नवीन सरकारमुळेच ओबीसींना आरक्षण : आ. राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2022 0 Comments

https://ift.tt/Np8Uiy0
Radhakrishna vikhepatil criticizes mahavikas aghadi ministers

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी जनतेच्या मनातील सरकारच स्थापन व्हावे लागले. शिंदे-फडणवीस सरकारने सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत केलेल्या पाठपुराव्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले. भाजपने यासाठी केलेला संघर्ष हा महत्त्वपूर्ण ठरला असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. या पार्श्वभूमिवर शिर्डी येथे भारतीय जनता पक्ष आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्षा ज्ञानेश्वर गोंदकर, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, नंदकुमार जेजूरकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोक पवार, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, उपाध्यक्ष सौरभ कोळपकर, वैभव शिंदे, शहराध्यक्ष विक्रांत वाकचौरे, खंडेराव कडलग, रघुनाथ कातोरे, वाल्मिक गाडेकर, विजय गाडेकर आदी कार्यकर्ते या जल्लोष कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ओबीसी मोर्चाच्या वतीने आ. विखे यांचा सत्कार करून, लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. विखे बोलत होते. ते म्हणाले, यांनी आरक्षणासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील भाजप आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने केलेल्या आंदोलनाची आवठण करून देत त्यांनी सांगितले की, सर्वांनी केलेल्या संघार्षामुळेच हा विजय साजरा करता आला, याचा आनंद वाटत आहे.

राज्यात युती सरकार असताना देवेंद्र फडणवीसांमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गमवावे लागले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आयोग स्थापन करून, त्रिपल टेस्ट करण्याची मागणी करीत होतो, परंतु महाविकास आघाडी सरकारने गांभीर्य दाखविले नाही. नंतर स्थापन झालेल्या आयोगाला निधीही दिला नाही. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू होते, अशी टीका आ. विखे यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार
ओबीसी समाजाला त्यांच्या न्याय हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर यावे लागले. शिंदे, फडणवीस यांनी सत्ता येताच आयोगाकडे आणि न्यायालयात योग्य तो पाठपुरावा करून, हे आरक्षण पुन्हा मिळवून दिल्याबद्दल त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले. या आरक्षणासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात केलेल्या संघर्षाला हे यश मिळाले असल्याचे आ. राधाकृष्ण विखे पा. म्हणाले.

The post नवीन सरकारमुळेच ओबीसींना आरक्षण : आ. राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1BjrVCW
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: