कर्जत : गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलेस अटक

July 23, 2022 0 Comments

https://ift.tt/VZ6C0N4

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  सिद्धटेक येथे गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोने चोरणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका महिलेस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिद्धटेक येथे श्री गणपती मंदिरात चतुर्थीच्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरून घेऊन जात असताना, पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका महिलेस ताब्यात घेतले. तिचे नाव रेखा राहुल काळे (वय 35, रा. देवीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर) आहेे. महादेव कल्याण काळे (रा. वडगाव दरेकर, ता.दौंड, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तिच्याकडून चोरीस गेलेले 13 हजार रूपये किमतीचे सोन्याचे बदाम हस्तगत करण्यात आले आहेत. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, 4 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संभाजी वाबळे करीत आहेत.

The post कर्जत : गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलेस अटक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/IRQahwU
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: