केंद्र सरकारने इम्पीरीकल डेटा न दिल्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले; खडसेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

December 16, 2021 , 0 Comments

इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून सत्ताधारी पक्षाचा आटापिटा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास बुधवारी नकार दिला. ओबीसी आरक्षणावरून आता पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरु झाली आहे.

यावर अनेक ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे.

वारंवार पाठपुरावा करून देखील केंद्राने राज्याला इम्पेरिकल डेटा दिला नाही. केंद्रामुळे ओबीसींवर ही वेळ आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या हक्काचे आरक्षण आहे. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी मध्यस्थिने मार्ग काढावा असे देखील खडसे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र केंद्राने जर राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा दिला असता, तर त्यात राज्य सरकारने दुरुस्त्या केल्या असत्या. नव्या दुरुस्त्यांच्या आधारे आरक्षणाबाबत निर्णय घेता आला असता. असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

आगामी 21 डिसेंबरच्या 105 नगरपंचायतीच्या निवडणुका, आता 27 % ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला झटका बसला आहे. त्यामुळे 21 डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.

राज्य सरकारला न्यायालयाने धक्का दिल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणुका वेळेत होणार की पुढे ढकलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ताज्या बातम्या
….तर त्यांची नावं जाहीर करा; मनसेचं नाराज रूपाली पाटील ठोंबरेंना जाहीर आव्हान
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव, म्हणाली, मला स्तन आणि कंबर…
रुपाली ठोंबरे यांनी मनसेला का ठोकला रामराम? खरे कारण आले समोर
धुमधडाक्यात पार पडला जेठालालच्या मुलीचा विवाहसोहळा; पहा सोहळ्याचे सुंदर फोटो..   


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: