ब्रँड इस ब्रँड ! टाटा कंपनी रोजगार निर्मितीमध्ये अव्वल, अंबानींना दिला दे धक्का

December 15, 2021 , 0 Comments

अंबानी कमाईच्या बाबतीत अव्वल तर टाटा रोजगारनिर्मितीमध्ये सर्वात पुढे

ब्रँड इस ब्रँड ! टाटा कंपनी रोजगार निर्मितीमध्ये अव्वल, अंबानींना दिला दे धक्का

पैशांच्या कमाईबाबत मुकेश अंबानींचा हात सध्या कोणी धरू शकत नाही. सर्व व्यवसायांत त्यांनी आपली झेप घेतली आहे. एक यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख सध्या आहे. त्यांना टक्कर देईल असे दुसरे तरी नाव सध्या भारतात नाही.

टाटा समूह देखील अंबानींच्या यादीत असता मात्र चॅरिटी करण्यामध्ये या समूहाचे मोठे योगदान आहे. कमाईच्या बाबतीत हा समूह कमी असला तरी रोजगार निर्मितीच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. कोरोनाकाळातही टाटा समूह रोजगार निर्मिती करताना दिसून येत आहे.

रिलायन्स आणि टाटा या दोन्ही कंपन्यांची परिस्थिती कोरोना काळातही उत्तम होती. म्हणुनच आता या कंपन्या मजबुतीने पाय रोवून उभ्या आहेत. या कंपन्यांमध्ये रोजगार निर्मितीची संधी देखील मोठ्या प्रमाणवर आहे. शेअर बाजारातही या कंपन्या चांगल्याच तेजीत आहेत.

TATA ग्रुपमधील एका कंपनीने मार्केटकॅपमध्ये आघाडी घेतली. हीच कंपनी नोकरी देणाऱ्यांसंदर्भात अग्रेसर असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले आहे. रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

एका अहवालानुसार, TCS चे मार्केट कॅप ७१,७६१.५९ कोटी रुपयांनी वाढले आहे. टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan कंपनीचा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे.

ताज्या बातम्या
मनसेच्या डँशिंग नेत्या रूपालीताई ठोंबरेंनी दिला राजीनामा, लवकरच राष्ट्रावादीच प्रवेश करणार?
अमेरिकेला उघड उघड धमकी देणाऱ्या तालिबानची उडाली घाबरगूंडी; मागताहेत ‘या’ गोष्टीची भीक
शुभमंगल सावधान…! अखेर अंकिता लोखंडे-विकी जैन अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो
धक्कादायक! क्राईम पेट्रोल मालिका पाहून पाचवीच्या मुलीने केली आत्महत्या   

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: