अभिनेते विक्रम गोखले साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका; येतेय नवी वेबसीरीज

December 07, 2021 , 0 Comments

दिग्गज अभिनेता विक्रम गोखले लवकरच एका नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. देशाचे संविधान तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक महत्त्वाकांक्षी सीरीज बनवण्यात येत आहे. ही सीरीज बाबा प्ले नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर या सीरीजमध्ये दिग्गज अभिनेते विक्रम गोखले बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहेत.

फिल्मीबीट या मनोरंनविषयक पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आंबेडकर-द लेजेंड’ असे या सीरीजचे नाव असून ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे. एक सामान्य व्यक्ती देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या नेत्याच्या रूपात कसा विकसित होत गेला, हे या सीरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

या भूमिकेबाबत बोलताना विक्रम गोखले यांनी म्हटले की, ‘भारताच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमधील एकाची भूमिका साकारणे सन्मानाची गोष्ट आहे. ते माझे वैयक्तिक आदर्श आहेत. तसेच मी माझ्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तित्वासोबत न्याय करण्याची जबाबदारी घेतो. तसेच ओटीटीवरही माझ्या अभिनयाची छाप सोडण्यासाठीसुद्धा मी खूप उत्सुक आहे’.

या सीरीजची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन संजीव जयस्वाल करीत आहेत. या सीरीजबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ‘डॉ. आंबेडकर यांना नेहमी भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा एक दलित नेता या रूपातच ओळखले जाते. मात्र, वास्तवात ते भारताच्या महिला सशक्तीकरणाचा चेहरा आहेत. त्यांच्या कामामुळे समाजातील स्त्रियांना सन्मान आणि त्यांच्या अधिकारांमध्ये क्रांती घडून आली. त्यांनी स्वातंत्र्याच्या दिशेने जाणाऱ्या चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली’.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘आपला राष्ट्र अधिक न्याय आणि सर्वसमावेशक संस्कृतीकडे वाटचाल करत आहे. याचे कारण म्हणजे एका माणसाने एक चळवळ सुरू केली आणि त्याने आपल्याला या मार्गावर नेले’.

‘त्यांच्या विचारधारेला श्रद्धांजली म्हणून आम्ही आंबेडकरवाद्यांना समर्पित भारतातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केले आहे. हे प्रचंड बदलाचे साधन असेल. ‘आंबेडकर द लिजेंड’ ही केवळ मनोरंजनाची सीरीज नसून ती या सुधारकवादी नेत्याच्या कार्याच्या महानतेला दिलेली श्रद्धांजली आहे’.

महत्त्वाच्या बातम्या :

अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन या जोडीमध्ये फूट? व्हिडिओला नकार, चर्चांना उधाण..
नोकरी लावून देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळायचा, असा सापडला पोलिसांच्या कचाट्यात
बाबो! ‘मी पटकन प्रेमात पडते’ म्हणत ‘ही’ बाई करतेय १२ वं लग्न, ११ वेळा लग्न केलं तरी मन भरेना
… म्हणून पांडू चित्रपटातील कलाकारांवर गुन्हे दाखल करा; आरपीआयची मागणी


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: