‘या’ माशाच्या एका बाजूला लिहलंय अल्लाह आणि दुसऱ्या बाजूला मोहम्मद; लाखोंची लागतेय बोली

December 13, 2021 , 0 Comments

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक मासा चर्चेचा विषय बनला आहे. या माशाला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. इतकेच नाही, तर या माशासाठी लोक लाखो रुपये मोजायला तयार आहे, पण त्याचा मालक हा मासा कोणाला विकायला तयार नाही.

याचे हे आहे की या मासाचा संबंध धर्माशी जोडला गेला आहे. हा मासा ऑस्कर प्रजातीचा असून त्यावर अल्लाह आणि मोहम्मद असे लिहिलेले आहे. एका हिंदू व्यापाऱ्याच्या मत्स्यालयात हा मासे वाढत आहे. तसेच संपुर्ण परिसरात याच माशाची चर्चा सुरु आहे.

ड्राय क्लीनचा व्यवसाय करणाऱ्या अंकुरने सांगितले की, मासे जसजसे मोठे होत गेले, तसतसे त्यावर खुणाही पडत गेल्या. त्याला उर्दू कसे वाचायचे ते माहित नाही. पण त्याच्या कारागिराने मासा पाहिला आणि त्याने सांगितले की एका बाजूला अल्लाह लिहिले आहे आणि दुसऱ्या बाजूला मोहम्मद लिहिले आहे.

अंकुरने सांगितले की, त्या कारागिराच्या शब्दावर विश्वास बसला नाही, मग त्याने दोन-तीन उर्दू तज्ञांना बोलावले, त्यावेळी त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी हैराण झाला होता. कारण माशाच्या एका बाजूला अल्लाह तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद लिहिलेले असल्याचे असे त्या सर्वांनी सांगितले.

मग त्यावर विश्वास ठेवला आणि तेव्हापासून हा मासा चर्चेचा विषय बनला. अंकुर सिंघल हे गेल्या १० वर्षांपासून मासे पाळत असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी या ऑस्कर प्रजातीचे मासे विकत घेतले होते. हा मासा विकत घेण्यासाठी अनेक मुस्लिमांनी तीन लाख रुपयांपर्यंत बोली लावली आहे.

पण अंकुर मासा विकायला तयार नाहीये. माशावर अल्लाह व मोहम्मद अशी नावे लिहिण्यात आल्याचे वृत्त शहरात पसरताच व्यापाऱ्यांच्या ठिकाणी मासे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. लोक माशासोबत सेल्फी घेत आहेत आणि मासे घेण्यासाठी लाखो रुपये मोजायला तयार आहेत.

यापूर्वी यूपीच्या शामली भागात एका व्यक्तीने मासे खरेदी केले होते. ज्यावर ‘अल्लाह’ लिहिले होते. हा मासा पाहण्यासाठी लाखो लोक जमायचे. ते विकत घेण्यासाठी लोक कमालीची किंमत मोजायला तयार होते.

महत्वाच्या बातम्या-
विराटशी तुलना होणाऱ्या बाबरच्या मानधनाच्या दुप्पट पैसे घेतो ऋतुराज; आकडा ऐकून बसेल धक्का
“ठाकरे सरकारची मनं फक्त मराठ्यांसाठीच धडधडतात का?”
गोलंदाजाने वनडे सामना बनवला T20 सामना, १५ षटकांच्या आतच सर्व खेळाडूंना पाठवलं तंबूत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: