पिंपरखेणेत चोरांची टोळी जेरबंद

September 04, 2022 0 Comments

https://ift.tt/IoBS1m0

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पिंपरखेणे येथे गेल्या आठवड्यामध्ये पांडुरंग श्रावणा पिचड यांचे किराणा दुकान फोडून वस्तू व रोकड चोरुन नेणार्‍या पाच चोरट्यांना राजूर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरकणे येथील पांडुरंग श्रावणा पिचड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीद्वारे पिंपरकणे गावातील पाच जणांनी ही चोरी केल्याचे समजले. रवींद्र भरत गवारी, धर्मानाथ मारूती पिचड, विठ्ठल दुंदा सावळे, अनिल कारभारी पिचड, योगेश रामदास पिचड या संशयित व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी पाडुरंग श्रावणा पिचड (रा. पिंपरकणे) यांचे किराणा दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 11 हजार 230 रूपये किंमतीच्या दुकानातील वस्तू, कटलरी माल, गॅस टाकी, शेगडी, किराणा माल 11 हजार 230 रुपयांचा चोरल्याची कबुली दिली. पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे व पो. हे. काँ. के. डी. नेहे करीत आहेत.

The post पिंपरखेणेत चोरांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/nJE9FkQ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: