नगर : बाप्पांच्या मार्गावरील अतिक्रमण हटाव

September 08, 2022 0 Comments

https://ift.tt/6xaD5Bo
Ganpati Bappa

नगर :  पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर बुधवारी दुपारी अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रस्त्यावरील सुमारे अतिक्रमणे हटविण्यात आली. नगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने मनपा व वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वाघ यांनी संयुक्तपणे गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. माळीवाडा – अमन पाटील रोड – वसंत टॉकीज- धरती चौक – हातमपुरा – रामचंद्र खुंट- दाळ मंडई – एमजी रोड – भिंगारवाला चौक- बँक रोड – नवीपेठ -नेता सुभाष चौक-चितळे रोड-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट-नालेगाव या मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली.

हातगाड्या, पत्र्याचे शेड, बाकडे, जाहिरातीचे फलक हटवून जप्त केले. अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. उद्या उपनगरामध्ये पाहणी करून रस्त्यावरील अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी दिला. यावेळी वाहतूक शाखेचे पीएसआय पाटोळे, विभाग प्रमुख राकेश कोतकर, मेहेर लहारे, रिजवान शेख आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

The post नगर : बाप्पांच्या मार्गावरील अतिक्रमण हटाव appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/kSEruhR
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: