अहिल्यादेवींच्या फलकाची विटंबना; करगणीत तणाव, कडकडीत बंद

June 04, 2022 0 Comments

सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे गुरुवारी रात्री अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली असून यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. यामुळे गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ करगणीमध्ये शुक्रवारी बंद पाळण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की करगणी गावात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर चौकात फलक लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री एका अज्ञाताने हा फलक फाडला. सकाळी करगणीतील ग्रामस्थाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर मोठय़ा संख्येने युवक अहिल्यादेवी होळकर चौकात जमा झाले. संतप्त युवकांनी करगणी बाजारपेठ बंद केली आणि फलक फाडल्याचा निषेध नोंदवला. बंदमुळे अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व बाजारपेठ पूर्णत: बंद होती.

करगणी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यामधील पोलीस आणि चौकात जमा झालेल्या युवकांची खडाजंगी झाली. पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप करत युवकांनी पोलिसांचा निषेध केला.दरम्यान पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त युवकांची समजूत काढली. अहिल्यादेवी होळकर यांचे फलक फाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची ग्वाही दिल्याने जमाव शांत झाला.करगणी गावात गुरुवारी घडलेल्या या घटनेचे पडसाद उमटले. गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

https://ift.tt/uLUz4W8

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: