नगर : एक हजार व्हॉल्व्ह अन् व्हॉल्व्हमन चार, महापालिकेत कर्मचार्‍यांची वानवा

September 16, 2022 0 Comments

https://ift.tt/pu8WC4h

सूर्यकांत वरकड : 

नगर : शहरात वीज, पाणी, रस्ते ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठी नागरिक सतत रस्त्यावर येतात. मात्र, ते प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहातात. मनपा पाणीपुरवठा विभागात सुमारे 242 पदे रिक्त आहेत. शहरात पाणी योजनेचे सुमारे एक हजार व्हॉल आहेत. तर, पाणी सोडण्यासाठी अवघे चार व्हॉलमन आहेत. मग शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होणार असा सवाल नागरिकामधून उपस्थित केला जात आहे. पाणी, रस्ता, वीज ह्या शहरातील नागरिकांच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. नगर पालिकेची महापालिका झाली तरी प्रत्येक विभागात कर्मचार्‍यांची वानवा आहे. त्यामुळे पाणी, रस्त्यांच्या सारख्या सुविधा पुरविण्यात मनपा अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. शहरासह उपनगरामध्ये रस्त्यावर जसे खड्डे आहेत. तशीच काहीशी परिस्थिती पाणी योजनेची आहे.

पाणी पुरेसे असूनही नागरिकांना मिळत नाही. पाणी योजना येऊन जुनी झाली तरी अद्यापही काही भागात पाणी पोहोचत नाही. त्यात काही तांत्रिक बाबींची अडचण आहे. मात्र, ती अडचण शोधून काढण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणा नाही ही वस्तुस्थिती आहे. पाणीपुरवठा विभागामध्ये अनेक महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. उपअभियंत्यांची मंजूर पाच पदे रिक्त आहेत. तर, व्हॉलमनची 50 पदे मंजूर आहेत. सध्या अवघे पाच व्हॉलमन कार्यरत आहेत. एक फिटर संपूर्ण मनपा हद्दीत दुरूस्तीचे काम करीत आहे.
दरम्यान, अवघ्या दोन वॉलमन शहरातील पाणी वितरणची जबाबदारी आहेत. त्यात पाणी गळती, पाणी चोरी, मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपयव अशा गोष्टी शोधून करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे बाह्य यंत्रणेचा तांत्रिक आधार घेत पाणीविरतणावर अंकुश ठेवता येईल असा कयास मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांनी बांधला आहे. त्यामुळे महापालिकाने पाणीयोजनेसाठी तांत्रिक सह्या घेण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कुशल कर्मचार्‍यांची कमतरता
1999 मध्ये नगरपरिषदेकडे योजना हस्तांतरणावेळी 110 कर्मचारी होते. सध्या अवघे 52 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात काही कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहेत. मनपाचे अवघे 11 कर्मचारी कार्यरत आहेत. 13 कर्मचारी महाराषट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मनपाकडे वर्ग झालेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मनपाकडे वर्ग झालेले कर्मचारी कुशल होते. मात्र, त्यातील बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत.

पदभरतीच्या नावाने बोंबाबोब
महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून पदभरती झालेली नाही. सध्या एक महिन्याचा आस्थापनेचा खर्च सहा ते सात कोटी रुपये आहे. शासनाने मनपाला आस्थापना खर्चाची मर्यादा उपन्नच्या 35 टक्के पर्यंत दिलेली आहे. सध्या खर्च पाहता तो मनपाला पदभरती करणे शक्य नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर कर्मचारी घेऊन काम चालविले जात आहे. वर्षानुवर्षे आर्थिक दबडक्यात सापडलेल्या महापालिकेची वसुली तितकीशी होत नाही. पाणीपुरवठा विभागातही पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट पाणीवितरण होत असल्याचे दिसून येते.

कार्यकर्ते घेऊन फिरतात स्पॅनर
शहरातील एक हजार व्हॉल सोडण्यासाठी मनपाचे अवघे चार कर्मचारी आहेत. त्यामुळे उपनगरामध्ये नेत्यांचे कार्यकर्ते पाणी सोडण्यासाठी वापरला जाणारा स्पॅनर घेऊन फिरतात. त्यांना वाटेल तेव्हा पाणी सोडतात. त्यामुळे काही भागात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होते, असे चित्र आहे.

पाणीपुरवठा विभागातील पदे
पदनाम मंजूर रिक्त
उपअभियंता 5 5
शाखाअभियंता सिव्हिल 5 2
कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 3 3
अभियांत्रिकी सहायक 3 3
विद्युत पर्यवेक्षक 3 3
वीजतंत्री 4 4
तारतंत्री 1 1
गाळणी निरीक्षक 2 2
गाळणी परिचर 9 6
लॅब असिस्टंट 2 2
हेड फिटर 1 1
फिटर 11 10
मीटर रिडर 5 5
व्हॉलमन 50 46
वाहनचालक 1 00
पंप चालक 15 13
मजूर 95 50
वॉचमन 56 56

The post नगर : एक हजार व्हॉल्व्ह अन् व्हॉल्व्हमन चार, महापालिकेत कर्मचार्‍यांची वानवा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/nvYbHD3
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: