राहुरी : मुळा धरणावर पूल बांधण्यासाठी प्रयत्न करू : आ. प्राजक्त तनपुरे

July 23, 2022 0 Comments

https://ift.tt/wU2JZ5C

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अतिदुर्गम व मुळा धरणाच्या बेटावर वसलेल्या वावरथ-जांभळी परिसरामध्ये पहिला विजेचा प्रकाश माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या काळात झळकला. माझ्या आमदारकीच्या काळात वीज रोहित्रांसह सबस्टेशनच्या माध्यमातून परिसरातील ग्रामस्थांचा वीजप्रश्न कायमचा संपुष्टात येत असल्याचे मोठे समाधान आहे.

तनपुरे कुटुंबीय व वावरथ-जांभळीकरांचे अतूट नाते जोपासत असताना परिसरातील ग्रामस्थांना प्रवाहात आणण्यासाठी धरणावरील पूल बांधणीसाठी आमदारकी पणाला लावू, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वावरथ येथे 1 कोटी 75 लक्ष रुपये विकास निधीच्या माध्यमातून घर, नळ योजना व 11 हजार वृक्षरोपणासह रस्ते, शाळा आादी विविध विकासकामांचा शुभारंभ आ. तनपुरे यांच्या हस्ते झाला.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे होते. याप्रसंगी आ. तनपुरे यांनी सांगितले की, राहुरी, पाथडी व नगर मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून विकास कामांबाबत कोणतीही कसर सोडली नाही. मागील 15 वर्षांत राहुरी मतदार संघाचा विकास खुंटलेला असल्याने अनेक कामे प्रलंबित होते. त्यांची सोडवणूक करताना मंत्रालयात मोठा पाठपुरावा करावा लागला. सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळताना राज्यातील प्रश्नांची सोडवणूक केली.

त्यामुळे माझ्या मतदार संघातील प्रश्न कसे सोडवायचे? हे मला ठाऊक आहे. त्यामुळे कोणी कितीही वावड्या उठविल्या तरी विकासकामांबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही. अतिदुर्गम असलेल्या वावरथ, जांभळी परिसरामध्ये वीज, पाणी व रस्त्यांच्या कामांना भरीव निधी दिला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहोत. वावरथ ग्रामपंचायतीने 11 अकरा वृक्षारोपणाचा घेतलेला निर्णय व वृक्ष जगविण्यासाठी केलेले नियोजन हे आदर्श ठरणार आहेत.

अडीच वर्ष राज्यमंत्री पदाचा काळात मुळा धरणाच्या पूल प्रश्नाची सोडवणूक करण्यात मोठे यश आले होते. परंतु, अचानक सत्ताबदल झाल्याने पूल मंजुरीला थोडासा विलंब लागणार आहे. 19 लक्ष रुपये खर्च करून पूल सर्वेेक्षण झालेले आहे.
जलसंपदा व बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूल बांधणी करू. राहुरी-बारागाव नांदूर-वावरथ- ढवळपुरी या गावांच्या रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा लाभला आहे.

त्यामुळे कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध होऊन रस्त्यांचे प्रश्न संपुष्टात येणार आहेत. राहुरी मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहू नये, यासाठी आमदारकी पणाला लावू. परंतु, विकासकामे थांबू देणार नाही, असे आश्वासन आ. तनपुरे यांनी दिले. याप्रसंगी वावरथचे सरपंच ज्ञानदेव बाचकर यांनी परिसरात आ. तनपुरे यांच्या माध्यमातून झालेले कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे वाचन केले. तनपुरे कुटुंबियांनी वावरथ-जांभळी ग्रामस्थांशी जपलेले नाते हे ग्रामस्थ कदापि विसरणार नाही, असे बाचकर यांनी सांगितले. माजी सभापती आण्णा सोडनर व नवाजभाई देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी वावरथचे उपसरपंच गंगाराम दुधवडे, जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, पाटीलनाना बाचकर, आबासाहेब काळनोर, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे, विजय बाचकर, धोंडिराम बाचकर, रावसाहेब केदार, भागवत पवार, अण्णासाहेब बाचकर, सखाराम बाचरक, सिद्धार्थ जाधव, दगडू बाचकर, चंद्रकांत कदम, दामू जाधव, बाळू मधे, गोपीनाथ दुधवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पूल बांधणी झाल्यास गावांचा कायापालट
मुळा धरणावरील पूल बांधणी झाल्यास पुणे व मुंबई येथे प्रवास करणार्‍यांना मोठा लाभ होणार आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ कमी होऊन 40 ते 50 किमीचा अंतर कमी होणार आहे. त्यामुळे पूल बांधणी होऊन जिल्हा मार्गावरील रस्ते बांधण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरूच राहणार आहे. लगतच्या गावांचा कायापालट होऊन विकासकामांना मोठे पाठबळ लाभणार असल्याने आपले प्रयत्न कमी पडणार नाहीत, असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

The post राहुरी : मुळा धरणावर पूल बांधण्यासाठी प्रयत्न करू : आ. प्राजक्त तनपुरे appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1e4J26Y
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: