अर्धनग्न महिलेची चौकशी करणे पोलिसांना पडले महागात, पोलिसांना महिलेला द्यावी लागली २२ कोटींची नुकसानभरपाई

December 15, 2021 , 0 Comments

अनेकदा पोलिस बेधडकपणे कारवाई करताना दिसून येतात. काहीवेळा तर एका व्यक्तीवर झालेला आरोप सिद्ध झाला नसला तरी त्याच्यावर ते कारवाई करताना दिसतात. त्यामुळे असे करणे त्यांना महागात पडू शकते. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे.

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय महिलेशी पोलिसांनी गैरवर्तन केले. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांविरुद्ध न्यायालयात फ. आता या प्रकरणात न्यायालयाने महिलेला २.९ मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे.

संबंधित घटना ही अमेरिकेच्या शिकागोमध्ये घडली आहे. जिथे २०१९ मध्ये एका गुन्हेगाराच्या शोधात काही पोलीस अधिकारी कृष्णवर्णीय अंजेनेट यंगच्या घरात जबरदस्तीने घुसले. अंजनेत या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

त्यावेळी अंजेनेट कपडे बदलत होत्या. पोलिसांनी त्यांना अशाप्रकारे कपड्यांशिवाय उभे केले आणि त्यांच्या हाताला हातकड्या घातल्या. हातकड्या घालून सुमारे अर्धा तास चौकशी केली. पोलिसांना शोधत असलेला गुन्हेगार अंजेनेटच्या घरात नसून शेजारच्या घरात राहत असल्याची माहिती मिळाला या गोष्टीमुळे अंजेनेट खुप संतापली.

या घटनेमुळे अंजेनेट यंगला खूप अपमानित वाटले. अंजनेट यंगने फेब्रुवारी २०२१ मध्ये या संदर्भात फिर्याद दाखल केली, पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचा अपमान केल्याचा आरोप केला. या खटल्यात तिने १२ पोलिसांवर आरोप केले होते.

आता या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पोलिसांना माहिती देणाऱ्याच्या माहितीची पडताळणी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे महिलेला नाहक अपमान आणि छळ सहन करावा लागला. पोलिसांच्या गैरवर्तनासाठी महिलेल २२ कोटींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शुभमंगल सावधान…! अखेर अंकिता लोखंडे-विकी जैन अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो
धक्कादायक! क्राईम पेट्रोल मालिका पाहून पाचवीच्या मुलीने केली आत्महत्या
एक्स-बॉयफ्रेंडला मिळवण्यासाठी केला होता जादूटोणा; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: