शेवगावात पावसामुळे भाजीपाला कडाडला !

September 16, 2022 0 Comments

https://ift.tt/et4gA6u
Vegetable price

शेवगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसामुळे भाजीपाला सडत असून, घाऊक बाजारात दर दिवशी येणार्‍या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले असून, ते दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे; मात्र सफरचंदाचे दर कमी झाले. शंभर रुपायाला सव्वा किलो ते दीड किलो सफरचंद मिळत आहेत, जे एक महिन्यापूर्वी दोनशे रुपये किलो होते. तसेच, शेतकर्‍यांनी शेतामध्ये पिकवलेली मोसंबी 30 ते 40 रुपये किलो मिळत आहे. एकंदरीत फळांचे दर कमी झाले; परंतु भाज्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाला मात्र तेजीत आहे. स्थानिक शेतकर्‍यांकडून भाजीपाला येत नसल्याने दुसर्‍या जिल्ह्यातून व इतर तालुक्यातून भाजीपाला मागवा लागत असल्याचे भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

शेवगाव बाजारपेठेेत ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. तालुक्यात ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात. येथील भाजीपाला इतर जिल्ह्यातही विक्रीसाठी जातो; मात्र पावसामुळे भाजी उत्पादक शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट झाली आहे.  ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. हा परिसर अधिकांश भाजी उत्पादकांचा आहे. मात्र, काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे भाजीपाला सडून जात असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येते. ग्राहकांना खर्चाचा अधिकचा भार सहन करावा लागत आहे. स्थानिक भागातून मालाची आवक कमी झाली असल्याने हा भाजीपाला हा दुसर्‍या जिल्ह्यातून मागविला जात आहे. यात औरंगाबाद, श्रीरामपूर, नाशिक, बीड, गेवराई, पैठण आदी ठिकाणावरून येथे भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.

भाजीपाला व फळभाज्या कमी येत असल्यान भाजी विक्रेत्यांची संख्या ही कमी झाली आहे. इतर ठिकाणावरून येणारा भाजीपाला प्रवास इतर खर्च लागून येत असल्याने महाग मिळतो. भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यात पालक, मेथी, शिमला, तेईवान, कोबी, ओला वाटाणा, दोडका, वांगी, शेवगा आदी भाजीपाला हा येथील बाजारात उपलब्ध असून, त्यातील बराचसा भाजीपाला हा दुसर्‍या जिल्ह्यातून येतो.

The post शेवगावात पावसामुळे भाजीपाला कडाडला ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/QaXkdrp
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: