विराटशी तुलना होणाऱ्या बाबरच्या मानधनाच्या दुप्पट पैसे घेतो ऋतुराज; आकडा ऐकून बसेल धक्का

December 13, 2021 , 0 Comments

भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराजसाठी हे वर्षे खुपच भारी ठरलंय असं म्हटलं तर काही चुकीचं राहणार नाही. कारण आयपीएल, सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धा आणि आता विजय हजारे ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये ऋतुराजने धडाकेबाज खेळी खेळली आहे.

इतकेच नाहीतर ऋतुराजने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचाही विश्वास जिंकला आहे. ज्यामुळे त्याला चेन्नईने आयपीएल २०२२ मध्ये रिटेन केले आहे. भविष्यातील दमदार खेळाडू म्हणून ऋतुराजकडे बघितले जात आहे. याच ऋतुराजने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमलाही एका गोष्टीत मागे सोडलं आहे.

बाबर आजमची तुलना अनेकदा विराट कोहलीशी केली जाते. पण एक रेकॉर्ड असा आहे जिथे विराट तर सोडाच आपला ऋतुराजच बाबर आजमवर भारी आहे. मैदानावरील कामगिरी बघून फ्रँचायझी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यामुळे ऋतुराज आता बाबर आजमच्या दुप्पटीने कमवताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ साठी रविंद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली व ऋतुराज यांना कायम राखले आहे. जडेजासाठी फ्रँचायझीने सर्वाधिक म्हणजे १६ कोटी मोजले आहे. त्यानंतर धोनी १२, अली ८ कोटी आणि ऋतुराजसाठी ६ कोटी असे पैसे मोजले आहे.

फ्रँचायझी क्रिकेटमध्ये कमाईच्या बाबतीत ऋतुराज गायकवाडने बाबर आजमलाही मागे टाकले आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या बाबरला ३ कोटी इतके मानधन मिळते. तर ऋतुराजला त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजेच ६ कोटी रुपये मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“ठाकरे सरकारची मनं फक्त मराठ्यांसाठीच धडधडतात का?”
भारताला हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला, पठ्ठ्याने संघ अडचणीत १८ चेंडूतच कुटल्या ९२ धावा
शरद पवार यांचे ह्रदय फक्त मराठ्यांसाठीच धडधडतंय, ओवैसींचा पवार यांच्यावर थेट निशाणा…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: