१६ करोडमध्ये रिटेन होऊनही दु:खात आहे रोहित शर्मा, म्हणाला, ‘या’ गोष्टीने माझे ह्रदय पुर्णपणे तुटले

December 05, 2021 , 0 Comments

इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलसाठी आपल्या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. पण स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबईत असे अनेक खेळाडू मागे राहिले आहेत. जे बराच काळ संघाचा भाग होते.

मुंबईला यश मिळवून देण्यामागे संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंचेही तितकेच योगदान आहे. यामध्ये पंड्या ब्रदर्स आणि युवा खेळाडू इशान किशन यांचे नाव आघाडीवर आहे. नुकतेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने याबाबत काय म्हटले आहे…

आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला सर्वात यशस्वी संघ बनवण्याचे श्रेय कोचिंग स्टाफ, खेळाडू आणि कर्णधार रोहितला जाते. रोहित शर्माने IPL 2022 मध्ये खेळाडूंना संघात कायम ठेवता न आल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

तो म्हणाला की, “मुंबई संघासाठी आयपीएलच्या या मेगा लिलावात खेळाडूंना संघात कायम ठेवणे खूप कठीण झाले आहे. आमच्याकडे अनेक महान खेळाडू होते, त्यांना टिकवून ठेवू न शकणे हे हृदयद्रावक आहे. उर्वरित खेळाडूंनी मुंबई इंडियन्ससोबत अनेक आठवणी निर्माण केल्या आहेत आणि संघाला शीर्षस्थानी नेण्यात आपली भूमिका बजावली आहे. त्या खेळाडूंना संघात कायम ठेवता न आल्याने त्यांना आयपीएलसाठी सोडण्याचा निर्णय खूप कठीण होता.”

मुंबई संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात मुंबई मजबूत संघ म्हणून ओळखले जाते. यामागे मुंबईच्या सपोर्ट स्टाफची मेहनत आहे. मात्र मेगा लिलावामुळे मुंबई संघाला सर्व खेळाडूंना लिलावात उतरवावे लागले आहेत.

ज्यावर कॅप्टन रोहित म्हणाला की, “तो फक्त चार खेळाडूंना कायम ठेवू शकला आहे. त्यापैकी एक स्वतः आहे. आशा आहे की, आयपीएलमध्ये तो पुन्हा एकदा लिलावात चांगला संघ उभा करू शकेल. पुन्हा एकदा मजबूत संघ बनण्याचे आमचे ध्येय आहे.

लिलावात योग्य स्थानांसाठी योग्य खेळाडूंची निवड करावी लागते. यासाठी आमच्या फ्रँचायझीचे टॅलेंट स्काऊट सर्व देशी-विदेशी खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. मला आशा आहे की टॅलेंट स्काउट त्यांचे काम चांगले करतील. ते चांगले खेळाडू आणेल जेणेकरुन आम्ही एक उत्कृष्ट संघ बनवू शकू.

मुंबईने या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे-
रोहित शर्मा – १६ कोटी
जसप्रीत बुमराह – १२ कोटी
सूर्यकुमार यादव – ८ कोटी
किरॉन पोलार्ड – ६ कोटी

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने ४२ कोटींच्या किमतीसह चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. आता फ्रेंचायझीकडे उर्वरित संघासाठी एकूण 48 कोटी रुपये शिल्लक आहेत. ज्यामध्ये मुंबईला आपला उर्वरित संघ तयार करायचा आहे.

महत्वाच्या बातम्या-
पुण्याचे पाणी कोणी कमी करू नये, कोण करेल त्याला पुणेकर पाणी पाजतील
सांगा कशी करायची शेती? शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा; मिळाले फक्त १३ रूपये
रेल्वेसमोर उडी मारून मुलाची आत्महत्या; वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांना दुसऱ्या रेल्वेने उडवलं


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: