संगमनेर : कांदा व्यापार्‍यास पन्नास लाखांचा गंडा !

September 08, 2022 0 Comments

https://ift.tt/LarbHxT

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर बाजार समितीमधील एका कांदा व्यापार्‍याची तब्बल पन्नास लाखांची फसवणूक झाल्याने व्यापार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. शहरातील मोगलपुरा या भागामध्ये राहणारा याह्या खान अय्युबखान पठाण हा संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यवसाय करतात. त्यांनी बेंगलोर (कर्नाटक) येथील शिवकुमार सनाफ या व्यापार्‍यास 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 या कालावधीत 29 लाख एक हजार 176 रुपयांचा कांदा पाठविला होता. मात्र, ठरलेल्या वायद्यानुसार त्याच्याकडून मालाचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी पैशांसाठी तगादा सुरू केला. सुरुवातीला त्याने देतो, करतो म्हणत वेळ मारुन नेल्यानंतर फोन घेणेही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले.

या दरम्यान बेंगलोर येथीलच अब्दुल आलम या अन्य व्यापार्‍याशी त्यांची ओळख झाली. त्यातून आधीच्या प्रकाराबाबतही चर्चा झाली. यावेळी अब्दुल आलम याने आपण तुमचे पैसे काढून देण्यास मदत करु, असे आश्वासन देत याह्याखान पठाण यांचा विश्वास संपादन केला व त्यातूनच त्यानेही पठाण यांच्याकडून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. पठाण यांनीही आधी फसवणूक झालेली असतानाही संबंधितावर अंधविश्वास ठेवत 3 जून ते 14 जून 2022 या कालावधीत एकूण 20 लाख 2 हजार 797 रुपयांचा कांदा त्याला पाठविला. मात्र त्यानेही पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

अवघ्या वर्षभराच्या कालावधीत आलेल्या या दोन संकटांनी याह्याखान पठाण यांची कर्नाटकच्या या दोघा व्यापार्‍यांनी तब्बल 49 लाख 3 हजार 973 रुपयांची फसवणूक केली. वारंवार फोन आणि तगादा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या पठाण यांनी संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांची भेट घेवून त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी शहर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पहिले पैसे काढण्याच्या नादात दुसरी फसवणूक
संगमनेर येथील कांदा व्यापारी पठाण यांची कर्नाटक राज्यातील दोन व्यापार्‍यांनी फसवणूक केली. पहिल्या ठगाने त्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांचा याच राज्यातील दुसर्‍या व्यापार्‍याशी संपर्क झाला. त्याने पहिल्या ठगाकडून पैसे काढण्याची हमी दिली. परंतु त्यानेही पठाण यांना गंडा घातला. दोन्ही ठगांकडून पठाण यांची फसवणूक झाल्याने ते हतबल झालेले आहेत.

The post संगमनेर : कांदा व्यापार्‍यास पन्नास लाखांचा गंडा ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/uLMc8Zg
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: