दौंड रस्त्यावर दोन हॉटेलमधील रोख रकमेसह साहित्य लांबविले

August 14, 2022 0 Comments

https://ift.tt/qnpdNsf

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-दौंड रस्त्यावरील दोन हॉटेल एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी (दि.12) पहाटे घडली. एक हॉटेल हिवरेझरे तर दुसरे हॉटेल कोळगाव शिवारातील आहे. दोन्ही ठिकाणी रोख रक्कम,साहित्य चोरीला गेले.
हिवरेझरे शिवारात आप्पासाहेब गंगाराम काळे (रा.काळेवाडी) यांचे हॉटेल आहे. या हॉटेल मधील वेटर शुक्रवारी (दि.12) पहाटे झोपलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर उचकटून आतील दरवाजाचे लॉक तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला.

हॉटेलमधील एलईडी टीव्ही, एक मोबाईल तसेच काऊंटरच्या ड्रॉवरमधील सात हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरुन नेला. सकाळी वेटर झोपेतून उठल्यानंतर हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हॉटेल मालक आप्पासाहेब काळे यांनी हॉटेल मधील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चार अनोळखी चोरटे चोरी करताना दिसून आले. याबाबत काळे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसरी घटना कोळगाव फाटा येथील हॉटेलमध्ये घडली. कामगार त्यांच्या झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत हॉटेलच्या ड्राव्हरमधील 18 हजारांची रोकड व 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल असा 33 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी कामगार झोपेतून उठल्यानंतर हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी हॉटेल मालक प्रतिक अशोक लगड (रा.कोळगाव, ता.श्रीगोंदा) यांना घटनेची माहिती दिली. लगड यांनी हॉटेलमध्ये येऊन पाहणी करुन बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

The post दौंड रस्त्यावर दोन हॉटेलमधील रोख रकमेसह साहित्य लांबविले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/iKF9pf8
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: