जेव्हा कुंबळेने १० बळी घेऊन पाकिस्तानची जिरवली; आफ्रिदी, अन्वरसारख्यांना अक्षरश नाचवले होते
७ फेब्रुवारी १९९९ चा दिवस कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही. त्या दिवशी भारताचा महान स्पिनर गोलंदाज अनिल कुंबळेने कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याचा विक्रम केला होता. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर जंबोने पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला. कुंबळेचा हा विक्रम चाहते आजही विसरलेले नाहीत.
गेल्या २२ वर्षात कोणताही गोलंदाज हा विक्रम करू शकला नाही. मात्र, आज न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबईत भारताविरुद्ध १० विकेट घेत विक्रमाची बरोबरी केली. कुंबळे आणि इजाझच्या आधी, इंग्लंडचा ऑफस्पिनर जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावातील सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. चला जाणून घेऊया कुंबळेने 10 विकेट कशा घेतल्या…
पाकिस्तानविरुद्धच्या फिरोजशाह कोटला कसोटीत भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या आणि पाकिस्तानला 172 धावांत गुंडाळले. यानंतर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने शानदार फलंदाजी केली. तसेच सलामीवीर सदागोपन रमेशच्या (96) फलंदाजीच्या जोरावर भारताने ४१९ धावा केल्या आणि समोरच्या संघासमोर विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य ठेवले.
पाकिस्तानचा संघ हा सामना अनिर्णित राहण्यासाठी खेळत होता, पण कुंबळेने कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या आशा धुळीस मिळवल्या आणि भारतीय संघाला २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. जेव्हा कुंबळेने 9 विकेट घेतल्या होत्या, तेव्हा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करणाऱ्या जवागल श्रीनाथला चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर फेकण्यास सांगितले, जेणेकरून त्याला विकेट मिळणार नाही आणि कुंबळेला विकेट मिळू शकेल.
कुंबळेने सामन्याच्या पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या आणि एकूण 14 विकेट्स घेऊन तो मैन ऑफ द मैच ठरला. बंगळुरूमध्ये जन्मलेल्या कुंबळेच्या नावावर 132 कसोटीत एकूण 619 विकेट आहेत.
मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708) आणि जेम्स अँडरसन (632) यांच्यानंतर कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 271 सामन्यात एकूण 337 बळी घेतले. कुंबळेच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 1136 विकेट आहेत.
कुंबळेने अशा 10 विकेट घेतल्या-
101/1: शाहिद आफ्रिदी (41) नयन मोंगियाने झेलबाद
101/2: इजाज अहमद (0) याला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले
115/3: इंझमाम-उल-हक (6) बोल्ड झाला.
115/4: मोहम्मद. युसूफ (0) लेग बिफोर केला
127/5: मोईन खान (3) गांगुलीकरवी झेलबाद झाला
128/६: सईद अन्वर (६९) व्हीव्हीएस लक्ष्मणने झेलबाद केले.
186/7: सलीम मलिक (15) बोल्ड झाला.
198/8: मुश्ताक अहमद (1) राहुल द्रविडकडे झेलबाद.
198/९: सकलेन मुश्ताकला एलबीडब्ल्यू (०)
207/10: वसीम अक्रम (37) लक्ष्मणकरवी झेलबाद
महत्वाच्या बातम्या-
पुण्याचे पाणी कोणी कमी करू नये, कोण करेल त्याला पुणेकर पाणी पाजतील
सांगा कशी करायची शेती? शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा; मिळाले फक्त १३ रूपये
रेल्वेसमोर उडी मारून मुलाची आत्महत्या; वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांना दुसऱ्या रेल्वेने उडवलं
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: