मनसेच्या डँशिंग नेत्या रूपालीताई ठोंबरेंनी दिला राजीनामा, लवकरच राष्ट्रावादीच प्रवेश करणार?
मनसेच्या नेत्या रूपालीताई ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहून राजीनामा दिला आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की त्या लवकरच राष्ट्रवादीच प्रवेश करू शकतात.
अनेक लोकांना असा प्रश्न पडला आहे की राज ठाकरेंना भेटण्याआधीच त्यांनी राजीनामा का दिला? कारण उद्या राज ठाकरे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात येणार होते. त्यांचा तीन दिवस पुण्यात दौरा आहे. पण राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रूपाली ठोंबरे राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या.
त्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. रूपाली ठोंबरेंनी एक पत्र लिहून राजीनामा दिला आहे. एकीकडे पुणे महापालिकेसाठी मनसे तयारी करत असताना रूपाली ठोंबरेंनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वीच रूपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराजी व्यक्त केली होती.
पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असे बोलले जात आहे. दुसरीकडे रूपाली पाटील या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अनेकवेळा संपर्कात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात अनेकवेळा रूपाली पाटील अजित पवारांच्या बैठकीला हजर असायच्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
रुपाली पाटील यांनी पत्रात लिहीले आहे की, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ हे नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. यापुढेही आपले आशीर्वाद आणि श्री. राज ठाकरे हे नाव ह्रद्यात कोरलेले कायम राहिल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
रूपाली पाटील यांची ओळख पुण्यातील मनसेच्या डॅंशिंग नेत्या आणि निर्भीड नेत्या अशी होती. महिलांच्या कोणत्याही समस्येच्या त्या नेहमी पाठीशी उभ्या राहिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्या आवाज उठवायला नेहमी पुढे असायच्या. मनसेला रामराम ठोकून त्या लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: