पुणे आजपासून 'सुपरफास्ट'; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार 'पुणे मेट्रो'चे उद्घाटन

March 06, 2022 0 Comments

पराग करंदीकर पुणे : अखेर पुण्यात आजपासून मेट्रो धावणार... या निमित्ताने पुण्याच्या इतिहासामध्ये एक भर पडणार. खरे तर आज पुणे बदलणार. पुणे बदलणार असे म्हटल्यावर अनेक भुवया कदाचित उंचवतील; पण बदल हा पुण्याचा स्थायीभाव आहे. इतिहासात अनेक प्रसंगांनी पुणे बदलले, पुण्याची संस्कृती बदलली. या बदलांना पुण्याने बघता बघता आपलेसे केले आणि पुणेकरांची थट्टा करणारे बघतच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज मेट्रोचे उद्घाटन होत आहे. पुण्याच्या इतिहासामध्ये अनेक असे प्रसंग आहेत. शिवछत्रपतींनी सोन्याच्या नांगराने पुनवडी नांगरली तेव्हा पुणे बदलले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली तेव्हाही पुणे कात टाकत होते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,' असे लोकमान्य टिळकांनी सांगितले, तेव्हा पुणेच नव्हे तर देश थरारून गेला होता. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे करारानेही इतिहासामध्ये असेच सोन्याचे पान लिहिले गेले होते. त्याचबरोबर डेक्कन जिमखान्यासारखी पहिली टाउनशिप उभी राहिली तेव्हा आणि देशातील पहिली मॅरेथॉन शर्यत पुण्यात पार पडली तेव्हाही हे शहर बदलले होते. पानशेतच्या पुराने पुण्याचा भूगोल बदलला. त्यापूर्वी लष्कराच्या दक्षिण विभागाच्या स्थापनेपासून ते खडकीच्या दारूगोळा कारखान्यापर्यंत आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेपासून ते लष्कराच्या क्रीडा प्रबोधिनीच्या स्थापनेनेही पुण्याच्या बदलाला हातभार लावला. 'प्रभात फिल्म कंपनी'च्या स्थापनेने सांस्कृतिक पुणे बदलले, तर धोत्र्यांच्या सर्कसने आणि रघुवीरांच्या जादूनेही पुण्याला वेडे केले. पुढे पुण्याशेजारच्या पिंपरी चिंचवडमधील कारखानदारीने पुण्याची जीवनशैली व रोजगारांच्या संधीमध्ये बदल घडवून आणला. विद्येच्या माहेरघरात ऐंशीच्या दशकात पुन्हा एकदा नव्याने स्थापना झालेल्या खासगी शिक्षण संस्थांनीही पुणे बदलले. नव्वदच्या दशकात क्रीडानगरी आणि हिंजवडीमध्ये उभ्या राहिलेल्या आयटी नगरीने, तर पुण्याच्या रोजच्या जगण्यामध्ये आमूलाग्र बदल घडविले. यामध्ये जाणते पुणेकर अजूनही अनेक गोष्टींची भर घालू शकतील. खाद्य संस्कृतीपासून ते नाट्यसंस्कृतीपर्यंत, एके काळी सायकलवरून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून आता स्कार्फ बांधून दुचाकीवर भरधाव स्वार होणाऱ्या युवतींपर्यंत अनेक बदल बघता बघता झाले. वेळेचे गणित चुकलेल्या 'पीएमटी'पासून 'बीआरटी'पर्यंतचा प्रवासही यातीलच एक बदल म्हणून नोंदविला पाहिजे. त्याचाच परिणाम म्हणून खास पुणेरीपणे दाखविणाऱ्या रिक्षाचालकांपासून ते रस्ते हे फक्त आपल्यासाठीच आहेत, असे समजणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दादागिरीपर्यंत अनेक बदल पुण्याची संस्कृती घडवित गेले. या बदलांत भर पडते आहे, ती मेट्रोची. अंशत: का होईना, अनेकांनी नन्नाचा पाढा लावलेला असतानाही येथपर्यंत आलेल्या पुण्याच्या महामेट्रोचा प्रवास आज अधिकृतपणे सुरू होत आहे. मेट्रोने सगळे प्रश्न सुटणार नाहीत हे मान्य; पण सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढचे पाऊल पडते आहे हे नक्की. पुणेकरांनी एखादी गोष्ट स्वीकारली की, ते मनापासून स्वीकारतात हा इतिहास आहे. हेच भाग्य आज सुरू होणाऱ्या 'मेट्रो'च्या नशिबी असावे. आज सुरू होणाऱ्या व भविष्यात वेगाने पूर्ण होणाऱ्या मेट्रोमुळे पुणेकरांच्या रोजच्या धावपळीमध्ये थोडीफार सुखाची झुळूक यावी एवढीच अपेक्षा आपल्याला करता येईल. 'मित्रों...पुणे मेट्रो...' गेल्या अकरा वर्षांत पुण्याबद्दलची प्रत्येक लहानमोठी घडामोड 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीने टिपली आहे. या पुढेही टिपत राहूच; कारण पुण्याच्या बदलत्या संस्कृतीचे आम्ही साक्षीदार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून 'मित्रों...पुणे मेट्रो' हे ऐकण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोतच.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: