टिम बनवणं कठीण, बर्बाद करणं सोपं; विराटला हटवून रोहीतला कर्णधार केल्यामुळे माजी क्रिकेटर संतापला

December 13, 2021 , 0 Comments

भारतीय टीमच्या नेतृत्वामध्ये बीसीसीआयने मोठा बदल करत एक नवीन निर्णय घोषित केला. ज्यानुसार आता टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहली ऐवजी रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली. यानंतर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केले. मात्र आता भारतीय संघातील एका माजी खेळाडूने याबाबत आपला आक्षेप नोंदवला आहे.

विराटने टी-20 वर्ल्ड कप आधीच आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण आता बीसीसीआयने त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवलं आहे असं करणं योग्य नसल्याचं मत माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक मदन लाल यांनी यांनी मांडलं आहे.

बीसीसीआयचा हा निर्णय योग्य नसल्याचे म्हणत मदन लाल यांनी जोरदार टीका केली आहे. विराट कोहलीचं वनडे विजयाचं रेकॉर्ड ७० टक्के आहे, त्यामुळे अनेक चाहत्यांनीही त्याला वनडे टीमचा कर्णधार म्हणून कायम ठेवायला पाहिजे होतं, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र आता मदन लाल यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणालेत नेमके मदन लाल
निवड समितीने याबाबत काय विचार केला, ते मला माहिती नाही.
जर कोहली चांगले निकाल देत होता, तर मग त्याच्याकडेच ही जबाबदारी न ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला?
खूप जास्त क्रिकेट होत असल्यामुळे त्याने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्याचं मी समजू शकतो.
टी-20ची कॅप्टन्सी सोडून विराटला इतर दोन्ही फॉरमॅटवर लक्ष केंद्रीत करायचं होतं.’

एक टीम बनवणं कठीण असतं, पण बनवलेली टीम बर्बाद करणं सोपं असतं. कोहली टेस्ट टीमचा कॅप्टन होता तेव्हा धोनी वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार होता. कोहली यशस्वी असूनही त्याला हटवलं गेल्याने या गोष्टी बोचत असल्याचे मदन लाल यांनी स्पष्टपणे सांगितले.

दोन वर्षांनी म्हणजेच २०२३ मध्ये होणार वनडे वर्ल्डकप भारतामध्ये होणार आहे. त्याच अनुषंगाने भारतीय टीममध्ये अनेक बदल केले जात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या
महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच दिल्लीत.. भुजबळांच्या विधानाने चर्चांना उधाण
शरद पवार यांचे ह्रदय फक्त मराठ्यांसाठीच धडधडतंय, ओवैसींचा पवार यांच्यावर थेट निशाणा…
शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही आशावादी, पवारांसमोर खासदाराचे मोठे वक्तव्य
“26 खासदार असलेला गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा का होणार नाही?” 

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: