नगर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

September 08, 2022 0 Comments

https://ift.tt/MPemnaN

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : विवाहाचे आणि इस्त्रायलमधील कंपनीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 41 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याच्या आरोपावरून सायबर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लखीराम नंदलाल शिवणकर ऊर्फ लुक शिवणकर (पत्ता माहीत नाही) असे आरोपीचे नाव आहे. सावेडी उपनगरातील एका तरुणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 19 फेब्रुवारी, 2022 ते 8 ऑगस्ट, 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. विवाह स्थळासंदर्भातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये फिर्यादी यांनी बायोडाटा टाकला. बायोडाटावरील नंबरवर लखीरामने संपर्क केला.

फिर्यादी व लखीराम यांच्यात मैत्री झाली. लखीरामने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. लखीरामने फिर्यादीला इस्त्रायल देशात शेती करणार्‍या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला फिर्यादी बळी पडून त्यांनी वेळोवेळी एकूण 41 हजार 500 रुपये लखीरामच्या खात्यात पाठविले. त्यानंतर लखीरामशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नंबर बंद लागत होता. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले गुन्ह्याचा तपास करत आहेत.

The post नगर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fENVXlr
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: