नगर :  गणेश विसर्जनासाठी 14 कृत्रिम तलाव, खड्डे बुजविण्याला पावसाचे विघ्न

September 08, 2022 0 Comments

https://ift.tt/0GUndqT

नगर :  पुढारी वृत्तसेवा : नगरकरांनी श्री गणेशाचे उत्साहात स्वागत केले. आता विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेकडून शहरात चौदा ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला पावसाचा अडथळा येत आहे.

शहरातील सुमारे पावणे दोनशे सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिकेकडून परवानगी घेऊन श्री गणेशाची स्थापना केली, तर शहरासह उपनगरामध्ये घरोघरी श्री गणेशाची भक्तिभावाने स्थापना केली आहे. शहरातील विविध गणेश मंडळांनी देखावे खुले केले आहेत. ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांनी भाविकांचे मनोरंजनाबरोबर प्रबोधन होत आहे. गणेश विसर्जन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश विजर्सन मिरवणूक मार्गासह मूर्ती विसर्जनासाठी कुंड तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

खड्डे बुजविण्याला पावसाचे विघ्न खड्डे बुजविण्याला, पावसाचे विघ्न

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड बनविण्याचे काम आजपासून सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत प्लास्टिक कागद आंथरुण आणि बॉरिकेटिंग करून कुंड तयार करण्यात येतील.
                                                            – सुरेश इथापे, शहर अभियंता.

The post नगर :  गणेश विसर्जनासाठी 14 कृत्रिम तलाव, खड्डे बुजविण्याला पावसाचे विघ्न appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/cZ8QyuK
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: