Omicron in maharashtra update: राज्याला मोठा दिलासा! आज ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, एकूण ३२ बाधित

December 17, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत ओमिक्रॉनचा (Omicron) एकाही नव्या रुग्णाचे निदान झाले नसल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या बरोबरच राज्याच एकूण ३२ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली असून त्यांपैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या ३२ रुग्णांपैकी मुंबईत १३, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका क्षेत्रात २, कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात १, नागपूर, लातूर, वसई विरार आणि बुलडाण्यात प्रत्येकी १ रुग्ण तर उस्मानाबादमधील २ रुग्णांचा समावेश आहे. ( update no new patient has been diagnosed in the state today) राज्यात काल एकूण ४ नव्या रुग्णांचे निदान झाल्यानंतर चिंतेचे वातावरण होते. मात्र आज एकही रुग्णाचे निदान न झाल्याने आज दिलासादायक चित्र आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आज ८७७ नव्या करोना रुग्णांचे निदान दरम्यान, राज्यात आज गुरुवारी करोनाच्या एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ६३२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ८७७ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ९५ हजार २४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ७३ लाख ०६ हजार ८६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ४६ हजार ९३८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.८८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७७ हजार ३७१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: