चुंभळी-झिक्री रस्त्याचे भाग्य उजळणार

September 18, 2022 0 Comments

https://ift.tt/zTAYHFM

नान्नज : पुढारी वृत्तसेवा : चुंभळी ते झिक्री रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खडी आणून टाकली असून, लवकरच पुढील कामास प्रारंभ होणार आहे. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनास खडबडून जाग आली असून, लवकरच खड्डे बुजविण्यात येणार आहेत. जामखेड तालुक्यातील चुंबळी ते झिक्री या 7 कि.मी. अंतराच्या रस्त्याची खड्डे पडून चाळण झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत ‘नान्नज-जामखेड रस्ता ठरतोय जीवघेणा’ ‘जागोजागी मोठ मोठे खड्डे.. त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने दि. 23 ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

या वृत्ताने सार्वजनिक बांधकाम विभागास जाग आली असून, खड्डे बुजविण्यासाठी रस्त्याच्या कडेला खडी आणून टाकली आहे. लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले आहेत. झिक्री ते चुंबळी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या गवताखाली जाऊन रस्ता दिसेनासा झाला आहे. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत असून यामध्ये काही दुचाकी स्वार जखमी देखील झाले आहेत. राजेवाडी फाट्या जवळील पुलावर मोठा खड्डा पडल्याने येथे मोठा अपघात होण्याचा धोका ‘पुढारी’ने वाचक व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.

The post चुंभळी-झिक्री रस्त्याचे भाग्य उजळणार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/6ImqbFr
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: