संगमनेर : ‘निळवंडे’ कालव्यांच्या कामात दुजाभाव

September 04, 2022 0 Comments

https://ift.tt/02OITRs

संगमनेर : राजेश गायकवाड : निळवंडे धरणासह डाव्या व उजव्या कालव्यांची कामे 40 वर्षांच्या प्रदीर्घ काळापासून अर्धवट राहिल्याने दुष्काळी भागातील लोकांना पाण्याची प्रतीक्षा वाढली. आता उशिराने होणार्‍या या कामात दुजाभाव दिसत आहे. डावा कालवा पूर्णत्वाकडे, तर उजव्या कालव्याला कोणी वालीच नसल्याने या कामाला कासवगती आल्याचे वास्तव दिसत आहे. परिणामी निळवंडे धरणातील उजव्या कालव्याद्वारे येणार्‍या पाण्याची प्रतीक्षा वाढल्याचे चित्र दिसत आहे. सन 2019 निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारकडून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दीड वर्षात कालव्यांना पाणी दिसेल, असे आश्वासन दिले होते. तोच मुद्दा पकडून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2022 सालापर्यंत हे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते.

उजव्या-डाव्या कालव्यांद्वारे दुष्काळी भागांना पाणी मिळावे, म्हणून या कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी लाभधारक शेतकर्‍यांनी आंदोलनांसह न्यायालीन लढा सुरू केला. यातून सरकारला जाग येऊ लागली. मात्र, सत्तांतर होऊ लागले. पहिले अडीच वर्षे महाविकास आघाडीचेे सरकार आले अन् आता शिंदे-फडणवीस सरकार आले. सत्तातंराच्या या कात्रीत कालव्यांच्या कामाची गती मंदावली. अधिकारी व पाटबंधारे विभाग लवकर हे काम पूर्ण करू, असे म्हणू लागले. अधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे खरोखरंच हे पाणी येण्यास विलंब लागणार, अशी चर्चा झडताना दिसत आहे.

संगमनेर, अकोले, राहाता व राहुरी तालुक्यातील कायमस्वरुपी पाण्याचा दुष्काळ दूर होण्यासाठी निळवंडे धरणासह डाव्या व उजव्या कालव्याची संकल्पना पुढे येऊन निळवंडे धरणाचे काम प्रथम झाले. यानंतर उजव्या कालव्याला दिशा देत 2001 ला या कालव्याच्या कामांना सुरुवात करून, उर्ध्व उजव्या कालव्याला 23.57 कोटी निधी मंजूर झाला. मात्र, केवळ हलगर्जीपणामुळे काम धिम्यागतीने होऊ लागले. या कालव्यांच्या कामात 19 वर्षांच्या कालखंडामध्ये अनेकदा दिरंगाई दिसली. 3566.39 लक्ष एवढा मोठा निधी केवळ 20 टक्के कामासाठी लागला.

या कालव्याच्या दोन बोगदा निर्मितीसाठी 3468.70 लक्ष एवढा निधी लागला. निळवंडे धरणासह डाव्या व उजव्या कालवा निर्मितीवरून अनेक वर्षांपासून राजकारण झाले. आज ना उद्या पाणी येईल, या अपेक्षेने भोळी-भाबडी जनता भुलभुल्लैयाच्या मोहात पडून भरभरून यांच्यावर प्रेम करते. मात्र, पदरी दुष्काळी परिस्थिती आली. उर्ध्व उजव्या कालव्याच्या पाण्याखाली 69 गावांचे 20,395 हेक्टर लाभक्षेत्र येणार असल्याने दुष्काळी परिस्थितीच गायब होणार. मात्र, यावर राजकारणच झाले.

दुष्काळी भागाला निळवंडेे धरण व कालवे वरदान ठरणार आहेत. शेतकर्‍यांचेे पाण्याविना जीवन अधुरे आहे. निळवंडे धरण व होणार्‍या उजव्या- डाव्या कालवे कामाच्या परिस्थितीचा आढावा घेवून विशेष प्राधान्याने कामाला गती देण्याचे आदेश दिले. कामाला पुन्हा वेग आल्याचे चित्र दिसते. दोन्ही कालव्यांना लवकरच पाणी आणून शेतकर्‍यांना आनंदी करणार आहे.
                                          -राधाकृष्ण विखे पाटील ( महसूल मंत्री महाराष्ट्र)

The post संगमनेर : ‘निळवंडे’ कालव्यांच्या कामात दुजाभाव appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/T7h3tOa
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: