corona latest update: चिंताजनक! राज्यात आज करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ; मृत्यूही वाढले

December 17, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात आज सोमवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असली तरी आजच्या मृत्यूसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही वाढल्याने काहीशी चिंताजनक स्थिती आहे. आज राज्यात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ६३२ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ८७७ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ६ हजार ६९३ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (maharashtra registered 877 new cases in a day with 632 patients recovered and 19 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ९५ हजार २४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ७३ लाख ०६ हजार ८६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ४६ हजार ९३८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.९९ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७७ हजार ३७१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ३१७ इतकी आहे. मुंबईत आज २७२ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी २७२ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६६ हजार १६६ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३६२ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण १०९ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज मंगळवारी १०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १०, ठाणे महापालिका क्षेत्रात ४४, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३४, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ८, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ० मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात १३ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज ५ रुग्ण आढळले असून, वसईविरार मनपा क्षेत्रात १०, रायगडमध्ये १४ आणि पनवेल मनपा क्षेत्रात १० नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: