविरोधी काम करणारी परिषद नाही, असे सांगतानाच रॉय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. शहरांमधील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार करणारे तसेच लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही आहोत. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्याच हातात आहे. त्यांचे आवडीचे औषध गोमुत्र हे आहे, असे रॉय पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Farmer Protest: गणतंत्र दिवस हिंसा मामले में अब तक 38 FIR और 84 गिरफ्तारियां, सिंघु, टीकरी, लाल किले पहुंची फोरेंसिक टीम

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। राष्ट्रीय राजधानी में 26 जनवरी को किसानों की ट्रैक्टर रैली के दौरान भड़की हिंसा के बाद, दिल्ली पुलिस ने दंगा करने और सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचाने के विभिन्न मामलों में 38 केस दर्ज किए हैं और इस सिलसिले में 84 लोगों को गिरफ्तार किया है।

दिल्ली पुलिस द्वारा पंजाब और हरियाणा के विभिन्न स्थानों पर कई छापे मारे जा रहे हैं। गणतंत्र दिवस पर लाल किले पर हुई बर्बरता को लेकर दिल्ली पुलिस ने शनिवार को जालंधर में अलग-अलग जगहों पर छापेमारी की। 

विदेशी संगठनों और व्यक्तियों की भूमिका की भी जांच कर रही पुलिस
सूचना के आधार पर दो व्यक्तियों - तरनतारन के जुगराज सिंह और नवप्रीत सिंह - ने 26 जनवरी को लाल किले की प्राचीर पर निशान साहिब का झंडा फहराया था। इन्हें  गिरफ्तार करने के लिए दिल्ली पुलिस ने जालंधर के बस्ती जवाला खेल इलाके में भी छापे मारे। गणतंत्र दिवस पर राष्ट्रीय राजधानी में भड़की हिंसा में विदेशी संगठनों और व्यक्तियों की भूमिका की भी पुलिस जांच कर रही है, जिससे जांच का दायरा और बड़ा हो गया है।

लाल किले पहुंची फोरेंसिक टीम
वहीं 26 जनवरी को हुई हिंसा के सबूत जुटाने के लिए दिल्ली क्राइम ब्रांच और फोरेंसिक एक्सपर्ट की टीम शनिवार को लाल किले पहुंची। यहां जांच एजेंसी ने लाल किले में लगे सीसीटीवी कैमरों के फुटेज इक्टठा किए। इस बीच, पुलिस ने मीडिया से अपील की है कि 26 जनवरी को हिंसक विरोध प्रदर्शन के दौरान के फुटेज को जांच एजेंसी को मुहैया कराए। अपराध शाखा ने इस सिलसिले में जांच में शामिल होने के लिए नौ किसान नेताओं को नोटिस भेजे हैं।

उपद्रव में घायल पुलिसकर्मियों के परिवारों ने प्रदर्शन किया
26 जनवरी को किसानों की ट्रैक्टर रैली में हुए उपद्रव में करीब 400 पुलिसकर्मी घायल हो गए थे। इसके विरोध में दिल्ली पुलिस महासंघ और घायल जवानों के परिवारों के लोग शहीदी पार्क में प्रदर्शन किया। हिंसा में घायल हेड कॉन्स्टेबल अशोक कुमार ने बताया कि मैं लाल किले के गेट पर तैनात था। हम भीड़ को बाहर निकाल रहे थे, इसी दौरान उपद्रवियों ने अचानक हमला कर दिया। उनके हाथों में लाठियां और तलवारें थीं। मुझे सिर और पैरों में चोटें आईं हैं।

घायल जवानों के परिवारों के साथ ही दिल्ली पुलिस के मौजूदा और रिटायर्ड कर्मचारी भी प्रदर्शन में शामिल हुए।

किसानों का गाजीपुर पहुंचने का सिलसिला जारी
UP और हरियाणा से किसान लगातार गाजीपुर पहुंच रहे हैं, क्योंकि मुजफ्फरनगर में शुक्रवार को हुई महापंचायत में यह अपील की गई थी। उधर, किसान नेता आज एक दिन का उपवास रखकर सद्भावना दिवस मना रहे हैं। इसके जरिए वे 26 जनवरी को दिल्ली में ट्रैक्टर रैली में हुई हिंसा का प्रायश्चित करना चाहते हैं।

सिंघु बॉर्डर पर हिंसा के मामले में 44 लोग गिरफ्तार
किसान आंदोलन के सबसे बड़े पॉइंट सिंघु बॉर्डर पर शुक्रवार को स्थानीय लोगों और किसानों के बीच हिंसा हो गई। इसमें 5 पुलिसकर्मी घायल हो गए। एक उपद्रवी ने SHO पर तलवार से हमला कर दिया था। इस मामले में अब तक 44 लोगों को गिरफ्तार किया जा चुका है। वहीं सिंघु और टीकरी बॉर्डर पर सुरक्षा बढ़ा दी गई है।



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
26 January violence, 38 FIRs and 84 arrests so far
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; नारायण राणेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Raj Thackeray) अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. मात्र असे असले तरी त्यांनी राज यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'एखाद्या नेत्याला दर्शनाला जावे असे वाटले, तर त्यावर काय बोलणार?... पण माझ्या शुभेच्छा... त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे', असे नारायण राणे यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हटले आहे. ( congratulated ) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार नारायण राणे यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबतचे प्रयोजन आपल्याला माहीत नसल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र यावेळी नाराययण राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात मात्र शिवसेनेने सहभाग नोंदवला नाही. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राउंड असतात, मातोश्रीवरून बटण दाबले की आलो रस्त्यावर.... शिवसेना सगळे बटन दाबून करते. मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था आता कडक करण्यात आली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावतात, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्र सोडले आहे. क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणाले... मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत ही चांगली गोष्ट असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. रामजन्मभूमीचा अनेक वर्षांपासूनचा वाद मिटून आता राम मंदीर उभे राहत आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला पाहिजे, असे सांगत आपणही स्वत: अयोध्येला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

इजराइली दूतावास के बाहर धमाका: जैश-उल-हिंद नाम के संगठन ने ली ब्लास्ट की जिम्मेदारी, प्रोफेशनल ने बनाया था बम

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। इजराइली दूतावास के पास शुक्रवार शाम को हुए ब्लास्ट  की जिम्मेदारी जैश-उल-हिंद नाम के संगठन ने ली है। वहीं ब्लास्ट वाली जगह एक गुलाबी रंग का कपड़ा या दुपट्टा मिला है। ये आधा जला हुआ है। गुलाबी दुपट्टे का रहस्य क्या है इसका पता लगाया जा रहा है।

इस बीच इस ब्लास्ट को लेकर एक नया खुलासा हुआ है, जिसमें कहा गया है कि रेकी के बाद आईईडी को प्लांट किया गया। जांच में पता चला है कि जिस बम का इस्तेमाल किया गया था, उसकी बनावट और दूसरे डिटेल से पता चलता है कि उसे एक प्रोफेशनल ने तैयार किया था। जांच एजेंसियों के सूत्र बताते हैं कि बम तैयार करने वाले व्यक्ति को पहले से इसकी ट्रेनिंग दी गई थी। इस धमाके की जांच के लिए देश की टॉप एजेंसियां लगी हुई हैं। NSG इस्तेमाल विस्फोटकों का विश्लेषण कर रही है, जबकि NIA और दिल्ली पुलिस की स्पेशल सेल भी जांच कर रही है। उधर इजरायल के पीएम बेंजामिन नेतन्याहू ने कहा कि इजरायल के लोगों की सुरक्षा के लिए भारत पर भरोसा है। भारत इजरायलियों की सुरक्षा सुनिश्चित करेगा।

ब्लास्ट के समय एम्बेसी के आसपास 45 हजार मोबाइल फोन एक्टिव थे
सूत्रों के हवाले से मिली जानकारी के अनुसार जांच में सामने आया है कि ब्लास्ट के समय आसपास के इलाके में 45 हजार मोबाइल फोन एक्टिव थे। जांच टीम को उस एरिया के मोबाइल टॉवर के यह डेटा मिला। हालांकि यह साफ नहीं है कि धमाके को अंजाम देने वाले लोग वारदात के दौरान अपने साथ फोन रखे हुए थे या नहीं। 

कैब बुक करने वालों के डेटा की हो रही पड़ताल
दिल्ली पुलिस की क्राइम ब्रांच एपीजे अब्दुल कलाम रोड पर आने या यहां से जाने के लिए कैब बुक करने वालों के डेटा की पड़ताल भी कर रही है। इनमें ओला और उबर समेत दूसरी कैब सर्विस शामिल हैं। शुक्रवार दोपहर 3 बजे से शाम 6 बजे के बीच कैब लेने वालों की जानकारी जुटाई जा रही है। इसके अलावा पहले पूरी सड़क की सीसीटीवी 3 घंटे की ली गई थी। अब 3 दिन की फुटेज ली जा रही है।

ब्लास्ट के लिए टाइमर का इस्तेमाल किया गया
अब तक की जांच में पता चला है कि ब्लास्ट के लिए टाइमर का इस्तेमाल किया गया था। जांचकर्ताओं ने घटनास्थल से ड्राई सेल के टुकड़े इकट्ठा किए हैं। आशंका ये है कि धमाके के लिए प्रयोग में लाया गया विस्फोटक मिलिट्री ग्रैड का है। हालांकि इस बारे में फॉरेंसिक रिपोर्ट अभी भी नहीं आई है।

गुलाबी दुपट्टे की भी होगी जांच
इस्राइल दूतावास के पास जहां धमाका हुआ था वहां से बरामद लिफाफे और जले हुए पिंक कलर के दुपट्टे की पुलिस जांच कर रही है। पुलिस ने मामले में 3डी मैपिंग भी कराई है। एफएसएल की टीम ने भी मौके से आज कई साक्ष्य जुटाए हैं। पुलिस ने दो ईरानी नागरिकों को हिरासत में लेकर उनसे पूछताछ कर रही है। 

इजराइल के राजदूत ने कहा- यह आतंकी हमला ही था
इजराइली दूतावास के पास शुक्रवार को हुए ब्लास्ट को इजराइल के राजदूत रॉन मलका ने आतंकी हमला करार दिया है। न्यूज एजेंसी से बात करते हुए मलका ने शनिवार को कहा, ‘हमारे पास इस पर भरोसा करने के पर्याप्त कारण हैं कि यह आतंकी हमला था। हम इससे हैरान नहीं है। खुफिया इनपुट मिलने के बाद पिछले कुछ हफ्तों से हम अलर्ट थे।’ इजराइल के डिफेंस ने हमले के पीछे ईरान के इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) का हाथ बताया है।

जांच में अब तक मिले अहम सबूत

  • फॉरेंसिंक टीम की तफ्तीश में सामने आया है कि ब्लास्ट के लिए अमोनियम नाइट्रेट का इस्तेमाल किया गया था।
  • मौके से क्राइम ब्रांच की टीम को आधा जला हुआ लाल रंग का दुपट्टा (scarf) और इजराइली राजदूत के नाम एक लिफाफा मिला है।
  • सूत्रों के मुताबिक, इस लिफाफे के अंदर से एक चिट्ठी भी बरामद हुई है। इसमें 'यह तो ट्रेलर है' लिखा है। फॉरेंसिक टीम अब फिंगर प्रिंट की जांच कर रही है।
  • जांच एजेंसियों ने घटनास्थल से कोल्ड ड्रिंक कैन के टूटे हुए टुकड़े और बॉल बियरिंग्स बरामद किया है। इन टुकड़ों को जांच के लिए फॉरेंसिक लैब भेजा गया है।
  • शुरुआती जांच से पता चला है कि कोल्ड ड्रिंक कैन में विस्फोटक और बॉल बियरिंग्स को ठूंस दिया गया था।


.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Explosion outside Israeli embassy, organization named Jaish-ul-Hind took responsibility for the blast
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

Sharad Pawar: नव्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारांनी मांडले परखड मत, म्हणाले...

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात असताना झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर शेतकरी आंदोलनाबरोबरच इतर महत्वाच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमकपणे सरकारला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, खासदार यांनी ट्विट करत याचेच संकेत दिले आहेत. नव्या केंद्रीय कृषी कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अधिकारांवरच गदा येणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी बाजारा समित्यांमधील सुधारणांबाबत पूर्वी मांडलेल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. ( says new agricultural laws restrict the powers of mandi system) सुधारणा ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या सुधारणांविरोधात कोणीही भूमिका घेऊ शकत नाही. पण यावरील वादाचा अर्थ ही व्यवस्था कमजोर किंवा उद्ध्वस्त केली जावी असा होत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. पवार कृषीमंत्री असताना मांडण्यात आलेला सुधारणांचा मसुदा आणि मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांतील बदल यांमधील फरकही त्यांनी स्पष्ट केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम २००७चा मसुदा आपल्या कार्यकाळात तयार करण्यात आला होता, असे पवार यांनी म्हटले आहे. यामध्ये विशेषत: बाजार व्यवस्थेचा उल्लेख होता. याद्वारे अस्तित्वात असलेली बाजार समित्यांची पद्धत कायम ठेऊन शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करायची होती, असेही त्यांनी स्पष्ट करतानाच मात्र बाजार समित्यांच्या शक्तीवरच निर्बंध आणणारे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या नव्या कायद्यांमधील विविध तरतुदींनुसार खासगी बाजाराकडून कर आणि शुल्क आकारणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीच्या व्यवस्थेवर विपरित परिणाम होणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यामुळे बाजार समित्यांची पद्धत कमजोर होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. किमान आधारभूत किंमतीची पद्धत ही अधिक सक्षम करणं गरजेचे असल्याचे सांगत सुधारित अत्यावश्यक वस्तू कायद्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे, बागायती उत्पादनांत १०० टक्के तर नाशवंत वस्तूंच्या किंमतीत ५० टक्के वाढ झाली तरच या कायद्याद्वारे सरकारला किंमत नियंत्रणासाठी हस्तक्षेप करता येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. क्लिक करा आणि वाचा- शरद पवार पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात की, धान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेलबिया यांच्या साठ्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यामुळे कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्हेंचर्स हा माल कमी भावात विकत घेतील आणि त्याचा साठा करुन तो ग्राहकांना चढ्या किंमतीत विकतील अशी भीती पवार यांनी व्यक्त केली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Anna Hazare: तुमच्या मंत्र्यांनी काय केलं होतं सांगू का?; अण्णांनी घेतला शिवसेनेचा समाचार

नगर: शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून ज्येष्ठ समाजसेवक यांच्या स्थगित झालेल्या आंदोलनावर तीरकस भाष्य करण्यात आले आहे. ‘आंदोलने फक्त राजवटीतच करायची काय? बाकी आता अवतरले आहे काय,’ असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. त्याला उत्तर देताना हजारे यांनी म्हटले आहे, ‘मी आंदोलने केली, त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात काय?’ ( Latest News Update ) वाचा: हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. शिवसेनेने अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत,' असे शिवसेनेने म्हटले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा: हजारे म्हणाले, ‘गेल्या चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी मोठी अनेक आंदोलने मी केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत. त्यात , काँग्रेस, व भाजपचेही नेते आहेत. तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत होतात. तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे हे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय? तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कसे पाठिशी घातले. याची मी सर्व माहिती देईन,’ असा इशाराही हजारे यांनी दिला आहे. वाचा: आपल्या आंदोलनाच्या पद्धतीची माहिती देताना हजारे म्हणाले, ‘आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. आतापर्यंतचा अनुभव पहाता सर्वच पक्षांच्या सरकार विरोधात आपली आंदोलने झाली आहेत. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो आहोत. दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात २०१४ पासून अनेक वेळा मी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकार विरोधात आतापर्यंत आपली सहा आंदोलने झाली आहेत. दिल्लीत वन रँक वन पेन्शनसाठी व भूमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल - लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथेही २०१९ मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय,’ असा सवाल हजारे यांनी शिवसनेला उद्देशून केला आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Bacchu Kadu: अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी दिला 'हा' निर्वाणीचा इशारा

नगर: ‘उच्चाधिकार समिती नियुक्त करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आपले नियोजित आंदोलन स्थगित केले. मात्र, सहा महिन्यांत या मागण्यांवर सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर आम्हीच शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू,’ असा इशारा जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी दिला. बच्चू कडू यांनी आज येथे हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ( Latest News Update ) वाचा: अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांशी संबंधित मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कालच यावर तोडगा निघाल्याने त्यांनी हे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर आज सकाळी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विभागनिहाय पिकांना व मिळाले पाहिजे असे सांगून शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या आणि आंदोलने यावर दोघांत चर्चा झाली. वाचा: कडू यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘स्वामीनाथन आयोगासह शेतकऱ्यांसंबंधी अन्य पंधरा मुद्द्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत. अन्यथा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल. बाजरी, भात, कापूस या पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी आमचा आणि हजारे यांचाही पाठपुरावा सुरू आहे. आता केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू. जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभारणार आहोत.’ वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Coronavirus one year: लॉकडाउन, पलायन, वैक्सीन जानें 365 दिन में कोरोना ने कैसे बदली लोगों की जिंदगी

डिजिटल डेस्क, नई दिल्ली। कोरोना वायरस संक्रमण का पहला केस भारत में 30 जनवरी 2020 को केरल में सामने आया था। तब देश के ज्यादा लोगों को इस बीमारी के बारे में कोई जानकारी भी नहीं थी। ये वो महीना था जब कोरोना दुनियाभर में तेजी से फैल रहा था। भारत से पहले दुनिया के 18 देशों में कोरोना के केस मिल चुके थे। फरवरी में भारत में 3 केस सामने आ चुके थे, लेकिन मार्च के बाद सबकुछ बदलना शुरू हो गया था। 

पहला मरीज मिलने के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश को संबोधित करते हुए 24 मार्च को संपूर्ण लॉकडाउन का ऐलान किया। ये भारत के इतिहास में पहली बार हुआ था। जब इतनी बड़ी आबादी को घरों में कैद कर दिया गया।ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी के मुताबिक भारत में दुनिया का सबसे सख्त लॉकडाउन लगाया गया। आज कोरोना का पहला मामला आए एक साल पूरा हो चुका है। पिछले 12 महीने में कोरोना देश में बहुत कुछ बदल दिया है। कोरोना के दौर में लॉकडाउन, मजदूरों का पलायन, आत्मनिर्भर भारत, वैक्सीन से लेकर बहुत कुछ देखने को मिला। 



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
Coronavirus completes one year in India coronavirus latest updates coronavirus new cases in India
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

Ajit Pawar: राज्यात सर्वत्र पोलीस अॅलर्टवर; उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

नगर: 'महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. , यासह महाराष्ट्रात आवश्यक तिथे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील संपूर्ण खाते हे अॅलर्ट झाले आहे,' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज पुन्हा एकदा दिली. ( वाचा: राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ काल बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्यादृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. नगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. वाचा: महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी अजित पवार यांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई-पुण्याच्या सह सर्व राज्यांमध्ये योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत व पोलीस सुद्धा आता अलर्ट झाले आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्लीमध्ये शुक्रवारी आयईडी स्फोट घडवून आणला गेला. त्यानंतर देशातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी देखील अॅलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री पवार तसेच गृहमंत्री यांच्याच चर्चाही झाली होती. त्यानंतर आज नगरमध्ये पवार आले असता त्यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

किसान आंदोलन में आए बदलाव पर टिकैत ने कहा, तूफान में सूखी टहनी-डालियां टूट गईं, मजबूत स्तम्भ बरकरार 

डिजिटल डेस्क ( भोपाल)। गणतंत्र दिवस के दिन लाल किले पर हुई घटना के बाद से आंदोलन पर काफी असर पड़ा। किसान संगठनों पर दबाब बनना शुरू हो गया और उनपर तरह-तरह के आरोप लगने लगे, हालांकि भारतीय किसान यूनियन के राष्ट्रिय प्रवक्ता राकेश टिकैत ने कहा कि, एक तूफान आया था, इस तूफान में टहनी, डालियां और खोखले दऱख्त टूट गए, अब सिर्फ मजबूत स्तम्भ खड़े हैं। दरअसल, दिल्ली की सीमाओं पर इस आंदोलन की शुरूआत नवंबर 2020 में हुई। गाजीपुर बॉर्डर पर टिकैत के समर्थकों की भीड़ कम थी। हालांकि मौजूदा समय में टिकैत के ही समर्थक ज्यादा दिखाई दे रहे हैं।

भारतीय किसान यूनियन के नेता राकेश टिकैत ने आईएएनएस को बताया, ज्यादा भीड़ के लिए व्यवस्था करनी पड़ती है, खेत का काम छूटेगा और यहां कोई काम नहीं है। आंदोलन में आप पांच आदमी बिठा दो और किसान संगठन का झंडा सड़क के बीच में लगा दो, किसी सरकार की ताकत नहीं की उस झंडे को भी हाथ लगा दे। आंदोलन भीड़ से नहीं चलता, आंदोलन का मकसद क्या है उससे चलता है।

उन्होंने आगे कहा कि, इस तूफान में हल्की टहनियां, डालियां और खोखले दऱख्त थे, वह टूट गए, अब सिर्फ मजबूत स्तम्भ खड़े हैं। गाजियाबाद से भारतीय किसान यूनियन (आराजनैतिक) के बैनर तले आए विजेंदर सिंह ने आईएएनएस को बताया, हमें एमएसपी पर गारंटी चाहिए और सरकार इन तीनों कानून को वापस लेले, हम यहां से तुरन्त हट जाएंगे।

सरकार ने एक जहर का ग्लास दे दिया है, अब उसमें से एक चम्मच कम करें या दो चम्मच, जहर तो जहर होता है। बॉर्डर पर बढ़ती भीड़ पर उन्होंने कहा कि, गणतंत्र दिवस पर हम सभी परेड में शामिल होने के लिए आए थे। इसके बाद हम अपने गांव रवाना हो गए, अब फिर आन्दोलन में शामिल होने आए हैं। हमारे ऊपर प्रशासन ने दबाब बनाया, जिसके कारण हमारे नेता के आंखों में आंसू आए। उसी आक्रोश में बॉर्डर पर भीड़ बढ़ रही है और जिसके पास जैसी सहूलियत है वह उससे आ रहा है।

दरअसल, किसान संगठन तीनों कृषि कानूनों को निरस्त करने और न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) पर फसलों की खरीद की कानूनी गारंटी की मांग कर रहे हैं, जबकि सरकार नये कानूनों में संशोधन करने और एमएसपी पर खरीद जारी रखने का लिखित आश्वासन देने को तैयार है।

केंद्र सरकार द्वारा लागू कृषक उपज व्यापार और वाणिज्य (संवर्धन और सुविधा) कानून 2020, कृषक (सशक्तीकरण एवं संरक्षण) कीमत आश्वासन और कृषि सेवा करार कानून 2020 और आवश्यक वस्तु (संशोधन) कानून 2020 को वापस लेने और न्यूनतम समर्थन मूल्य पर फसलों की खरीद की कानूनी गारंटी देने की मांग को लेकर किसान 26 नवंबर 2020 से दिल्ली की सीमाओं पर डेरा डाले हुए हैं।

 प्रधानमंत्री ने कहा  कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर किसानों से सिर्फ एक फोन कॉल की दूरी पर हैं...

सर्वदलीय बैठक के बाद कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी ने कहा कि, प्रधानमंत्री जी ने कहा कि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर किसानों से सिर्फ एक फोन कॉल की दूरी पर हैं। किसान नेताओं को कहा गया कि सरकार की तरफ से जो प्रस्ताव आपके सामने पेश किया गया है, जब आप मन बना लेंगे और नतीजे पर पहुंच जाएंगे तो तोमर साहब एक फोन कॉल की दूरी पर हैं। 

चौधरी ने बताया कि,  हमने कृषि कानून को वापस लेने की गुहार लगाई। बेरोजगारी, आर्थिक स्थिति और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा उठाया। हमनें जम्मू-कश्मीर का मुद्दा भी उठाया और कहा कि उसे राज्य का दर्जा दिया जाए। हम देश की सुरक्षा के मुद्दे पर सरकार के साथ हैं। 



.Download Dainik Bhaskar Hindi App for Latest Hindi News.
.
...
FarmersProtest: Agri Minister assured farmers, he is a phone call away from them provided they accept govts proposal    
.
.
.


from दैनिक भास्कर हिंदी

जयंत पाटील जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसतात...

यवतमाळ: 'अनेक वर्षे राजकारणात असलेल्या प्रत्येकालाच मुख्यमंत्रिपदाची इच्छा असते,' असं वक्तव्य करून राजकीय चर्चेला तोंड फोडणारे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी काल चक्क स्टेअरिंग हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद दौऱ्यात घडलेल्या या प्रकारामुळं पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. वाचा: पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीनं परिवार संवाद अभियानं सुरू केलं आहे. त्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी राज्यभर दौरा करत आहेत. काल जयंत पाटील हे यवतमाळमध्ये होते. दिवसभर पक्षकार्याचा आढावा, सभा, बैठका, जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा पाटील यांचा भरगच्च दिनक्रम आहे. त्यामुळं सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी पक्षबांधणी विषयी सविस्तर चर्चा करता येत नाही. हे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी रात्री जयंत पाटील यांनी स्वत: गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले आणि मध्यरात्री १ ते ३.१७ वाजेपर्यंत सुमारे अडीच तास गाडी चालवली. या दरम्यान त्यांनी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे त्यांच्यासोबत होते. वाचा: पक्षवाढीसाठी जयंत पाटील करत असलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळं युवा टीम प्रभावित झाली. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, जयंत पाटील यांचे ड्रायव्हिंग सीटवरील फोटो झळकल्यानं त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बोलेरो जीपची धडक लागून बाइकने पेट घेतला आणि...

ते परतवाडा मार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसेगाव पूर्णा येथे घडली. निवृत्ती दीपक सोलव (वय १४) आणि राज अनंत वैद्य (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. (Accident on Amravati Paratwada Highway) वाचा: निवृत्ती सोलव व राज वैद्य हे काल संध्याकाळी अचलपूर तालुक्यातील तळणी पूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे जात होते. समोरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच २७/ बीएक्स ३८१२) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामध्ये निवृत्ती सोलव हा मोठ्या प्रमाणावर भाजला. त्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर राज वैद्य त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मास्क न वापरणाऱ्यांपुढे डोके फोडून घेऊ का?; अजितदादा भडकले

अहमदनगर: काळात सुरुवातीपासून दक्षता घेणारे उपमुख्यमंत्री अद्यापही काळजी घेताना दिसतात. एवढेच नाही तर इतरांनी काळजी घ्यावी, असा त्यांचा अग्रह असतो. आज तालुक्यातील वांबोरी येथे आयोजित कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून पवार चांगलेच भडकले. ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का,’ असा आपल्या खास शैलीत त्यांनी संताप व्यक्त केला. वाचा: उपमुख्यमंत्री पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. वाचा: पवार म्हणाले, ‘करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. वाचा: या सभेत पवार यांनी राजकीय टोलेबाजीही केली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा नाव न घेता त्यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘नगर आणि पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. पुण्याचे दहा तर नगरने सात आमदार दिले. अकोल्यात ऐनवेळी पक्षाला सोडून गेलेल्यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीला सोडलेल्यांची अशीच अवस्था होते. नगर जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार तरुण आहेत. त्यातच राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माझ्याकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा. नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. आता त्यांचे हित जोपासणे आमची जबाबदारी आहे,’ असेही पवार म्हणाले. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times